पुस्तक – અંબાજી એક્સપ્રેસ अंबाजी एक्प्रेस (Ambaji Express)
भाषा – ગુજરાતી गुजराथी Gujarati
लेखिका – અર્ચના દેસાઈ अर्चना देसाई Archana Desai
पाने – ? (स्टोरीटेल वर ऐकायला दोन तास)
ISBN – दिलेला नाही
हे गुजराती पुस्तक मी “स्टोरीटेल”वर ऐकलं. एक छान कौटुंबिक आणि प्रेम कहाणी आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीय कुटुंबात आई आणि मुलगी अशा दोघीच आहे. आई टिपिकल गुजराती पण आता न्यूयॉर्कमध्ये भारतीय जेवणाचं छोटं रेस्टोरंट चालवते आहे. तिच्या श्रद्धाळू स्वभावाला अनुसरून ती देवीला नवस बोलते की, “माझी मुलगी – जागृती – डॉक्टर झाली तर जागृती चालत तुझ्या दर्शनाला येईल”. ते ही मुलीला ना विचारता; ना सांगता. जागृती डॉक्टर होते आणि रिझल्ट लागल्या लागल्या ह्या नवसाचा बॉम्ब तिच्या डोक्यावर पडतो. मग आई-मुलीचा थोडा वाद होतो. पण आई, मावशी वगैरे घरची मंडळी तिला असं काही करू देत नाहीत.
तेवढ्यात तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड पण तिच्याबरोबर चालत यात्रा करायला तयार होतो. त्याला हे सगळं – कुटुंबाचं प्रेम, ही आस्था वगैरे सगळं खूप क्युट वाटत असतं.
जागृतीची मैत्रीण तिला शक्कल सुचवते की तू आईला सांग कि तुझा अमेरिकन बॉयफ्रेंड तिला चालणार असेल तरच ती हे करेल. आई कशीबशी त्याला तयार होते आणि हे दोघे भारतात मावशीकडे येतात.
मग पुढे काय काय होतं .. जुने मित्र, कुटुंबातले दुरावलेले नातेवाईक भेटतात, चालत जाताना त्रास होतो. तिच्या आणि आसपासच्या सगळ्या पात्रांत त्यातून एक नवीन विचारसंगती तयार होते. लग्न, प्रेम, नातेसंबंध, श्रद्धा ह्या सगळ्याबद्दल आपापली मतं नव्याने चाचपून बघतात. जुना मित्र भेटतो. तो बॉयफ्रेंड असेल का ? प्रेमाचा त्रिकोण तयार होईल का नाही ? हे मी सांगत नाही.
एकूण सुखांत शेवट आहे. पण पुढे काय घडू शकेल ह्याबद्दल वेगवेगळे पर्याय खुले ठेवत कथा संपते. गोष्टीत बरेच कच्चे दुवेही आहेत. काही पात्रं पूर्वी तशी का वागली हे काळत नाही. आणि अचानक वागण्यात बदल कसा झाला ते कळत नाही.
पण एक हलकीफुलकी मनोरंजक कथा. ऐकायला चांगली आहे. स्टोरीटेल वरच्या सगळ्या अभिवाचकांचं सादरीकरण, पार्श्वसंगीत अतिशय योग्य आणि आकर्षक. त्यामुळे ऐकायला मजा येते.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–