पुस्तक : पेशवेकालीन पुणे

लेखक : रावबहादूर डी.बी. पारसनीस

पुस्तक परीक्षण ज्योती काळे यांचे द्वारा

रावबहादूर डी.बी. पारसनिसांनी ८५-८६ वर्षांपूर्वी इंगजी आमदानीतल्या गोऱ्यांना पेशवेकालीन पुण्याचे ऐश्वर्य समजावे,वास्तूशिल्प शैलीची ओळख व्हावी म्हणून लिहिलेल्या “पुणे पूना इन बायगॉन डेज” लिहिले. त्या पुस्तकाचे आशयघन मराठी रूपांतर डॉ.सुरेश र. देशपांडे ह्यांनी केले आहे. प्रथम आवृत्ती २००७ साली निघाली.

ह्या ७ प्रकरणात पुणे-शनिवारवाडा-पर्वती-वकिलात निवासस्थान-शिंद्यांची छत्री-पोलिसखाते-सण समारंभ सगळे सामावलय.

पेशव्यांच्या निवासस्थनामुळे पुण्याचा विस्तार झपाट्याने झाला. शनिवारवाडा अत्यंत भव्य राजेशाही प्रासाद होता. वाड्याच्या मुख्य इमारतीतून आळंदीच्या मंदिराचा कळस व पर्वतीचा सुरेख देखावा दिसे. पर्वतीवर सुरेख मंदिरं बांधली होती. दक्षिणा देण्याचा हेतू शिक्षण देण्याचा होता. उत्तेजन देण्याचा होता.

शिद्यांची छत्री ऐतिहासिक वास्तू पुण्याचा जिव्हाळ्याचा विषय. महादजी शिंदेंचे नाव मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमी मुत्सद्दी सेनापती म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी सत्तेचे संघटन ह्या व्यक्तीने केले. त्यांच्या दहन केलेल्या ठिकाणी नामांकित वारसदारांनी बांधली हिच ती छत्री.

न्यायधिशांचा बंगला म्हणजे इतिहास प्रसिद्ध वास्तु “संगम”. १७८७ ला ही संदर हवेली ब्रिटिश वकिलाला राहण्यासाठी रेसिडेंट म्हणून मँलेटाला नियुक्त केले. ती एल्फिंस्टनने चांगली सुधारली. त्याला ऐतिहासिक झालर असून ते प्राचिन पुरातत्व स्मारक आहे.

पहिल्या पेशव्यांच्यावेळी पुणे मराठी राज्याचे मुख्य केंद्र होते. पोलिसखाते सक्षम व कार्यकुशल होते. पेशवाईत दसरा,गणपती, होळी सण समारंभ सार्वजनिक होते.

या पुस्तकातून आपल्याला ऐतिहासिक वारसा कळतो. लेखकाने काही शब्दांना सद्यकाळाला अनुसरून समजणारे शब्द वापरले. उदा: प्रवेशद्वार् (दरवाजा) सिंहासन(गादी). लेखकाची आपल्याला आकलन होइल अशी साधी सोपी भाषा लक्षांत येते. इतिहास समजून घेतांना कंटाळा येत नाही

हे जरूर वाचाच एकदा.