मराठी आणि तमिळ भाषांच्या “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी” तो स्वर म्हणजे वाणी जयराम ह्यांचा. त्यांची मराठी गाणी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले. त्या मूळच्या तमिळ असल्यामुळे तमिळ चित्रपटसंगीतात त्यांचे नाव खूप मोठे आहे. दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले ही बातमी वाचून सर्व संगीतप्रेमी हळहळले.
माझ्या “तमिळ गाणी मराठीत” ह्या उपक्रमात वाणी जयराम ह्यांचे हे गाणे सादर करून मी त्यांना श्रद्धासुमन अर्पण करतो. “एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल्” हे एक तत्त्वचिंतनात्मक गाणे आहे. शास्त्रीय संगीताच्या जास्त जवळ जाणारे गाणे आहे.

माझा हा उपक्रम आणि प्रयत्न कसा वाटला ते मला LearnMarathiFast@gmail.com वर ईमेल द्वारे कळवू शकाल. उपक्रम आवडला तर ह्या पेजची लिंक शेअर करायला विसरू नका.

ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)
ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)
இதயச் சுரங்கத்துள் எத்தனை கேள்வி
इदय सुरंगत्तुळ् एत्तनै केळ्वि (हृदयाच्या गुहेत किती प्रश्न ?)
ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)
இதயச் சுரங்கத்துள் எத்தனை கேள்வி
इदय सुरंगत्तुळ् एत्तनै केळ्वि (हृदयाच्या गुहेत किती प्रश्न ?)
காணும் மனிதருக்குள் எத்தனை சலனம்
काणुम् मनिदरुक्कुळ् एत्तनै सलनम् (दिसणाऱ्या प्रत्येक माणसात किती मोह)
காணும் மனிதருக்குள் எத்தனை சலனம்
काणुम् मनिदरुक्कुळ् एत्तनै सलनम् (दिसणाऱ्या प्रत्येक माणसात किती मोह)
வெறும் கற்பனை சந்தோஷத்தில் அவனது கவனம்ம்ம்ம்.
वॆरुम् कर्पनै संदोषत्तिल् अवनदु गवनम् (फक्त काल्पनिक सुखाकडे त्याचे लक्ष)
கற்பனை சந்தோஷத்தில் அவனது கவனம்ம்ம்ம்.
कर्पनै संदोषत्तिल् अवनदु गवनम् (काल्पनिक सुखाकडे त्याचे लक्ष)
ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)

காலை எழுந்தவுடன் நாளைய கேள்வி
कालै एळुन्दवुडन् नाळैय केळ्वि (सकाळी उठल्यापासून त्या दिवसाचा प्रश्न / त्या दिवशीय काय घडेल असा प्रश्न)

காலை எழுந்தவுடன் நாளைய கேள்வி
कालै एळुन्दवुडन् नाळैय केळ्वि (सकाळी उठल्यापासून त्या दिवसाचा प्रश्न / त्या दिवशीय काय घडेल असा प्रश्न)
அது கையில் கிடைத்த பின்னும் துடிக்குது ஆவி
अदु कैयिल् किडैत्त पिन्नुम् तुडिक्कुदु आवि (ते हातात आल्यावरसुद्दा अस्वस्थच आत्मा)
கையில் கிடைத்த பின்னும் துடிக்குது ஆவி
कैयिल् किडैत्त पिन्नुम् तुडिक्कुदु आवि (हातात आल्यावरसुद्दा अस्वस्थच आत्मा)
ஏன் என்ற கேள்வி ஒன்று என்றைக்கும் தங்கும்
एँ एन्र केळ्वि ऒन्रु एन्रैक्कुम तंगुम् (“असं का?” हा प्रश्न कायमच राहणार )
ஏன் என்ற கேள்வி ஒன்று என்றைக்கும் தங்கும்
एँ एन्र केळ्वि ऒन्रु एन्रैक्कुम तंगुम् (“असं का?” हा प्रश्न कायमच राहणार )
மனிதன் இன்பம் துன்பம் எதிலும் கேள்விதான் மிஞ்சும்
मनिदन् इन्बम् तुन्बम् एदिलुम् केळ्विदान् मिंजुम् (माणसाच्या सुखात दुःखात कशातही प्रश्नच उरेल)
இன்பம் துன்பம் எதிலும் கேள்விதான் மிஞ்சும்
इन्बम् तुन्बम् एदिलुम् केळ्विदान् मिंजम् (सुखात दुःखात कशातही प्रश्नच उरेल)
ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்…
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)

எனக்காக நீ அழலாம் இயற்கையில் நடக்கும்
एनक्काग नी अळलाम् इयर्क्कैयिल् नडक्कुम् (माझ्यासाठी (माझ्या दुःखासाठी ) तू रडशील हे निसर्गात शक्य आहे )
எனக்காக நீ அழலாம் இயற்கையில் நடக்கும்
एनक्काग नी अळलाम् इयर्क्कैयिल् नडक्कुम् (माझ्यासाठी (माझ्या दुःखासाठी ) तू रडशील हे निसर्गात शक्य आहे )
நீ எனக்காக உணவு உண்ண எப்படி நடக்கும்
नी एनक्काग उणवु उण्ण एप्पडी नडक्कुम (पण माझ्यासाठी तू जेवशील हे कसे चालेल ? / माझ्यासाठी दुसरा जेवू शकत नाही; मलाच जेवले पाहिजे)
நமக்கென்று பூமியிலே கடமைகள் உண்டு
नमक्कॅन्रु बूमियिले कडमैगळ् उण्डु (आपल्यासाठी ह्या जगात कर्तव्ये आहेत)
அதில் நமக்காக நம் கையால் செய்வது நன்று
अदिल् नमक्काग नम् कैयाल् सॅय्वदु नन्रु (त्यात आपल्यासाठी आपल्या हाताने करणेच योग्य / आपली कर्तव्ये आपणच करत राहणे योग्य )
நமக்காக நம் கையால் செய்வது நன்று
नमक्काग नम्कै याल् सॅय्वदु नन्रु (आपली कर्तव्ये आपणच करत राहणे योग्य )
ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்..
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)

ஆரம்பத்தின் பிறப்பும் உன் கையில் இல்லை.
आरम्बत्तिन् पिरप्पुम् उन् कैयिल् इल्लै (सुरुवातीचा जन्म तुझ्या हातात नाही)
ஆரம்பத்தின் பிறப்பும் உன் கையில் இல்லை
आरम्बत्तिन् पिरप्पुम् उन् कैयिल् इल्लै (सुरुवातीचा जन्म तुझ्या हातात नाही)
என்றும் அடுத்தடுத்த நடப்பும் உன் கையில் இல்லை
एन्रुम् अडुत्तडूत्त नडप्पुम् उन् कैयिल् इल्लै (पुढे काय होत जाते तेही तुझ्या हातात नाही )
பாதை வகுத்த பின்பு பயந்தென்ன லாபம்
पादै वगुत्त पिन्बु बयन्दॅन्न लाबम् (एकदा (ठरवलेल्या मार्गावर)पाय पुढे टाकल्यावर घाबरून काय फायदा)
பாதை வகுத்த பின்பு பயந்தென்ன லாபம்
पादै वगुत्त पिन्बु बयन्दॅन्न लाबम् (एकदा (ठरवलेल्या मार्गावर) पाय पुढे टाकल्यावर घाबरून काय फायदा)
அதில் பயணம் நடத்திவிடு மறைந்திடும் பாவம்
अदिल् पयणम् नडत्तिविडु मरैन्दिडूम् पावम् (त्यामार्गावर प्रवास करत राहूनच पापे नाश्ता होतील)
பயணம் நடத்திவிடு மறைந்திடும் பாவம்
पयणम् नडत्तिविडु मरैन्दिडूम् पावम् (प्रवास करत राहूनच पापे नाश्ता होतील)
ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்..
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)

நாளைப் பொழுது என்றும் நமக்கென வாழ்க
नाळैप् पॉळुदु एन्रुम् नमक्कॅन वाळ्ग
அதை நடத்த ஒருவன் உண்டு கோவிலில் காண்க
अदै नडत्त ऒरुवन् उण्डु कोविलिल् काण्ग
நாளைப் பொழுது என்றும் நமக்கென வாழ்க
नाळैप् पॉळुदु एन्रुम् नमक्कॆन वाळ्ग (उद्याचा काळ हा आमचा आहे असं समजून जग)
அதை நடத்த ஒருவன் உண்டு கோவிலில் காண்க
अदै नडत्त ऒरुवन् उण्डु कोविलिल् काण्ग (आणि तो घडवणाऱ्याला देवळात बघ)
வேளை பிறக்கும் என்று நம்பிக்கை கொள்க
वेळै पिरक्कुम् एन्रु नम्बिक्कै कॊळ्ग (योग्य वेळ येईल असा विश्वास ठेव)
வேளை பிறக்கும் என்று நம்பிக்கை கொள்க
वेळै पिरक्कुम् एन्रु नम्बिक्कै कॊळ्ग (योग्य वेळ येईल असा विश्वास ठेव)
எந்த வேதனையும் மாறும் மேகத்தைப் போல
एन्द वेदनैयुम् मारुम् मेगत्तै पोल (कुठलीही वेदना बदलेल .. (रूप बदलणाऱ्या) मेघाप्रमाणे)
வேதனையும் மாறும் மேகத்தைப் போல
वेदनैयुम् मारुम् मेगत्तै पोल (वेदना बदलेल .. (रूप बदलणाऱ्या) मेघाप्रमाणे)

ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)
இதயச் சுரங்கத்துள் எத்தனை கேள்வி
इदय सुरंगत्तुळ् एत्तनै केळ्वि (हृदयाच्या गुहेत किती प्रश्न ?)
காணும் மனிதருக்குள் எத்தனை சலனம்
काणुम् मनिदरुक्कुळ् एत्तनै सलनम् (दिसणाऱ्या प्रत्येक माणसात किती मोह)
வெறும் கற்பனை சந்தோஷத்தில் அவனது கவனம்ம்ம்ம்.
वॆरुम् कर्पनै संदोषत्तिल् अवनदु गवनम् (फक्त काल्पनिक सुखाकडे त्याचे लक्ष)

ஏழு ஸ்வரங்களுக்குள் எத்தனை பாடல்..
एळु स्वरंगळुक्कुळ् एत्तनै पाडल् (सात स्वरांमधून किती गाणी ?)

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/