पुस्तक : मसालाकिंग (Masalaking)

लेखक : धनंजय दातार (Dhananjay Datar)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : १८१

ISBN : दिलेला नाही

मराठी माणूस सहसास धंद्यात पडत(!) नाही. पण पडलाच तर निग्रहाने पडतो. सर्वोत्तम व्यवसाय करण्याची त्याची इच्छा असते. त्यासाठी मेहनत घ्यायची इतकी तयारी असते की पुढे त्याचे यश सर्वांना अचंबित करते. अशा यशस्वी उद्योगपती पैकी  धनंजय दातार आहेत. दुबई आणि आखाती देशांमध्ये  त्यांचा मसाल्याचा व्यापार व्यापार आहे.  या व्यापाराचा दबदबा इतका आहे की प्रत्यक्ष दुबईच्या राजघराण्यातल्या व्यक्तीने त्यांना “मसालाकिंग” म्हणत गौरवले होते. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली थोडी माहिती.

या पुस्तकात धनंजय दातार यांनी स्वतः त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रवास आठवणींच्या साखळीतून उलगडला आहे त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे टप्पे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणाऱ्या घटना रंजक पद्धतीने सांगितले आहेत.

अनुक्रमणिका :

आज किंग झालेले झालेले दातार लहानपणी मात्र निम्न मध्यम वर्गीय वर्गीय गरीब घरातच वाढले लहानपणच्या परिस्थिती ची एक आठवण

परदेशी जाऊन आलेली माणसं खूप श्रीमंत होतात त्यामुळे गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर आपणही परदेशात जायला जायला आपणही परदेशात जायला परदेशात जायला जायला पाहिजे हा विचार किंवा वेड तरुण वयातच त्यांना प्रदेशाकडे खेचत होतं. त्यामुळे शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीपासूनच व्हायच्या आधीपासूनच परदेशात जायचं वेड त्यांच्या मनात संचारलं होतं. त्यांच्या वडिलांनी दुबई मध्ये जाऊन छोटासं दुकान काढलं होतं आणि ते ठीक-ठाक चालत होतं. त्यामुळे त्यांनाही दुबईला जाण्याचा मार्ग खुला झाला. वडिलांची फारशी संमती नसताना ते दुबईला वडिलांचा दुकानात कामाला गेले आणि मग खरा परदेश, परदेशातले कष्ट त्यांना दिसले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मालकाचा मुलगा म्हणून डोक्यावर न चढवता सर्व लहान-मोठी काम कष्टाचे काम करायला लावली आणि उमेदवारी सुरु झाली त्यावेळच्या वसुलीच्या कामाचा एक प्रसंग

ह्या सुरुवातीपासून त्यांचा आजपर्यंतचा खडतर प्रवास, आलेल्या अडचणी, काढलेले मार्ग, शिकलेले धडे, अपघात आणि शारीरिक व्याधींची संघर्ष इत्यादी त्यांनी पुढे पुस्तकात मांडले आहे. या सगळ्याचा उद्देश उद्देश स्वतःची शेखी मिरवणे नसून हे एक प्रांजळ आत्मकथन आहे. त्यांच्याप्रमाणे ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना हे अनुभव मार्गदर्शक ठरावे ही प्रामाणिक इच्छा इच्छा आहे.  म्हणून स्वतःच्या अनुभवावर आधारित काढलेले निष्कर्ष सुद्धा त्यांनी होतकरू व्यावसायिकांसाठी सांगितले आहेत हे काही सल्ले वाचा

पुस्तकात त्यांनी त्यांच्या आई-वडील पत्नी आणि मुलांबद्दल एक एक लेख लिहिला आहे त्यांच्या यशात या प्रत्येकाचा वाटा आहे आई-वडिलांच्या संस्काराचा, पत्नीने दिलेल्या साथीचा, मुलांनी वडिलांना आपल्याला जास्त वेळ देता येत नाहीये हे समजून घेतल्याचा…  दातारां बद्दल त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी लिहिलेले छोटे लेख पुस्तकात आहेत. धनंजय ज्यांची कुटुंबवत्सलता आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंबाचे पाठबळ सपोर्ट सिस्टीम अधोरेखित होते.

गरिबीतून श्रीमंत झाल्यावर, हातात पुरेपूर पैसा खेळू लागल्यावर काहीजण त्या पैशाने आंधळे होतात होतात तर काहीजण गरिबीच्या भीतीने कवडीचुंबक होऊ लागतात. ही दोन्ही टोके टाळत स्वतःच्या पैशाचा समाजासाठी उपयोग दातार करतात आणि संपत्तीचा तितक्यात आनंदाने उपभोग घेतात. पत्नीला दिलेली महागड्या गाडीची भेट, मुलांची विमानात लावलेली मुंज, लोकप्रिय कलावंतांच्या हस्ते दुकानांच्या शाखांचे उद्घाटन असे आनंदाचे क्षणही पुस्तकात पुस्तकात आहेत. यश आणि श्रीमंती कशी पेलावी हेसुद्धा त्यातून ते सांगतात.

या पुस्तकाची लेखनशैली चांगली आहे. अजिबात पाल्हाळ न लावता ठळक घटना पटापट सांगितल्या आहेत. लेखक अतिशय प्रांजळपणे आपले गुणदोष सांगतात. वाचकांच्या भावनांना हात घालण्यासाठी गरीबी आणि कठीण प्रसंगांचं उगाळत बसले नाहीयेत. आणि यशाच्या प्रसंगांत आत्मप्रौढी नाहीये.

दातार यांना मिळालेले पुरस्कार

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी दातार स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी जातात. असे मार्गदर्शन नक्कीच फायदेशीर ठरेल. परदेशात भारताचे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या धनंजय दातार यांच्या कर्तुत्वाला अभिवादन करण्यासाठी पुस्तक अवश्य वाचा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews