पुस्तक : Classic Horror Stories (क्लासिक हॉरर स्टोरीज)
लेखक: अनेक लेखकांच्या कथांचा संग्रह
भाषा : English (इंग्रजी)
पाने: २४०
ISBN : 978-93-5012-172-6
वेगवेगळ्या इंग्रजी लेखकांच्या भयकथा/भूतकथा यांचा हा संग्रह आहे.
“क्लासिक मास्टर्स”नी लिहिलेल्या कथांचा संग्रह असं मुखपृष्ठावर वाचल्याने “भीतभीतच” पुस्तक घेतले आणि वाचले. पण दोन तीन कथा वाचल्यातरी भीती अशी काही वाटली नाही. भयकथांपेक्षाही त्या रहस्यकथा किंवा गूढकथा जास्त वाटल्या. त्या वाचतनाही खूप मजा अशी आली नाही. त्यामुळे कंटाळून पुस्तक अर्धवटच सोडलं. म्हणून हे पुस्तकाचं परीक्षण म्हणत नाही तर पुस्तक ओळख आहे असं म्हणतो. आणि अधिक काही लिहीत नाही.