“डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार” दिवाळी अंक २०२० (Dombivlikar Diwali edition 2020)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १४४
कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे गाडे मंदावले आहे, ते पुन्हा गतिमान करण्याच्या अनेक उपाययोजना सरकारी पातळीवर चालू आहेत.  काही आर्थिक पॅकेजेस दिली गेली आणि नियमांमध्ये बदल करण्यात आले. पण लोकसहभाग जिथे मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे ते म्हणजे ननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले “आत्मनिर्भर” भारताचे आवाहन. “व्होकल फॉर लोकल” म्हणजे स्वदेशी वस्तुंना प्राधान्य देण्याचे आवाहन. पंतप्रधानांचे आवाहन त्याचे विविधांगी पैलू आणि कृतीयोजना यावर देशभरात चर्चा झाली नसती तरच नवल. हीच संकल्पना मध्यवर्ती ठेवून ह्या वर्षीचा “डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार” चा दिवाळी अंक तयार केला गेला आहे. लेखांचा संग्रह आहे.
लेखांचे ३-४ प्रकार आहेत.
– भारत आत्मनिर्भर होणे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांत काय बदल घडले पाहिजेत ह्याचं उच्च स्तरीय विहंगावलोकन.
– विशिष्ट क्षेत्रांत भारताने आत्मनिर्भरता कशी गाठली किंवा त्या दृष्टीने मोठी प्रगती कशी केली हे सांगणारे लेख. उदा. दूधउत्पादन, मासेमारी, साखर उद्योग
– समाजातल्या वंचित घटकांना मुख्यप्रवाहात आणण्याचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची ओळख करून देणारे लेख उदा. अपंगांसाठी काम करणारी संस्था, नर्मदा नदी परिसरातील आदिवासींपर्यँत शिक्षण पोचवणारी संस्था.
– कोरोना काळात जेव्हा सगळ्यांना घरी बसून राहावं लागलं त्यातून कितीतरी क्षेत्रांना फटका बसला. तरी “ऑनलाईन” माध्यमाचा नाविन्यपूर्ण वापर करत शिक्षण, मनोरंजन, कला क्षेत्रातल्या व्यक्तीनी स्वतःला सतत कामत ठेवलं. त्यातून लोकांचं मनोरंजन आणि आर्थिक प्राप्ती सुद्धा होत राहिली. त्याचा वेध घेणारे लेख.
– आपल्या निवडलेल्या कार्यक्षेत्रात उत्तम करियर करायचं असेल तर मेहनत घेऊन आत्मनिर्भर झालं पाहिजे. त्यासाठी काही प्रसिद्ध व्यक्तीनी केलेले मार्गदर्शन.
अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया
आत्मनिर्भरतेचे पैलू सांगणारा लेख
कोरोना काळात संगीत क्षेत्रातल्या तरुण पिढीने ओनलाईन मैफिलींसारखे प्रयोग केले. त्याबद्दलचा लेख

 

नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासिंच्या विकासासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेल्या भारती ठाकूर यांच्या कार्याचा परिचय

 

 

“नवीन शैक्षणिक धोरण” केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केले. शिक्षणक्षेत्रात त्यातून काय बदल अपेक्षित आहेत त्याचा मागोवा घेणारा लेख.

 

 

असा हा वैचारिक फराळ देणारा दिवाळी अंक आपल्याला वाचायला नक्की आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

२०२० च्या इतर दिवाळी अंकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/