पुस्तक – क्रिककथा दिवाळी अंक २०२३ (Crickatha Diwali Ank 2023)
संपादक – कौस्तुभ चाटे (Kaustubh Chate)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १२४
प्रकाशन – अतुल गद्रे. crickatha.com २०२३
ISBN – दिलेला नाही
छापील किंमत – ३००/- रु.
क्रिकेट ह्या विषयाला वाहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकाचं हे तिसरं वर्ष. भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेट बद्दल हा अंक असल्यामुळे नियमित वाचक नसणाऱ्यांनाही वाचायला आवडेल अशी ही संकल्पना आहे. ह्यात बरेच लेख आहेत, मुलाखती आहेत इतकंच काय शब्दकोडे आणि व्यंगचित्रं पण आहेत. सर्व काही क्रिकेट भोवती गुंफलेलं. त्यातही वैशिष्टय म्हणजे क्रिकेटविश्वाचा विविधअंगानी वेध घेतला आहे. आजच्या क्रिकेट बद्दल आहे तसंच जुन्या काळातल्या क्रिकेटबद्दल आहे. एकदिवसीय, वीसवीस, कसोटी ह्या प्रकारांबद्दलचे लेख आहेत. आंतरराष्ट्रीय, रणजी पासून शिवाजी पार्क सारख्या क्लब पर्यंतच्या क्रिकेटबद्दल आहे. महिला क्रिकेट बद्दल आहे. जुन्या प्रथितयश खेळाडूंबद्दल लिहिलं आहे तसंच उगवत्या ताऱ्यांबद्दल सुद्धा. क्रिकेट मध्ये वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक उपकरणांबद्दल लेख आहे. ह्या अंकाची अजून एक जमेची फक्त खेळ आणि खेळाडू ह्यांपुरतं लेखन सीमित नाही. खेळाडूंना मदत करणारे फिटनेस ट्रेनर, समालोचक, क्रिकेट संघटना पदाधिकारी ह्यांच्याशी सुद्धा संवाद साधला आहे. त्यातून पडद्यामागच्या लोकांचे कर्तृत्व, महत्त्व आणि त्यांचे अनुभव आपल्याला वाचता येतात.
पुण्यात एक क्रिकेट संग्रहालय सुरु आहे. त्याबद्दल माहिती आहे
क्रिकेटचा देव – सचिन तेंडुलकर – वयाची ५० वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त एका खास विभागात सचिनच्या आठवणी, त्याच्या बद्दलच्या भावना अनेकांनी लेखांतून मांडल्या आहेत.
ह्या अंकात घेतलेल्या काही मुलाखती आणि काही जादाचा मजकूर क्रिककथा च्या वेबसाईटवर आहे. त्याचे QR कोड देण्याचा वेगळा प्रयोग ह्यात केला आहे.
अंकात भरपूर लेख आहेत. त्यामुळे सगळ्यांबद्दल सांगणं कठीण आहे. पण अनुक्रमणिकेवरून तुमच्या लक्षात येईलच. काही लेखांची उदाहरणेही देतो.
क्रिकेटवेडे असाल तर हे सगळं वाचायला, त्याबद्दल बोलायला , चर्चा करायला आवडेलच. फार क्रिकेट न बघणारे असाल – माझ्यासारखे – तरी ह्या क्षेत्रातले किस्से, तांत्रिक माहिती, मुलाखती, पूरक माहिती सुद्धा रंजक आणि ज्ञानवर्धक आहे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
क्रिकेटप्रेमी असाल तर – आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी – जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
<a href=”https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/”>https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/</a>
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
<a href=”https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe”>https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe</a>