पुस्तक – एबीपी माझा दिवाळी अंक २०२३ (ABP Majha Diwali Ank 2023)
संपादक – राजीव खांडेकर (Rajeev Khandekar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २००
छापील किंमत – रु. २५०/-

एक नोव्हेंबर पासून माझ्या वाचनालयात दिवाळी अंक मिळायला सुरुवात झाली. शंभरच्या वर दिवाळी अंक. एकाहून एक दर्जेदार. त्यामुळे काय घेऊ काय नाही असं होतं. त्यात दिवाळी अंक खूप मोठाले असतात. घेतलेला अंक पूर्ण वाचायचा म्हटला तर फारच थोडे अंक वाचून होतील. मग पुढचा अंक वाचायच्या उत्सुकतेपोटी अंक चाळला जातो, आवडीचं वाचलं जातं, महत्त्चाचं वाचलं जातं आणि उरलेलं पुढच्या वेळी वाचू असं होतं. त्यामुळे एखाद्या अंकाचं अर्धवट वाचून परीक्षण लिहिण्यात अर्थ नाही. तसंच दिवाळी अंकात कथा, कविता, व्यंगचित्र, नाना प्रकारचे लेख असं सगळं असल्यामुळे पुस्तकासारखा त्याचा गोळीबंद परिचय/परीक्षण मला देता येत नाही. मग शक्यतो ते लिहिणं टाळतो. म्हणूनच ह्या वर्षी “उत्तम अनुवाद” आणि “मौज” असेच चाळून-वाचून झाले. पण त्याविषयी लिहिलं नाही. पण “एबीपी माझा” चा दिवाळी अंक बहुतांश वाचून झाला. आवडला. इतरांना त्याबद्दल सांगावं असं वाटलं म्हणून थोडक्यात परिचय.

कथा-कविता-लेख असं ह्याचं स्वरूप आहे. एकाच एक संकल्पनेभोवती(थीम बेस्ड) असा अंक नाहीये. त्यामुळे सगळ्यांत विविधता आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.

ह्यातल्या निवडक मजकूराबद्दल लिहितो.
“कथा” विभागात रवींद्र शोभणे ह्यांची “कूस” कथा आहे. “सरोगेट मदर” अर्थात कायदेशीर कराराद्वारे गर्भाशय भाड्याने देऊन दुसऱ्याचं मूल आपल्या पोटात वाढवणे. ह्याचं अनुभव विश्व मांडणारी ही छान गोष्ट आहे.
लक्ष्मीकांत देशमुख हयांची “बाबुल की दुवाए लेती जा” ही एका राजकीय पुढाऱ्याची दोन रूपे दाखवते. एक समाजापुढे दिसणारे रूप आणि दुसरे घरात. बाहेर कुटुंबसंस्थेचा आदर करणारा हिंदुत्त्ववादी पुढारी पण वैयक्तिक आयुष्यात फार चांगले कौटुंबिक संबंध नाहीत. असं का झालं, “समलिंगी विवाहाला”विरोध करण्याच्या आंदोलनाचा घरगुती आयुष्यावर काय परिणाम झाला.
अजूनही काही गोष्टी अंकात आहेत.
“कूस” मधली पाने उदाहरणादाखल.


मराठीचा शब्दकोश बनवण्यासाठी १८३० च्या सुमारास इंग्रज अधिकारी मोल्सवर्थने किती कष्ट घेतले ह्यावरचा लेख आहे. मधू दंडवते ह्यांचे व्यक्तिचित्रण आहे. विनोद तावडे ह्यांनी “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे” काम करताना आलेले मदनदासजी देवी ह्यांचे अनुभव लिहिले आहेत.

“ललित” विभाग सुद्धा छान आहे. प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन ह्यांनी त्यांच्या काही पेंटिंगच्या जन्मकथा सांगितल्या आहेत. पेंटिंग का काढावंसं वाटलं, काय भावना मनात आल्या हे सांगून त्यांनी चित्रकाराच्या मनात-डोक्यात डोकावण्याची संधी आपल्याला दिली आहे. प्रसाद खांडेकर आणि सचिन मोटे ही नवे “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मुळे घराघरात पोचली आहेत. त्यांचे आणि वृंदा भार्गवे ह्यांचे मजेशीर लेख आहेत. इंस्टाग्राम वर रील टाकण्याचा सोस, कोरोना काळात “ऑनलाईन” शिक्षण पद्धतीत अभ्यास टाळण्याचे मुलांचे बहाणे, थायलंडला जाऊन “खास मसाज” घेण्याची स्वप्नं बघणारा माणसाची फजिती असे खुसखुशीत विषय आहेत.

अन्वर हुसेन ह्यांच्या लेखातली दोन पाने


मी कवितांच्या फार नदी लागत नाही. त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही. अनुक्रमणिकेवरून कोणाच्या कविता आहेत हे तुम्हाला कळलं असेल.

“लेख” विभागसुद्धा माहितीपूर्ण आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वरचा दीर्घ लेख आहे. ज्यांना ह्या विषयाबद्दल माहिती नाही त्यांना ह्याची चांगली तोंडओळख होईल. किल्लारी भूकंपानंतर झालेल्या पुनर्वसनातील त्रुटींवर अतुल देऊळगावकर ह्यांनी भाष्य केलं आहे. गेल्या काही वर्षांत चांगले मराठी चित्रपट येऊ लागले आहेत. चांगले चालतायत. “झी टॉकीज”, “जियो सिनेमा” कंपनीच्या माध्यमातून निखिल साने ह्यांनी अशा चित्रपटांच्या निर्मितीत मोलाचा वाटा दिला आहे. त्यांच्या अशी कोट्यांची कमाई करणाऱ्या चित्रपटांचा आढावा सान्यांनी घेतला आहे. अजून काही लेख आहेत.

AI बद्दलच्या लेखाचा शेवट


खाद्ययात्रा विभागात महाराष्ट्रातल्या ५ लोकप्रिय पदार्थांची माहिती आहे जे त्या त्या ठिकाणी ठिकाणी खूप प्रसिद्ध आहेत; पण इतरत्र फारसे मिळत नाहीत. ते वाचून लवकर तिकडे खायला जायची इच्छा होईल.

तर असा हा वैविध्यपूर्ण, वाचनीय, रंगीत, गुळगुळीत दिवाळी अंक तुम्हालाही वाचायला आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet