(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

என் காதலே என் காதலே (एन् कादले एन् कादले )
माझ्या प्रिये माझ्या प्रिये
என்னை என்ன செய்ய போகிறாய் (एन्नै एन्न सॆय्य पोगिराय् )
तू मला(माझं) काय करणार आहेस ?
நான் ஓவியன் என்று தெரிந்தும் நீ (नान् ओवियन् एन्रु तॆरिन्दुम् नी )
मी एक चित्रकार हे माहित असूनही तू
ஏன் கண்ணிரெண்டை கேட்கிறாய் (एन् कण्णिरॆण्डै केट्किराय् )
माझे दोन्ही डोळेच मागते आहेस
சிலுவைகள் சிறகுகள் (सिलुवैकळ् सिरगुगळ् )
क्रूस आणि पंख
ரெண்டில் என்ன தர போகிறாய் (रॆण्डिल् एन्न तर पोगिराय् )
दोन्हीमधले काय देणार आहेस
கிள்ளுவதை கிள்ளி விட்டு (किळ्ळुवदै किळ्ळि विट्टु )
चिमटा काढायचा तिथे (हळव्या मनाला) चिमटे काढून
ஏன் தள்ளி நின்று பார்க்கிறாய் (एSन् तळ्ळि निन्रु पार्क्किराय् )
बाजूला उभी राहून का बघते आहेस

என் காதலே என் காதலே (एन् कादले एन् कादले )
माझ्या प्रिये माझ्या प्रिये
என்னை என்ன செய்ய போகிறாய் (एन्नै एन्न सॆय्य पोगिराय् )
तू मला(माझं) काय करणार आहेस ?
நான் ஓவியன் என்று தெரிந்தும் நீ (नान् ओवियन् एन्रु तॆरिन्दुम् नी )
मी एक चित्रकार हे माहित असूनही तू
ஏன் கண்ணிரெண்டை கேட்கிறாய் (एन् कण्णिरॆण्डै केट्किराय् )
माझे दोन्ही डोळेच मागते आहेस

காதலே நீ பூ எறிந்தால் (कादले नी पू ऎरिन्दाल् )
प्रिये, तू जर फूल फेकलेस
எந்த மலையும் கொஞ்சம் குழையும் (ऎन्द मलैयुम् कॊंजम् कुळैयुम् )
तर कुठलाही पर्वतसुद्धा थोडा हलेल
காதலே நீ கல் எறிந்தால் (कादले नी कल् ऎरिन्दाल् )
प्रिये, तू जर दगड मारलास
எந்த கடலும் கொஞ்சம் கலங்கும் (ऎन्त कटलुम् कॊंजम् कलंगुम् )
तर कुठलाही समुद्रसुद्धा उसळेल

இனி மீள்வதா (इनि मीळ्वदा)
आता पुन्हा सावरायचे
இல்லை வீழ்வதா (इल्लै वीळ्वदा )
का खाली कोसळायचे
உயிர் வாழ்வதா (उयिर् वाळ्वदा)
प्राण जगावा
இல்லை போவதா (इल्लै पोवदा )
का जावा
அமுதென்பதா விஷம் என்பதா (अमुदॆन्बदा विषम् एन्बदा )
काय अमृत ? काय विष ?
உன்னை அமுதவிஷமென்பதா (उन्नै अमुतविषमॆन्बदा)
का हेच तुझे अमृतासारखे विष

என் காதலே என் காதலே (एन् कादले एन् कादले )
माझ्या प्रिये माझ्या प्रिये
என்னை என்ன செய்ய போகிறாய் (एन्नै एन्न सॆय्य पोगिराय् )
तू मला(माझं) काय करणार आहेस ?
நான் ஓவியன் என்று தெரிந்தும் நீ (नान् ओवियन् एन्रु तॆरिन्दुम् नी )
मी एक चित्रकार हे माहित असूनही तू
ஏன் கண்ணிரெண்டை கேட்கிறாய் (एन् कण्णिरॆण्डै केट्किराय् )
माझे दोन्ही डोळेच मागते आहेस

காதலே உன் காலடியில் (कादले उन् कालडियिल् )
प्रिये तुझ्या पायांशी
நான் விழுந்து விழுந்து தொழுதேன் (नान् विऴुन्दु विऴुन्दु तॊऴुदेन् )
मी डोके ठेवून ठेवून प्रार्थना केली
கண்களை நீ மூடிக்கொண்டால் (कण्कळै नी मूटिक्कॊण्टाल् )
डोळे तू मिटून घेतलेस
நான் குலுங்கி குலுங்கி அழுதேன் (नान् कुलुंगि कुलुंगि अऴुदेन् )
मी हमसाहमशी रडलो
இது மாற்றமா (इडु माट्रमा)
हा बदल आहे
தடுமாற்றமா (तडुमाट्रमा )
का अडथळा
என் நெஞ்சிலே (एन् नॆंजिले )
माझ्या हृदयात
பனி மூட்டமா (पऩि मूट्टमा )
हे (शंकेचं)धुकं पसरलं आहे का ?

நீ தோழியா இல்லை எதிரியா (नी तोऴिया इल्लै ऎदिरिया )
तू मैत्रीण आहेस की वैरीण
என்று தினமும் போராட்டமா (एन्रु दिनमुम् पोराट्टमा )
असल्यासारखे रोजरोज लढाई

என் காதலே என் காதலே (एन् कादले एन् कादले )
माझ्या प्रिये माझ्या प्रिये
என்னை என்ன செய்ய போகிறாய் (एन्नै एन्न सॆय्य पोगिराय् )
तू मला(माझं) काय करणार आहेस ?
நான் ஓவியன் என்று தெரிந்தும் நீ (नान् ओवियन् एन्रु तॆरिन्दुम् नी )
मी एक चित्रकार हे माहित असूनही तू
ஏன் கண்ணிரெண்டை கேட்கிறாய் (एन् कण्णिरॆण्डै केट्किराय् )
माझे दोन्ही डोळेच मागते आहेस

சிலுவைகள் சிறகுகள் (सिलुवैकळ् सिरगुगळ् )
क्रूस आणि पंख
ரெண்டில் என்ன தர போகிறாய் (रॆण्डिल् एन्न तर पोगिराय् )
दोन्हीमधले काय देणार आहेस
கிள்ளுவதை கிள்ளி விட்டு (किळ्ळुवदै किळ्ळि विट्टु )
चिमटा काढायचा तिथे (हळव्या मनाला) चिमटे काढून

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe