पुस्तक : भारतीय उद्योगातले ऑनलाईन आयडॉल्स (Bharatiya Udyogatale Online Idols)

लेखिका : अनुराधा गोयल (Anuradha Goyal)

भाषा : मराठी (Marathi)

मूळ पुस्तक : The Mouse Charmer (द माउस चार्मर)

मूळ पुस्तकाची भाषा : इंग्रजी (English) 

अनुवादिका :शुभदा पटवर्धन (Shubhada Patwardhan)

पाने : 211

ISBN : 978-93-86493-16-3

भारतात इंटरनेटचा प्रसार वाढत आहे. त्यामुळेच इंटरनेटवर आधारित आधारित उद्योगांची नवोद्यमिंची (Startups)संख्यादेखील वाढत आहे. ग्रामीण भागाचं माहित नाही; पण शहरी-निमशहरी भागात काही सेवा घेण्यासाठी आता पावलं दुकानांकडे न वळता इंटरनेट कडेच वळतात. भारतीयांना ही सवय लावणाऱ्या, भारतातल्या उद्योजकांनी सुरू केलेल्या अशा काही आंतरजाल आधारित उद्योगांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. 

लेखिका आणि अनुवादिका यांची पुस्तकात दिलेली महिती:

लेखिकेने बऱ्याच कंपन्यांचा अभ्यास केला आणि त्यातून पुस्तकासाठी काही ठराविक कंपन्या का निवडल्या निवडल्या हे लेखिकेने मनोगतात स्पष्ट केलं आहे.

या पुस्तकात कुठल्या कंपन्यांचा समावेश केला आहे ते अनुक्रमाणिकेवरून कळेल.

साधारणपणे पुस्तकात दिलेली महिती अशी आहे –  व्यवसायाचे साधारण स्वरूप काय आहे; कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात; व्यवसायाची सुरुवात कशी झाली, उतपन्न कुठून येतं, त्यांना असणारी भविष्यातली आव्हानं, या क्षेत्रात विस्तारण्यासाठी अजून उपलब्ध असलेल्या संधी अशी मांडणी आहे. इ.

या पुस्तकात कंपन्यांची माहिती कशा पद्धतीने दिली आहे यावर एक नजर टाकूया. फ्लिपकार्ट च्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल 

या कंपन्यांचं बिजनेस मॉडेल कसं असतं; कंपन्या, ग्राहक आणि अंतर्गत व बाह्य सेवा पुरवठादार यांचे परस्पर संबंध कसे असतात हे दाखवणारे काही तक्ते पुस्तकात आहेत उदाहरणार्थ बिग बास्केट चा बिजनेस फ्लो

प्रत्येक कंपनीला आपला बिझनेस वाढवण्यासाठी जशी स्पर्धकांची आव्हान आहेत तशीच ती त्यांच्या क्षेत्रात अंगभूत जोखमींची सुद्धा आहेत. उदाहरणार्थ गेम्स टू विन या कंपनीच्या आव्हानांबदल

या कंपन्या नफा मिळवण्यासाठी जागरूक आहेत तशाच समाजोपयोगी उपक्रमांबद्दलसुद्धा जागरूक आहेत. काहीवेळा समाजसेवा म्हणून अशा उपक्रमांना आर्थिक पाठबळ देतात तर काही वेळा सामाजिक प्रश्न हाताळणं आणि स्वतःच्या उद्योगा इकडे लोकांना वाळवणं हे दोन्ही एकत्रित साधलं जातं. उदाहरणार्थ “शादी डॉट कॉम” चा हा हुंडाविरोधी उपक्रम.

या पुस्तकात ज्या उद्योगांची माहिती आहे त्यातले बहुतेक उद्योग आता शहरी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले आहेत. त्यामुळे वेबसाईटवर काय सुविधा मिळतात, त्या सुविधांसाठी पेमेंटचे कुठले पर्याय आहेत, लोकांना आपली मतं फीडबॅक च्या स्वरूपात मांडण्याचे पर्याय उपलब्ध आहेत इ. सगळी माहिती आधीपासूनच असेल. त्यामुळे तीच माहिती पुन्हा पुस्तकात वाचताना काही मजा येत नाही. कॉम्प्युटरच्या पडद्यावर जे दिसतं ते सगळ्यांनाच माहिती आहे पण पडद्यामागे काय घडतं ते या पुस्तकात समजावून सांगितलं असेल अशी माझी अपेक्षा होती. पण पडद्यामागचा भाग फार खोलात जाऊन सांगितलेला नाही. माहिती फारच जुजबी, वरवरची आणि कोणालाही साधारण अंदाज लावता येईल अशीच आहे. उदाहरणार्थ, वेबसाईटवर जाहिराती दाखवून पैसे मिळतात. लोकांना काय हवंय याबाबत सतत सुधारणा केल्यामुळे लोक त्या वेबसाईट कडे पुन्हा पुन्हा येत राहतात. इत्यादी. त्यामुळे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ह्या “नावीन्यपूर्ण बिजनेस मॉडेल्स” मधून “स्टार्टअपना शिकण्यासारखं बरंच काही” असलं तरी या पुस्तकातून तरी ते काही खास शिकता नाही हे मात्र खरं. पुस्तक वाचून फार माहिती हाताशी लागली, ज्ञानात भर पडली असं होत नाहीये.

अनुवाद चांगला झाला आहे. तांत्रिक गोष्टी मराठीतून मांडताना किती मराठीकरण करायचं ते ठरवणं जरा कठीण जात असेल. कारण “कच्चा माल पुरवठादार मंच” असं वाचल्यावर “क्काय?? म्हणजे रॉ मटेरियल सप्लायर प्लॅटफॉर्म का? मग असं मराठीत सांगा नं !” अशी प्रतिक्रिया उमटू शकते. ही अवस्था लक्षात घेता पुस्तकात योग्य ते मराठीकरण केलं आहे. इंग्रजी शब्दसुद्धा बरेच ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे ” इंग्रजीपेक्षा मराठीत समजायला सोपं पण काही शब्द मराठीपेक्षा इंग्रजीत सोपे” अशी अवस्था असणाऱ्या वाचकांनाही पुस्तक “जड” वाटणार नही.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-