“ऋतुरंग” दिवाळी अंक २०२० (Ruturang Diwali edition 2020)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २८४

संपादक : अरुण शेवते (Arun Shevate)
किंमत २५०/-

कोरोना साथीमुळे २०२० चं वर्ष हे सगळ्या जगासाठी मोठं खडतर गेलं. आपली तब्येत, आपले कुटुंबीय, आपला नोकरी-व्यवसाय आणि आपली मनःस्थिती अश्या वेगवेगळ्या पातळीवर प्रत्येकाला आपापला संघर्ष करावा लागला. २०२०चा हा वेगळेपणाच “ऋतुरंग” दिवाळी अंकाने टिपला आहे. आणि वाचकांसमोर सादर झाला आहे “लढत” विशेषांक.  लढत, परिस्थितीशी संघर्ष ह्यावर आधारित लेखांचा हा संग्रह आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.

“लढतीचा एपिसोड ५” मध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या उमेदवारीच्या काळातल्या धडपडीचा धावता आढावा २-३ पानी लेखांत घेतला आहे. त्यात गरीबीचे चटके, ते चटके सुसह्य करणाऱ्या आयुष्यातील व्यक्ती, स्वतःवर विश्वास ठेवत-गमावत आणि पुन्हा मिळवत केलेल्या प्रवासाची झलक पाहायला मिळते उदा. आयुष्मान खुराणा या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याचा हा लेख.

“लढतीचा एपिसोड ४” मध्ये गेल्या ७-८ महिन्यांत लॉकडाऊन (टाळेबंदी),क्वारंटाईन (घरबंदी) मान्यवरांनी कशी स्वतः अनुभवली याचे स्वानुभवकथन आहे आणि भोवतालच्या परिस्थितीवरचे चिंतन या पद्धतीचे लेख आहेत.

गांधीजी आज असते तर कोरोना महामाररीला कसे सामोरे गेले असते हा अभय बंगांचा लेख बोधप्रद आहे. स्थलान्तरित मजुरांची झालेली फरपट तीव्र शब्दांत मांडणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांच्या लेखातील एक पान

कोरोनाची लस, त्यावरची औषधे, औषधनिर्माण कंपन्या सुद्धा सतत चर्चेत आहेत. “सिप्ला” ही कंपनी मूळ भारतीय आहे हे माहित आहे का ? स्वातंत्र्यपूर्व काळातल्या “स्वदेशी”च्या वातावरणात के.ए.हमीद यांनी सिप्ला ची सुरुवात केली. हमीद आणि त्यांचे कर्तृत्त्ववान पुत्र यांच्या कामाची थोडक्यात ओळख सचिन इटकर यांनी करून दिली आहे. त्यातली दोन पाने नमुन्यादाखल

“लढतीचा एपिसोड ३” आणि “”लढतीचा एपिसोड १” मध्ये दीर्घ लेख आहेत. लावणी, कुस्ती, पर्यावरण, उद्योग, स्वयंरोजगार अश्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी स्वतः किंवा त्यांच्याबद्दल लेखकाने लिहिले आहे. आणि आपल्या जीवनाचा पट मांडला आहे.

“मोल हंटर आणि सुटलेली शिकार”हा लेख वेगळीच लढत दाखवतो. भारताची गुप्तहेर संघटना – “रॉ” मधला एक उच्चपदस्थच फितूर झाला होता. त्याची फितुरी शोधून काढण्याच्या धडपडीवर आधारित हा लेख आहे. त्यातला एक भाग

“लढतीचा एपिसोड २” जरा वेगळा आहे. १९२० साली भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्या. म्हणजे २०२० ही निवडणुकीची शताब्दी. त्यातिमित्ताने निवडणुकांच्या लढतीचे विविध पैलू सांगणारे लेख या भागात आहेत. आचार्य अत्र्यांच्या आठवणी आहेत. आज निवडणूका जिंकण्यासाठी ज्यांचं नाव उठता बसता घेतलं जातं त्या बाबासाहेब आंबडेकरांना मात्र निवडणुकीत पुन्हा पुन्हा पराभव स्वीकारावा लागला होता. अगदी राखीव मतदारसंघातूनही. आज कोणाला सांगूनही हे खरं वाटणार नाही. पण हे विचित्र सत्य इतिहास मांडणाऱ्या लेखाची ही झलक.

ऋतुरंग मध्ये बरेच लेख आहेत. त्यामुळे प्रत्येकाबद्दल लिहिणं कठीण आहे. पण या अंकाचं एकूण स्वरूप लक्षात आलं असेल. तुमच्या आवडीचे विषय, लेखक तुम्हाला यात दिसतीलच.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

२०२० च्या इतर दिवाळी अंकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/