पुस्तक :- બહેરો હસે બે વાર (बहेरो हसे बे वार)
लेखक :- તારક મહેતા (तारक मेहता)
भाषा :- ગુજરાતી (गुजराती)
“तारक मेहता का उल्टा चश्मा” ही लोकप्रिय हिंदी मालिका ज्यांच्या लेखनावर आधारित आहेत ते लेखक म्हणजे तारक मेहता. “दुनियाने उंधा चश्मा” या नावने एक गुजराती विनोदी लेखमालिका ते “चित्रलेखा” मासिकात लिहितात.
या तारक मेहतांच्या विनोदी लेखांचा संग्रह “बहेरो हसे बे वार”. हे लेख साधारण नव्वदीच्या दशकातले असावेत. कारण यतले बरेचसे लेख राजकारणावर आधारलेले अहेत आणि त्यात रजीव गांधी, आघाडी सरकारं, तत्कालीन निवडणुका, वाढता भ्रष्टाचार, महागाई इ. चा संदर्भ येतो.
“..उल्ट चश्मा” जितकी खळखळून हसायला लावते किंवा मेहतांच्या आधी वाचलेल्या विनोदी कादंबऱ्या जितक्या खुसखुशीत वाटल्या तितके हे लेख नाहीत. तेव्हाचे संदर्भ मला माहित नसतील हे एक कारण असेल. आणि संदर्भ माहीत असला तरी एखाद्या ताज्या घटनेवर लिहिलं जाणारं लेखन ती गोष्ट जुनी झाल्यावर तितकंच अपील होईल असं नाही. हे देखील एक कारण असावं.
त्यामुळे तारक मेहता या नावाच्या वलयापोटी खूप हसायच्या तयारीने हे लेख वाचायला घेतले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त.
————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
————————————————————
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
———————————————————————————-