पुस्तक – बियॉंड सेक्स (Beyond sex)
लेखिका – सोनल गोडबोले (Sonal Godbole)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ९६
ISBN – 978-93-88009-85-0

ही ९६ पानी एक छोटेखानी कादंबरी आहे. कादंबरीची गोष्टही तशीच छोटी आहे. दोन मध्यमवयीन, सुखवस्तू, मुलं बाळं असलेले विवाहित स्त्री आणि पुरुष – मीरा आणि सागर – एकमेकांकडे आकर्षिले जातात. एकमेकांना भेटत राहतात. पण मर्यादेत राहून एकमेकांशी शरीससंबंध न ठेवणारे मित्र-प्रेमिक बनून राहतात. त्यांच्या घरच्यांनाही ते मान्य असतं. ही कादंबरी म्हणजे त्यांच्या भेटीचे, गप्पांचे, पिकनिकचे प्रसंग आहेत.

कादंबरी च्या नावातून काहितरी सनसनाटी निर्माण करायचा प्रयत्न केलाय पण कादंबरीत नाट्य नाहीच.

त्यांच्या संसारात असं काय कमी असतं ज्यामुळे त्यांना इतर व्यक्तीची ओढ वाटावी हे नीट समजत नाही. शारीरिक आकर्षण हेच कारण वाटतं. मग एकमेकांमध्ये “सुरक्षित अंतर” ठेवताना त्यांच्या मनाची काय घालमेल होत असेल हे “ताणेबाणे” लेखिकेला दाखवता आले नाहीयेत. अगदी सहज प्रेमात पडतात अगदी सहज दूर राहतात.

त्यांच्या घरची मंडळी, मुलं, शेजारपाजारचे सुद्धा काहीच विचारत नाहीत. मीराचा नवरा तर, “अरे वा, छान मित्र मिळाला” असल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. हे असं खऱ्या आयुष्यात घडलं तर चांगलंच आहे. पण तसं होत नाही ना; त्यामुळे ते खोटं वाटतं. आणि कादंबरी म्हणून नाट्यहीन सपक वाटतं.

दोघांच्या भेटीचा एक प्रसंग

मीराचा मित्र सागर आणि नवरा समीर ह्यांच्या संवादाचा एक प्रसंग


सुरवातीला असं वाटतं की भेटणारा माणूस मीराला फसवणारा असेल, मग वाटतं “काही तरी मागच्या जन्माचं रहस्य” असेल, मग वाटतं अजून काहीतरी आक्रीत घडणार आहे पण सगळे धागे लेखिकेने तसेच सोडून दिले आहेत. भराभर वाचून आपण कादंबरी संपवतो.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/