(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
तंगमगन ह्या चित्रपटातलं एका नवविवाहितेच्या भावनांवरचं हे गाणं आहे.
என்ன சொல்ல ஏது சொல்ல (एन्न सॊल्ल एदु सॊल्ल)
काय बोलू, कसं बोलू
கண்ணோடுக் கண் பேச வார்த்தயில்ல (कण्णोडुक् कण् पेस वार्त्तयिल्ल)
डोळ्यांशी डोळे बोलतात, शब्द नाहीत
என்னென்னவோ உள்ளுக்குள்ள (एन्नेन्नवो उळ्ळुक्कुळ्ळ)
काय काय वाटतंय माझ्या मनात
வெள்ளச் சொல்லாம என் வெட்கம் தள்ள (वॆळ्ळच् सॊल्लाम एन् वॆट्कम् तळ्ळ)
उघडपणे सांगायला वाटते लाज
சின்னச் சின்ன ஆச உள்ள (चिन्नच् चिन्न आस उळ्ळ)
छोट्या छोट्या इच्छा आत आहेत
திக்கித் திக்கிப் பேச (तिक्कित् तिक्किप् पेस)
मी अडखळत बोलत सांगत आहे
மல்லிகப்பூ வாசம் (मल्लिगप्पू वासम्)
मोगऱ्याचा वास
கொஞ்சம் காத்தோட வீச (कॊंजम् कात्तेाड वीस)
जरा वाऱ्याबरोबर वाहत आहे
உத்து உத்துப் பார்க்க (उत्तु उत्तुप् पार्क्क)
(तुझी) नजर जेव्हा शोध घेते
நெஞ்சில் முத்து முத்தா வோ்க்க (नॆंजिल् मुत्तु मुत्ता वेर्क्क)
छातीत घर्मबिंदू दाटतात
புத்தம் புது வாழ்க்க (पुत्तम् पुदु वाऴ्क्क)
नवे कोरे आयुष्य
என்ன உன்னோடச் சோ்க்க (एन्न उन्नोड सेर्क्क)
मला तुझ्याशी जोडून घेते
என்னோடு நீ உன்னோடு நான் (एन्नोडु नी उन्नोडु नान्)
माझ्याशी तू , तुझ्याशी मी
ஒன்றோடு நாம் ஒன்றாகும் நாள் (ऒन्ऱोडु नाम् ऒन्ऱागुम् नाळ्)
एकमेकांशी आपण एकरूप होऊ तो दिवस
என்னோடு நீ உன்னோடு நான் (एन्नोडु नी उन्नोडु नान्)
माझ्याशी तू , तुझ्याशी मी
ஒன்றாகும் நாள் (ऒन्ऱागुम् नाळ्)
एकरूप होऊ तो दिवस

சொல்லாமல் கொள்ளாமல் (सॊल्लामल् कॊळ्ळामल्)
न सांगता सवरता
நெஞ்சோடு காதல் சேர (नॆंजोडु कादल् सेर)
हृदयात प्रेम उमटते
நெஞ்சோடு காதல் சேர (नॆंजोडु कादल् सेर)
हृदयात प्रेम उमटते
மூச்சு முட்டுதே (मूच्चु मुट्टुदे)
माझा श्वास रोखला जातो
இந்நாளும் எந்நாளும் (इन्नाळुम् एन्नाळुम्)
आज आणि कायम
கை கோர்த்துப் போகும் பாதை (कै कोर्त्तुप् पोगुम् पादै)
हातात हात घालून चालायची वाट
கை கோர்த்துப் போகும் பாதை (कै कोर्त्तुप् पोगुम् पादै)
हातात हात घालून चालायची वाट
கண்ணில் தோன்றுதே (कण्णिल् तोन्ऱुदे)
डोळ्यासमोर दिसते आहे
சொல்லாத எண்ணங்கள் பொல்லாத ஆசைகள் (सॊल्लाद एण्णंगळ् पॊल्लाद आसैगळ्)
सांगता येणार नाहीत असे विचार, अवखळ इच्छा
உன்னாலே சேருதே பாரம் கூடுதே (उन्नाले सेरुदे बारम् कूडुदे)
तुझ्यामुळे मनात येतायत, माझ्या (मानाचं)ओझं वाढवतायत
தேடாத தேடல்கள் காணாதக் காட்சிகள் (तेडाद तेडल्गळ् काणादक् काट्चिगळ्)
न शोधलेले शोध, ना बघितलेली दृश्ये
உன்னோடு காண்பதில் நேரம் போகுதே (उन्नोडु काण्बदिल् नेरम् पोगुदे)
तुझ्या बरोबर बघताना, वेळ जातो आहे (वेळ कसा जातो कळत नाही)
சின்னச் சின்ன ஆச உள்ள (चिन्नच् चिन्न आस उळ्ळ)
छोट्या छोट्या इच्छा आत आहेत
திக்கித் திக்கிப் பேச (तिक्कित् तिक्किप् पेस)
मी अडखळत बोलत सांगत आहे
மல்லிகப்பூ வாசம் (मल्लिगप्पू वासम्)
मोगऱ्याचा वास
கொஞ்சம் காத்தோட வீச (कॊंजम् कात्तेाड वीस)
जरा वाऱ्याबरोबर वाहत आहे
உத்து உத்துப் பார்க்க (उत्तु उत्तुप् पार्क्क)
(तुझी) नजर जेव्हा शोध घेते
நெஞ்சில் முத்து முத்தா வோ்க்க (नॆंजिल् मुत्तु मुत्ता वेर्क्क)
छातीत घर्मबिंदू दाटतात
புத்தம் புது வாழ்க்க (पुत्तम् पुदु वाऴ्क्क)
नवे कोरे आयुष्य
என்ன உன்னோடச் சோ்க்க (एन्न उन्नोड सेर्क्क)
मला तुझ्याशी जोडून घेते
என்னோடு நீ உன்னோடு நான் (एन्नोडु नी उन्नोडु नान्)
माझ्याशी तू , तुझ्याशी मी
ஒன்றோடு நாம் ஒன்றாகும் நாள் (ऒन्ऱोडु नाम् ऒन्ऱागुम् नाळ्)
एकमेकांशी आपण एकरूप होऊ तो दिवस
என்னோடு நீ உன்னோடு நான் (एन्नोडु नी उन्नोडु नान्)
माझ्याशी तू , तुझ्याशी मी
ஒன்றாகும் நாள் (ऒन्ऱागुम् नाळ्)
एकरूप होऊ तो दिवस
என்னோடு நீ உன்னோடு நான் (एन्नोडु नी उन्नोडु नान्)
माझ्याशी तू , तुझ्याशी मी
ஒன்றோடு நாம் ஒன்றாகும் நாள் (ऒन्ऱोडु नाम् ऒन्ऱागुम् नाळ्)
एकमेकांशी आपण एकरूप होऊ तो दिवस
என்னோடு நீ உன்னோடு நான் (एन्नोडु नी उन्नोडु नान्)
माझ्याशी तू , तुझ्याशी मी
ஒன்றாகும் நாள் (ऒन्ऱागुम् नाळ्)
एकरूप होऊ तो दिवस
என்ன சொல்ல ஏது சொல்ல (एन्न सॊल्ल एदु सॊल्ल)
काय बोलू, कसं बोलू
கண்ணோடுக் கண் பேச வார்த்தயில்ல (कण्णोडुक् कण् पेस वार्त्तयिल्ल)
डोळ्यांशी डोळे बोलतात , शब्द नाहीत
என்னென்னவோ உள்ளுக்குள்ள (एन्नेन्नवो उळ्ळुक्कुळ्ळ)
काय काय वाटतंय माझ्या मनात
வெள்ளச் சொல்லாம என் வெட்கம் தள்ள (वॆळ्ळच् सॊल्लाम एन् वॆट्कम् तळ्ळ)
उघडपणे सांगायला वाटते लाज
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link