(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

“चिन्नच् चिन्न आसै” अर्थात “रोजा” चित्रपटातील “दिल है छोटासा” चे मूळ गाणे

சின்னச் சின்ன ஆசை சிறகடிக்கும் ஆசை (चिन्नच् चिन्न आसै सिऱगडिक्कुम् आसै)
लहान लहान इच्छा… पंख फडफडवणाऱ्या इच्छा
முத்து முத்து ஆசை முடிந்து வைத்த ஆசை (मुत्तु मुत्तु आसै मुडिन्दु वैत्त आसै)
मोत्यासारख्या इच्छा…जपून ठेवलेल्या इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை (वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै)
शुभ्र चन्द्राला स्पर्शून चुंबन घेण्याची इच्छा
என்னை இந்த பூமி சுற்றி வர ஆசை (एन्नै इन्द बूमि सुट्रि वर आसै)
ही भूमी माझ्या भोवती फिरो अशी इच्छा

மல்லிகைப் பூவாய் மாறிவிட ஆசை (मल्लिगैप् पूवाय् माऱिविड आसै)
मोगऱ्याच्या फुलात रूपांतर व्हावे अशी इच्छा
தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை (तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै)
वारा पकडून त्याची माळ बनवण्याची इच्छा
மேகங்களையெல்லாம் தொட்டுவிட ஆசை (मेगंगळैयॆल्लाम् तॊट्टुविड आसै)
सर्व मेघांना स्पर्शण्याची इच्छा
சோகங்களையெல்லாம் விட்டுவிட ஆசை (सोगंगळैयॆल्लाम् विट्टुविड आसै)
दुःख सारी सोडून देण्याची इच्छा
காா்குழலில் உலகை கட்டிவிடஆசை (कार्गुऴलिल् उलगै कट्टिविट आसै)
केशसंभारात हे जग बांधून ठेवायची इच्छा

சின்னச் சின்ன ஆசை சிறகடிக்கும் ஆசை (चिन्नच् चिन्न आसै सिऱगडिक्कुम् आसै)
लहान लहान इच्छा… पंख फडफडवणाऱ्या इच्छा
முத்து முத்து ஆசை முடிந்து வைத்த ஆசை (मुत्तु मुत्तु आसै मुडिन्दु वैत्त आसै)
मोत्यासारख्या इच्छा…जपून ठेवलेल्या इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை (वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै)
शुभ्र चन्द्राला स्पर्शून चुंबन घेण्याची इच्छा
என்னை இந்த பூமி சுற்றி வர ஆசை (एन्नै इन्द बूमि सुट्रि वर आसै)
ही भूमी माझ्या भोवती फिरो अशी इच्छा

சின்னச் சின்ன ஆசை சிறகடிக்கும் ஆசை (चिन्नच् चिन्न आसै सिऱगडिक्कुम् आसै)
लहान लहान इच्छा… पंख फडफडवणाऱ्या इच्छा
முத்து முத்து ஆசை முடிந்து வைத்த ஆசை (मुत्तु मुत्तु आसै मुडिन्दु वैत्त आसै)
मोत्यासारख्या इच्छा…जपून ठेवलेल्या इच्छा

சேற்று வயல் ஆடி நாற்று நட ஆசை (सेट्रु वयल् आडि नाट्रु नड आसै)
शेतातल्या चिखलात नाचत रोपे लावण्याची इच्छा
மீன்பிடித்து மீண்டும் ஆற்றில் விட ஆசை (मीन्पिडित्तु मीण्डुम् आट्रिल् विड आसै)
मासा पकडून पुन्हा त्याला पाण्यात सोडण्याची इच्छा
வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக் கொள்ள ஆசை (वानविल्लैक् कॊंजम् उडुत्तिक् कॊळ्ळ आसै)
इंद्रधनुष्य जरा परिधान करण्याची इच्छा
பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக் கொள்ள ஆசை (पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक् कॊळ्ळ आसै)
दवबिंदूंमध्ये मीसुद्धा पहुडले असें अशी इच्छा
சித்திரத்து மேலே சேலை கட்ட ஆசை (सित्तिरत्तु मेले सेलै कट्ट आसै)
चैत्रानंतर साडी नेसण्याची इच्छा (विवाहित होण्याची इच्छा)

சின்னச் சின்ன ஆசை சிறகடிக்கும் ஆசை (चिन्नच् चिन्न आसै सिऱगडिक्कुम् आसै)
लहान लहान इच्छा… पंख फडफडवणाऱ्या इच्छा
முத்து முத்து ஆசை முடிந்து வைத்த ஆசை (मुत्तु मुत्तु आसै मुडिन्दु वैत्त आसै)
मोत्यासारख्या इच्छा…जपून ठेवलेल्या इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை (वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै)
शुभ्र चन्द्राला स्पर्शून चुंबन घेण्याची इच्छा
என்னை இந்த பூமி சுற்றி வர ஆசை (एन्नै इन्द बूमि सुट्रि वर आसै)
ही भूमी माझ्या भोवती फिरो अशी इच्छा

சின்னச் சின்ன ஆசை சிறகடிக்கும் ஆசை (चिन्नच् चिन्न आसै सिऱगडिक्कुम् आसै)
लहान लहान इच्छा… पंख फडफडवणाऱ्या इच्छा
முத்து முத்து ஆசை முடிந்து வைத்த ஆசை (मुत्तु मुत्तु आसै मुडिन्दु वैत्त आसै)
मोत्यासारख्या इच्छा…जपून ठेवलेल्या इच्छा

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link