पुस्तक :- हीज फॉरबिडन पॅशन  (His Forbidden passion)

भाषा :- इंग्रजी (English)

लेखिका :- अ‍ॅन मॅदर (Ann Mather)


ही एक प्रणय कादंबरी आहे. लंडन मध्ये राहणऱ्या एका तरूणीला -क्लीओला- एके दिवशी एक तरूण – डॉमिनिक- घरी भेटायला येतो आणि तिला सांगतो की तिचे आईवडील हे तिचे खरे आईवडील नसून दत्तक आई वडील आहेत. तिची खरी आई तिच्या जन्माच्या वेळीच वारली. डॉमिनिकचे दत्तक वडील हे त्या तरूणीचे जैविक पिता. अनैतिक संबंध लपवण्यासाठी क्लिओची आई वारल्यावर त्यांनी क्लिओला दत्तक देऊन टाकली. हे ऐकून तिच्या भावविश्वाला प्रचंड हादरा बसतो. 


डॉमिनिकच्या उद्योगपती आजोबांना आपल्या अखेरच्या दिवसात या नातीची आठवण येत असते आणि तिला कायमचं आपल्या कुटुंबात परत आणण्याची त्यांची इच्छा असते. ही जबाबदारी ते डॉमिनिक वर सोपवतात. तो तिला घेऊन कॅरिबियन बेटांवरच्या त्यांच्या साम्राज्यात घेऊन येतो. त्यातून त्यांची ओळख वाढते आणि दृढ संबंधात ते गुंततात.


डॉमिनिक हा दत्तक मुलगा आणि क्लिओ दुसऱ्या स्त्रीपासून झालेली मुलगी म्हणजे खरं म्हटलं तर भाऊ-बहीण. पण पाश्चात्त्य संस्कृती प्रमाणे ते एकमेकांना तसं मानत नाहीत. आधी शरीरसंबध जुळतात आणि मग प्रेमसंबंध !


एकूण कादंबरी काही खास नाही. प्रणयकथा, एकदोन शृंगार प्रसंग असं वाचायला आवडत असेल त्यांना प्रवासात वगैरे टईमपास म्हणून ठीक आहे. ————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
————————————————————

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
———————————————————————————-