पुस्तक : अहिराणी गोत  (Ahirani Got)
लेखक : डॉ. सुधीर रा. देवरे (Dr. Sidhir R. Deore)
भाषा : मराठी(अहिराणी बोली) (Marathi – Ahirani Dialect)
ISBN : 978-93-82161-95-0
पाने : २१६

हे अहिराणी बोलीतलं पुस्तक आहे. म्हणजे प्रस्तावना सोडली तर पूर्ण पुस्तक अहिराणी बोलीतलं आहे. अहिराणी  महाराष्ट्र-गुजराथ सीमेजवळच्या भागात बोलली जाते. त्यामुळे गुजराथीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.हे परिच्छेद वाचून बघा.

गुजराथी “छे” सारखं इथे “शे” अाहे, चा-ची-चे ऐवजी ना-नी आहे; शाळेत, घरात ऐवजी शाळामा, घरमा अाहे, उठाडं, करी दीधं, करावा, बोलावा अशी वाक्यरचना आहे. पुलंच्या या वाक्याची मला सारखी आठवण येत होती – राज्यांच्या असतात त्या सीमा रेषा, भाषांच्या असतात त्या मीलन रेषा.  जर तुमची बोली भाषा अहिराणी नसेल, तुम्हाला गुजराथी येत नसेल किंवा फार कानावर पडली नसेल (मुंबईकरांसारखी) तर अहिराणी समजायला सुरुवातीला कठीण जाईल  पण वाचत गेलात की आपोआप सवय होईल आणि गंमत वाटेल वाचायला.

लेखकाने स्वतः पुस्तक आणि त्यामागाची भूमिका अशी समजावून सांगितली आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.

काव्यात्मक कुटं म्हणजे उखाणे/कोडी आहेत. माणून मेल्यावर दु:ख करणार्‍या ओव्या पण आहेत. त्यातही गमतीजमती आहेत. उदा.

आदिवासी, भिल्ल समाजातल्या वेगवेगळ्या देवीदेवता, त्यांचे उत्सव, पूजा इ. ची बरीच माहिती आहे. डोंगऱ्या देवाच्या उपासना विधीतला एक भाग.

उत्तर महाराष्ट्रतल्या आदिवासी, भिल्ल समजाचे साधे-सोपे पण चविष्ट आणि पौष्टिक असे पदार्थ पण दिले आहेत “अहिराणी ताटली” या लेखात. एक-दोन पदार्थ तुम्हालाही इथे वाढतो. 🙂

या समाजाच्या प्रथा-परंपरा,समाजिक स्थिती यावर चिंतनात्मक काही लेख दुसर्‍या भागात आहेत. तिसर्‍या भागात काही गोष्टी, लेखकाचे अनुभव आहेत. चौथ्यात हितोपदेश पद्धतीच्या गोष्टी आहेत. या दोन्ही भागातल्या गोष्टी फार विशेष नाहीत. माणसांची वर्णनं, गावातल्या साध्या घटना इ. आहेत. अहिराणीत आहेत हेच विशेष. बाकी काही नाही.

पहिला भाग हा ज्याला लोकससंस्कृती, चालीरीती यांच्यात खूप रस आहे, त्या संबंधी संशोधन, माहिती संकलन करत असतील त्यांच्या साठी माहितीचा खजिना आहेत. बाकीच्यांना काही पानं वाचायला बरं वाटेल, मग तितका रस वाटणार नाही. दुसर्‍या भागातलं सामाजिक चिंतन, लेखकाने भिल्ल वस्तीत जाऊन केलेलं पुस्तक प्रकाशन, अहिराणीची समृद्ध परंपरा, साहित्य परंपरेचा मागोवा प्रकारचे लेख वाचण्यासारखे आहेत. अहिराणी म्हटलं की डोळ्यासमोर बहिणाबाईंचं नाव येतं पण त्यात अस्सल अहिराणी नाही असं लेखकाचं म्हणणं आहे. या पुस्कातली भाषा वाचली की आपल्यालाही बहीणाबाईंची गाणी अहिराणी पेक्षा मराठीलाच जवळची वाटेल. असो, तो भाषाशास्त्रज्ञांचा विषय आहे.

पुस्तकात दिलेला लेखक परिचयाचा काही भाग:

एकूण पुस्तकाची कल्पना आली असेलच. चोखंदळ वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. सगळ्या भागातले थोडे थोडे लेख वाचून का होईना अहिराणीशी, खान्देश परिसरातील भिल्ल-आदिवासींच्या जीवनाशी तोंडोळख करून घ्यावी.  आपल्या जाणीवांचं क्षितीज विस्तारावं. भाषेचं, बोलींचं आकर्षण असणऱ्यांना हे पुस्तक खूप भावेल. संस्कृती अभ्यासकांना खूप माहितीपूर्ण वाटेल. 

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

<a href=”https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/”>https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/</a>

&nbsp;