(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

என்னவளே அடி என்னவளே…
एन्नवळे अडि एन्नवळे (माझ्या प्रिये, अगं माझ्या प्रिये)
எந்தன் இதயத்தை தொலைத்து விட்டேன்…
एन्दन् इदयत्तै तॊलैत्तु विट्टेन् (माझं हृदय हरवून बसलो आहे)
எந்த இடம் அது தொலைந்த இடம்…
एन्द इडम् अदु तॊलैन्द इडम् (कुठे हरवले ती जागाही )
அந்த இடத்தையும் மறந்து விட்டேன்…
अन्द इडत्तैयुम् मरन्दु विट्टेन् (ती जागाही विसरून गेलो आहे)
உந்தன் கால்கொலுசில் அது தொலைந்ததென்று…
उन्दन् काल्गॊळुसिल् अदु तॊलैन्ददॆन्रु (तुझ्या पैंजणांत ते हरवले असणार)
உந்தன் காலடி தேடி வந்தேன்…
उन्दन् कालडि तेडि वन्देन् (म्हणून तुझी पावले शोधत आलो आहे )

காதலென்றால் பெரும் அவஸ்தையென்று…
कादलॆन्राल् पॆरुम् अवस्तैयॆन्रु (प्रेम म्हणजे फारच पीडादायक)
உனைக் கண்டதும் கண்டு கொண்டேன்…
उन्नै कण्डदुम् कण्डु कॊण्डेन् (हे तुला बघितल्यावर मला कळले)
எந்தன் கழுத்து வரை இன்று காதல் வந்து…
एन्दन् कळुत्तु वरै इन्रु कादल् वन्दु (आता गळ्यापर्यंत हे प्रेम येऊन (प्रेमात आकंठ बुडून)
இரு கண்விழி பிதுங்கி நின்றேன்…
इरु कण्विळि पिदुंगि निन्रेन् (माझे दोन्ही डोळे ताणून ताणून उभा राहिलो)

என்னவளே அடி என்னவளே…
एन्नवळे अडि एन्नवळे (माझ्या प्रिये, अगं माझ्या प्रिये)
எந்தன் இதயத்தை தொலைத்து விட்டேன்…
एन्दन् इदयत्तै तॊलैत्तु विट्टेन् (माझं हृदय हरवून बसलो आहे)

வாய்மொழியும் எந்தன் தாய்மொழியும்…
वाय्मॊळियुम् एन्दन् ताय्मॊळियुम् (माझं बोलणं आणि मातृभाषा)
இன்று வசப்படவில்லையடி…
इन्रु वसप्पडविल्लैयडि (आता माझ्या ताब्यात नाही)
வயிற்றுக்கும் தொண்டைக்கும் உருவமில்லா…
वयिट्रुक्कुम् तॊण्डैक्कुम् उरुवमिल्ला (पोटाशी आणि घशाशी संबंध नसणारं)
ஒரு உருண்டையும் உருலுதடி…
ऒरु उरुण्डैयुम् उरुलुदडि (काहीतरी घशात घुटमळतं आहे)

காத்திருந்தால் எதிர் பார்த்திருந்தால்…
कात्तिरुन्दाल् एदिर् पार्त्तिरुन्दाल् (वाट बघितली, आशा ठेवली तर )
ஒரு நிமிஷமும் வருஷமடி…
ऒरु निमिषमुम् वरुषमडि (एक क्षण ही वर्षासारखा वाटतो आहे)
கண்களெல்லாம் எனைப் பார்ப்பதுபோல்…
कण्गळॆल्लाम् एन्नै पार्प्पदुपोल् (सगळ्या नजारा मलाच बघत आहेत)
ஒரு கலக்கமும் தோன்றுதடி…
ऒरु कलक्कमुम् तोन्रुदडि (असा काहीतरी गोंधळ उडतो आहे)

இது சொர்க்கமா நரகமா…
इदु सॊर्क्कमा नरगमा (हा स्वर्ग आहे की नरक)
சொல்லடி உள்ளபடி…
सॊल्लडि उळ्ळपडि (मला खरं सांग)
நான் வாழ்வதும் விடைகொண்டு போவதும்…
नान् वाळ्वदुम् विडैक्कॊण्डु पोवदुम् (मी जगावं की मरावं)
உன் வார்த்தையில் உள்ளதடி…
उन् वार्त्तैयिल् उळ्ळदडि (हे तुझ्या शब्दांवर अवलंबून आहे)

என்னவளே அடி என்னவளே…
एन्नवळे अडि एन्नवळे (माझ्या प्रिये, अगं माझ्या प्रिये)
எந்தன் இதயத்தை தொலைத்து விட்டேன்…
एन्दन् इदयत्तै तॊलैत्तु विट्टेन् (माझं हृदय हरवून बसलो आहे)

கோகிலமே நீ குரல் கொடுத்தால்…
कोगिलमे नी कुरल् कॊडुत्ताल् (हे कोकिळे, तू आवाज दिलास तर)
உன்னை கும்பிட்டுக் கண்ணடிப்பேன்…
उन्नै कुंबिट्टुक् कण्णडिप्पेन् (तुझी पूजा करून डोळे मिटेन)
கோபுரமே உன்னைச் சாய்த்துக்கொண்டு…
गोपुरमे उन्नै साय्त्तुक्कॊण्डु (माझ्या गोपुरा, तुला निजवून )
உந்தன் கூந்தலில் மீன் பிடிப்பேன்…
उन्दन् कून्दलिल् मीन् पिडिप्पेन् (तुझ्या केसांमध्ये मासे पकडीन)

வெண்ணிலவே உன்னைத் தூங்கவைக்க…
वॆण्निलवे उन्नै तूंगवैक्क (हे शुभ्र चंद्रा, तुला निद्रिस्त करून)
உந்தன் விரலுக்கு சொடுக்கெடுப்பேன்…
उन्दन् विरलुक्कु सॊडुक्कॆडुप्पेन् (तुझी बोटे वाजवून बघीन (?))
வருடவரும் பூங்காற்றையெல்லாம்…
वरुडवरुम् पूंगाट्रैयॆल्लाम् (वर्षभर फुलांचे सुगंधी वारे)
கொஞ்சம் வடிகட்டி அனுப்பிவைப்பேன்…
कॊंजम् वडिकट्टि अनुप्पिवैप्पेन् (निवडून पाठवेन)

என் காதலின் தேவையை…
एन् कादलिन् तेवैयै (माझ्या प्रेमाच्या गरजा)
காதுக்குள் ஓதிவைப்பேன்…
कादुक्कुळ् ओदिवैप्पेन् (कानात हळुवारपणे सांगेन)
உன் காலடி எழுதிய கோலங்கள்…
उन् कालडि एळुदिय गोलंगळ् (तुझी पावले ज्या रांगोळ्या काढते)
புதுக் கவிதைகள் என்றுரைப்பேன்…
पुदु कविदै एन्रुरैप्पेन् (त्या नवीन कवितांसारख्या म्हणेन)

என்னவளே அடி என்னவளே…
एन्नवळे अडि एन्नवळे (माझ्या प्रिये, अगं माझ्या प्रिये)
எந்தன் இதயத்தை தொலைத்து விட்டேன்…
एन्दन् इदयत्तै तॊलैत्तु विट्टेन् (माझं हृदय हरवून बसलो आहे)
எந்த இடம் அது தொலைந்த இடம்…
एन्द इडम् अदु तॊलैन्द इडम् (कुठे हरवले ती जागाही )
அந்த இடத்தையும் மறந்து விட்டேன்…
अन्द इडत्तैयुम् मरन्दु विट्टेन् (ती जागाही विसरून गेलो आहे)
உந்தன் கால்கொலுசில் அது தொலைந்ததென்று…
उन्दन् काल्गॊळुसिल् अदु तॊलैन्ददॆन्रु (तुझ्या पैंजणांत ते हरवले असणार)
உந்தன் காலடி தேடி வந்தேன்…
उन्दन् कालडि तेडि वन्देन् (म्हणून तुझी पावले शोधत आलो आहे )

காதலென்றால் பெரும் அவஸ்தையென்று…
कादलॆन्राल् पॆरुम् अवस्तैयॆन्रु (प्रेम म्हणजे फारच पीडादायक)
உனைக் கண்டதும் கண்டு கொண்டேன்…
उन्नै कण्डदुम् कण्डु कॊण्डेन् (हे तुला बघितल्यावर मला कळले)
எந்தன் கழுத்து வரை இன்று காதல் வந்து…
एन्दन् कळुत्तु वरै इन्रु कादल् वन्दु (आता गळ्यापर्यंत हे प्रेम येऊन (प्रेमात आकंठ बुडून)
இரு கண்விழி பிதுங்கி நின்றேன்…
इरु कण्विळि पिदुंगि निन्रेन् (माझे दोन्ही डोळे ताणून ताणून उभा राहिलो)

என்னவளே அடி என்னவளே…
एन्नवळे अडि एन्नवळे (माझ्या प्रिये, अगं माझ्या प्रिये)
எந்தன் இதயத்தை தொலைத்து விட்டேன்…
एन्दन् इदयत्तै तॊलैत्तु विट्टेन् (माझं हृदय हरवून बसलो आहे)

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe