पुस्तक – ही रात चांदण्याची (Hee raat chandanyaachi)
लेखक – निनाद म्हात्रे (Ninad Mhantre)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – 126
ISBN – 978-93-5446-619-9

माझ्या अभिप्रायार्थ स्वतःहून पुस्तक पाठवल्याबद्दल सर्वप्रथम लेखक निनाद म्हात्रे ह्यांचे आभार.

हे पुस्तक एका दोन मित्रांच्या मनमोकळ्या गप्पांचं आहे. कॉलेजात एकत्र असणारे मित्र बऱ्याच वर्षांनी फिरायला जायचा प्लॅन करतात. एकत्र भेटतात. आणि निवांत गप्पा मारतात. गप्पांच्या ओघात जुना अबोला, गैरसमज निवळतात.
जुन्या आठवणी निघतात. नोकरी धंद्यानिमित्त काय अनुभव आले असतील त्याची देवाणघेवाण होते. विषयांतून विषय निघतात, थट्टामस्करी होते. शेवटी सहल संपल्यामुळे त्यांना थांबावं लागतं …ह्या गप्पांचं चांदणं मनात रेंगाळत ठेवत. असं पुस्तकाचं स्वरूप आहे.

जुने मित्र हल्ली भेटत नाहीत, आणि त्यांच्याशी फोनवर बोलणं होत नाही हे सांगणारा प्रसंग.

क्रिकेट आवडतं म्हणून मैत्रीण थट्टा करते. मग क्रिकेट आणि खरं आयुष्य ह्यात कसं साम्य आहे हे मित्र तिला समजावून सांगतो.


एक गाणं सांगायचं आणि त्या गण्याबद्दलची एक आठवण सांगायची अश्या “आठवणींच्या भेंड्यां”चा अभिनव खेळ ते खेळतात. त्यातला एक प्रसंग.


ह्यातले मित्र हे साधारण सुखवस्तू मध्यमवर्गीय घरांतले आहेत. त्यांची आयुष्यही तशी सरधोपटच आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणी प्रचंड वेगळ्या नाहीत. तुम्ही आम्ही जेव्हा जुन्या मित्रांशी गप्पा मारू त्या अश्याच होतील. म्हणून पुस्तकाशी आपण रिलेट करू शकतो. परंतु काही आगळं वेगळं वाचलंय असं होत नाही. आठवणींच्या गुंफणीतून काही कथा समोर ठेवायची आहे, “फ्लॅशबॅक” मध्ये रहस्य उलगडून दाखवायचं असं सुद्धा काही नाही. त्यामुळे प्रत्येक प्रसंग आपापल्या जागी वाचायला ठीक असला तरी ते सलग एकत्र वाचून पुस्तक वाचल्याचं समाधान वाटत नाही. छोट्या छोट्या ब्लॉगपोस्ट सलग वाचल्यासारखं वाटतं.

पुस्तकात मुद्रित शोधनाच्या आणि व्याकरणाच्या चुका बऱ्याच आढळल्या.

पण पहिल्याच पुस्तकाच्या मानाने निनाद म्हात्रे ह्यांचं लेखन चांगलं आहे. ते ते प्रसंग वाचायला चांगले वाटतात. पात्रांचे संवाद, शब्दांची निवड चांगली आहे. एकमेकांची थट्टामस्करीचा माहोल छान जमला आहे. निनाद म्हात्रे ह्यांच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा !

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/