Namaskar!!
I am Kaushik Lele. I was born and brought up in Dombivli a suburb of Mumbai.Hey, Where are you
from? US? Australia? Europe? Or from any other country? Or an Indian but non– marathi person?
We, the Indians especially Maharashtrians welcome You by saying सुस्वागतम “Suswagatam”. It is our authentic way to welcome our guest in our प्रिय “Priya” means the beloved language Marathi. In Maharashtra, you will come across fluent Marathi speakers every now and then. Most of the time, you will find the notice boards, instruction boards and even menu cards in restaurants only in Marathi. Marathi is a very Interesting Language.
I worked in different organizations as Software Engineer in Pune (in Maharashtra state of India), I came across many people who had a great interest in Learning Marathi. I could see that we share the same liking towards language. My mother-tongue is Marathi. I learned Engish, Hindi, Sanskrit as part of my school education. I learned myself Tamil and Gujarati through grammar books and self study. So, after seeing other enthusiasts willing to learn Marathi & Gujarati, I decided to come up with the modules, which will be accessible, easy & interesting.
I’m there to talk to you and teach you how to speak correct & fluent Marathi, Gujarati. I have made sure, the modules are in written and video format to get a dipper and clearer knowledge of language. I have made sure you not only learn basics but also use it in your regular conversations. This is going to help you to understand the communication and reply to them in grammatically correct language.
I am a voracious reader of various kind of books. I have written more than 150+ book reviews over past 4 years. You can read those reviews at :
https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/
So, friends, let’s start to learn the Interesting Languages MARATHI & GUJARATI. Give your feedback on LearnMarathiFast@gmail.com Do talk to your friends, relatives, colleagues about these resources.
Appreciation & Feedback From Renowned Personalities
Thank you,
Kaushik
नमस्कार मंडळी !
अनेकविध क्षेत्रात काम करण्याच्या निमित्ताने आपल्याला आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करावी लागते. दरवेळी तिथली भाषा ,तिथली संस्कृती आपल्याला माहित असतेच असे नाही. परंतु 'केल्याने देशाटन ' या उक्तीप्रमाणे जसजसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तसतसे तेथील भाषा माहित करून घेणे अनिवार्य ठरते .तरच आपण इतरांशी चांगला संवाद साधू शकतो . नोकरीच्या ,सहलीच्या निमित्ताने किंवा भारतीय संस्कृती ,योगा,आयुर्वेद यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणाऱ्या आपल्या परदेशी मित्रांची अशीच काहीशी पंचाईत होते. अहो, अगदी आपण परक्या राज्यात गेलो तरी तिथली भाषा अन संस्कृती बदलते. ज्याला हे सर्व माहित असते त्याला म्हणतातच ना बारा गावचे पाणी प्यायलेला.!! महाराष्ट्रात येणाऱ्या आमच्या अशाच एनआरआय किंवा अमराठी दोस्त मंडळींची अशी फजिती होऊ नये असे मला वाटते.
मी कौशिक लेले, मुंबईचे उपनगर असलेल्या डोंबिवलीत जन्मलो आणि वाढलो. सध्या पुण्यात सॉफटवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. मी स्वतः माझा छंद म्हणून शाळेत असताना तमिळ शिकवणाऱ्या पुस्तकावरून तमिळ शिकलो. आणि थेट पुस्तकं, मासिकं वाचून गुजराती शिकलो. ऑफिसमधले माझे काही सहकारी मराठी शिकायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेट वर मराठी शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट नेट वरच शोधली जाते. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे मला वाटले. मला स्वतःला भाषा शिकणे-शिकवणे आवडते आणि मी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने स्वतः हे काम करायचं ठरवलं. मी ज्या व्याकरणाधारित पद्धतीने तमिळ आणि गुजराथी शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी, गुजराथी शिकवायचं ठरवलं.
वेबसाईटमध्ये दृक-श्राव्य माध्यमातून भाषा लिहिण्या वाचण्या संबंधीच्या सूचना अगदी सहज सोप्या भाषेत दिल्या आहेत. भाषेचे अनेक पैलू वाक्यांमधून कसे वापरावेत याचीही उदाहरणे यात ऐकायला वाचायला मिळतील. नव्याने शिकणाऱ्यांसाठी शब्दांची स्पेलिंग्स आणि उच्चारणही रोमन लिपीत समाविष्ट केले आहे. जेणेकरून आमच्या एनआरआय दोस्तास किंवा हिंदी,गुजराथी वा अन्य भाषिक मंडळींना भाषा शिकण्याचा आनंद घेता येईल.
मला वाचनाची खूप आवड आहे. मराठी, इंग्रजी, गुजराथी पुस्तकं मी वाचतो. ऐतिहासिक, वैचारिक, विनोदी, कथा, कादंबऱ्या, चरित्र अशा सर्व प्रकारची पुस्तकं वाचायला मला आवडतं. मी लिहिलेली १५०+ पुस्तकपरीक्षणे तुम्ही माझ्या ब्लॉगवर वाचू शकाल. http://kaushiklele-bookreview.blogspot.in
भाषा शिकवणाऱ्या या उपक्रमाला भेट देऊन भेट देऊन आपला अभिप्राय LearnMarathiFast@gmail.com कळवा. मराठी, गुजराथी शिकू इच्छिणाऱ्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना या बद्दल नक्की सांगा.
Appreciation & Feedback From Renowned Personalities
धन्यवाद,
कौशिक लेले