पुस्तक : जिथली वस्तू तिथे (Jithali vastu tithe)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १२६
ISBN : 978-81-86149928
प्रकाशक : मेनका प्रकाशन
मागच्या महिन्यात मी स्टोरीटेल या appचं सशुल्क सदस्यत्व घेतलं.या appवर खूप मराठी कथा, कादंबऱ्या, पुस्तके ध्वनिमुद्रित केलेली आहेत. ज्यांना साहित्य वाचायची इच्छा आहे पण प्रत्यक्ष वाचन करणं काही कारणामुळे जमत नाहीये त्यांना हा पर्याय चांगला आहे. पुस्तकांनाचं वाचन, ध्वनिमुद्रण, पार्श्वसंगीत हे सगळं यथायोग्य आणि आकर्षक आहे. मी या अँपवर काही कथा ऐकल्या. काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली पण अजून पूर्ण झाली नाहीत.
सगळयात पाहिलं पुस्तक जे उत्सुकतेने ऐकून पूर्ण केलं ते मंगला गोडबोले यांचं “जिथली वस्तू तिथे”. मंगला ताईंच्या नेहमीच्या खुसखुशीत विनोदी शैलीतल्या कथा आहेत. मध्यमवर्गीय घरात घडणाऱ्या प्रसंगांची खुमासदार वर्णनं ऐकताना “अरेच्च्या, सगळ्या घरी असंच घडतं; फक्त आपल्याकडेच घडतं असं नाही” असं वाटून गंमत येते.
कथा वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित आहेत.
– नव्या सुनेसाठी सगळं “मॉडर्न” करणाऱ्या आणि स्वतःलाही “मॉडर्न” बनवणाऱ्या सासूची घालमेल
– हल्लीच्या मुलांना भरमसाठ वस्तू घ्याची सवय आहे पण वस्तू जागेवर ठेवायची सवय नाही; ह्या मुलांचं लग्न झाल्यावर कसं होणार याची आईवडिलांना वाटणारी काळजी
– कॉलेजकुमाराचं कॉलेजकुमारीवर प्रेम बसलं पण पुढे काही झालं नाही. तो साधा माणूस राहिला, ती अभिनेत्री झाली. दोघांचं आयुष्य वेगवेगळ्या वाटेने गेलं. पण आपण एकेकाळी मित्र होतो ही आठवण आणि ती दाखवायची खुमखुमी मात्र चालूच राहिली. त्यातून होणारी फजिती
– ऐकू कमी येणाऱ्या आजी आणि विस्मरण होणारे आजोबा असं जोडपं. त्यांच्या घरी आजोबा कोणालातरी जेवायला बोलावतात आणि विसरून जातात. ते आठवण्याची धमाल
– लग्न ठरवताना बघायच्या कार्यक्रमात एकमेकांवर इम्प्रेशन पाडायची चढाओढ चालू असताना मुलाची आजी अतिउत्साहाच्या भरात काय काय सांगून बसेल याची भीती. त्यामुळे तिला आवर घालताना होणारी दमछाक
इ.
मानसी जोशी यांचं अभिवाचन अगदी साजेसं आहे
अँप वर पुस्तक अर्धवट आहे. शेवटच्या ४ कथा नाहीत. पण त्यांनी पुढचा भाग प्रकाशित केल्यावर किंवा पुस्तक मिळेल तेव्हा त्या वाचायची उत्सुकता आहे. तुम्हाला सुद्धा या गोष्टी वाचायला किंवा ऐकायला नक्की आवडतील.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/