पुस्तक – Chakravyuvh of Corona (चक्रव्यूह ऑफ कोरोना)

लेखिका – Madhuri Lele (माधुरी लेले)
भाषा – English (इंग्रजी )
पाने – १३६
ISBN – 978-81-950875-6-3
माझी आत्या माधुरी लेले हिने लिहिलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ८२ पानांमध्ये एक दीर्घकथा आहे. एका उद्योग घराण्यातली व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. आणि त्या साताठ दिवसात हॉस्पिटलमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती बघून त्याचं मन संवेदनशील होतं. असं कथाबीज आहे. त्यातली ही एकदोन पानं.
उरलेल्या पानांमध्ये वेगवेगळ्या लोकांचे कोरोनाबद्दलचे लेख आहेत. छोट्यामोठ्या कंपन्यांचे सीईओ, डॉकटर, समाजसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, शालेय विद्यार्थी  यांचे १-२ पानी लेख आहेत.
उदा.
गोष्ट ठीक आहे पण ती खूप उत्कंठावर्धक अशी नाही. विवेक या पात्रात झालेला बदल खूपच पटकन झालेला वाटतो. ते अजून रंगवता आलं असतं तर त्याचा परिणाम जाणवला असता. आणि हॉस्पिटल मधून त्याने पुढे मोठं काम करायचं ठरवलं आणि माहिती गोळा केली वगैरे कळतं पण पुढे त्याचे नक्की काय झालं काही समजत नाही त्यामुळे गोष्ट अर्धवट सोडल्यासारखी वाटते.
दुसऱ्या भागात वेगवेळ्या लोकांचे लेख आहेत. पण बहुतांश लेखांमध्ये तेच तेच मुद्दे आले आहेत उदा. लॉकडाऊन कसं झालं, कामाची पद्धत कशी बदली, स्वच्छतेची पद्धत कशी बदलली, ऑनलाईन शिक्षण इत्यादी इत्यादी. पुस्तकाचे वाचक सुद्धा सध्या या गोष्टी स्वतः अनुभवत आहेत. आजूबाजूला बघत आहेत. त्यामुळे पुन्हा त्या लोकांच्या तोंडून हे वाचण्याचं प्रयोजन कळत नाही.
त्याऐवजी एकच लेख केला असता आणि त्यात मध्ये मध्ये लोकांची वक्तव्ये घातली असती तर एक मुद्देसूद लेख तयार झाला असता आणि 2020 ची परिस्थिती काय होती याचा सारांश मांडला असं तरी वाटलं असतं.  आता पुढे काय करता येईल याचे मुद्दे घालता आले असते, काही नव्या कल्पना मांडता आल्या असत्या तर काही वेगळेपणा आला असता. पुस्तकाचं नाव आणि उपशीर्षक यातून तयार होणाऱ्या अपेक्षांची पूर्तता हे पुस्तक करत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet