गेशा म्हणजे जपान मधील नर्तिका. आपल्याकडे बऱ्याच वेळा गैरसमजापोटी त्यांना वेश्या समजलं जातं. माझाही हा गैरसमज या पुस्यकाच्या वाचनातून दूर झाला.

त्या जपानी पारंपारिक चहापानाच्या प्रसंगी पाहुण्यांना आदबीने चहा देणे, त्यांच्याशी गप्पा मारून वातावरण प्रसन्न करणे, पारंपारिक नृत्त्य सादर करणे हा त्यांचा व्यवसाय.

त्यासाठी या मुलींना लहानपणा पासून अतिशय कठोर मेहनत करावी लागते. आतिशय वजनदार वस्त्र प्रावरणं (किमोनो) अंगावर घालावी लागतात. तासन्‌तास चालणारा मेकप आणि केशभूषा संभाळावी लागते.  नाच शिकण्याचे, सादर करण्याचे अतिशय कडक नियम पाळावे लागतात.

काही जपानी शब्द त्यामुळे लक्षात राहिले आहेत. गेशा, गेको (या गेशा स्वतःला गेको अर्थात नृत्यसेविका म्हाणतात), मिनेको ( लहान गेको), ओचाया (चहापानगृह), ओकाया (या नर्तिकांचं वसतिस्थान), ओकेसान (मोठी बहीण), आतातोरी ( ओकाया प्रमुखाची वारसदार) ई.

एकूणच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-



———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-