पुस्तक – ચાલો હસીએ( चालो हसीए ) Chalo Hasie
लेखक – नाही
अनुवादक -ધીરુબહેન પટેલ धीरूबहेन पटेल Dheerubahen Patel
भाषा – गुजराती
पाने – १७३
ISBN – 978-81-237-1465-3
प्रकाशन – नॅशनल बुक ट्रस्ट. पहिली आवृत्ती १९९५
छापील किंमत – ५०/-

नॅशनल बुक ट्रस्ट चे जितेंद्र देवरुखकर ह्यांनी हे पुस्तक मला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो
दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रचलित असणाऱ्या लोककथांचा हा संग्रह आहे. विनोदी स्वरूपाच्या हलक्याफुलक्या छोट्या गोष्टी ह्यात आहेत.
आपल्याकडे शेखचिल्ली नावाच्या माणसाच्या मूर्खपणाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. तश्याच प्रकारचे देशोदेशीचे “शेखचिल्ली”ह्यात बघायला मिळतात. आळस, कामचुकार, लोभी लोकांच्या वृत्तीमुळे घडणाऱ्या गमती आहेत. चतुराईने अडचणीतून बाहेर कसे पडता आले हे काही गोष्टींत आहे तर आपल्या हुशारीने लोकांना कसे ठकवले हे काही गोष्टींत आहे.


एका पाद्री ची फजिती ही कोरिया देशातली ची गोष्ट

मूर्ख माणसाची इराणी गोष्ट

राजाच्या चतुर मंत्र्याची व्हिएतनाम मधली गोष्ट

ह्या गोष्टी खळखळून हसवणाऱ्या नाहीत. पण वाचायला ठीक आहेत. काही गोष्टींत मूर्खपणा दाखवायचा अतिरेक केलाय. पण गोष्टी अगदी लहान आहेत, १,२ किंवा ३ पानाच्या त्यामुळे अश्या गोष्टीदेखील कंटाळा यायच्या आत संपतात.

दक्षिण आशियाचे देशांमध्ये समान सांस्कृतिक धागा आहे हे मात्र ह्यातून जाणवते. कारण काही परदेशांतल्या गोष्टी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत किंवा थोड्या वेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात. उदा. “शुक्रवारची कहाणी” ज्यात गरीब बहीण श्रीमंत भावाकडे जेवायला जावून अपमानित होते. ती आणि ही इराणी गोष्ट सारखीच वाटेल बघा.


पुस्तकात काही म्हणी आणि उखाण्यातली कोडी आहेत. बऱ्याच गोष्टींबरोबर रेखाचित्रे आहेत. आणि ज्या देशातली कथा त्याशैलीतले चित्र काढले आहे. त्यातून पुस्तक देखणे झाले आहे.
प्रौढ वाचकांना खूप धमाल येईल अशा विनोदी गोष्टी नाहीत पण बालवाचकांसाठी छान आहेत. “तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे” ह्या म्हणीमागची मूर्ख मुलाची गोष्ट लहानपणी ऐकली तरी आयुष्यभर लक्षात राहते तश्या मजेशीर गोष्टी त्यांना आवडतील. त्यामुळे ह्या गोष्टी शब्दश: न घेता लाक्षणिक अर्थाने घेतल्या तर त्या बोधकथा सुद्धा ठरू शकतील.

अनुवाद अगदी छान झाला आहे. वाचताना परदेशी गोष्ट वाचतोय असं कुठेही वाटत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-

बालवाचकांनी आवा ( आवर्जून वाचा )
प्रौढ वाचकांनी वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/