(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

இளைய நிலா பொழிகிறதே (इळैय निला पॊळिगिरदे)
तरुण चंद्र बरसतो आहे
இதயம் வரை நனைகிறதே (इदयम् वरै ननैगिरदे)
हृदयापर्यंत भिजवत आहे
உலாப் போகும் மேகம் கனாக் காணுமே (उलाप् पोगुम् मेगम् कना काणुमे)
भ्रमंती करणारा ढग स्वप्न बघतो आहे
விழாக் காணுமே வானமே (विळाक् काणुमे वानमे)
तो उत्सव आकाश बघते आहे

வரும் வழியில் பனி மழையில் (वरुम् वळियिल् पनि मळैयिल्)
यायच्या वाटेवर, दव वर्षावात
பருவ நிலா தினம் நனையும் (परुव निला दिनम् ननैयुम्)
चंद्र रोज भिजतो
முகிலெடுத்து முகம் துடைத்து விடியும் வரை நடை பழகும் (मुगिलॆडुत्तु मुगम् तुडैत्तु विडियुम् वरै नडै पळगुम्)
ढग घेऊन तोंड पुसून पहाटेपर्यंत चालणं शिकतो

வரும் வழியில் பனி மழையில் (वरुम् वळियिल् पनि मळैयिल्)
यायच्या वाटेवर, दव वर्षावात
பருவ நிலா தினம் நனையும் (परुव निला दिनम् ननैयुम्)
किशोरवयीन चंद्र रोज भिजतो
முகிலெடுத்து முகம் துடைத்து விடியும் வரை நடை பழகும் (मुगिलॆडुत्तु मुगम् तुडैत्तु विडियुम् वरै नडै पळगुम्)
ढग घेऊन तोंड पुसून पहाटेपर्यंत चालणं शिकतो
வான வீதியில் மேக ஊர்வலம் (वान वीदियिल् मेग ऊर् वलम्)
आकाश मार्गाने ढगांची यात्रा
காணும் போதிலே ஆறுதல் தரும் (काणुम् पोदिले आरुदल् तरुम्)
हे बघून मन आश्वस्त होतं
பருவ மகள் விழிகளிலே கனவு வரும் (परुव मगळ् विळिगळिले कनवु वरुम्)
तरुण मुलगी डोळ्यांत स्वप्न दिसू लागेल

இளைய நிலா பொழிகிறதே (इळैय निला पॊळिगिरदे)
तरुण चंद्र बरसतो आहे
உலாப் போகும் மேகம் கனாக் காணுமே (उलाप् पोगुम् मेगम् कना काणुमे)
भ्रमंती करणारा ढग स्वप्न बघतो आहे
விழாக் காணுமே வானமே (विळाक् काणुमे वानमे)
तो उत्सव आकाश बघते आहे
இளைய நிலா பொழிகிறதே (इळैय निला पॊळिगिरदे)
तरुण चंद्र बरसतो आहे

முகிலினங்கள் அலைகிறதே (मुगिलिनंगळ् अलैगिरदे)
ढगांचे पुंजके इकडे तिकडे लहरत आहेत
முகவரிகள் தொலைந்தனவோ (मुगवरिगळ् तॊलैन्दनवो)
जणू (ते जायच्या ठिकाणाचे) पत्ते हरवले आहेत
முகவரிகள் தவறியதால் அழுதிடுமோ அது மழையோ (मुगवरिगळ् तवरियदाल् अळुदिडुमो अदु मळैयो)
पत्ते चुकल्यामुळे रडले तोच पाऊस का ?

நீல வானிலே வெள்ளி ஓடைகள் ஓடுகின்றதே (नील वानिले वॆळ्ळि ओडैगळ् ओडुगिन्रदे)
निळ्या आकाशात चंदेरी प्रवाह वाहत आहेत
என்ன ஜாடைகள் (एन्न जाडैगळ्)
ही कसली खूण आहे / काय सुचवत आहेत ?
விண்வெளியில் விதைத்தது யார் நவமணிகள் (विण्वॆळियिल् विदैत्तदु यार् नवमणिगळ्)
आकाशात कोणी रोपिली ही नवरत्ने ?

இளைய நிலா பொழிகிறதே (इळैय निला पॊळिगिरदे)
तरुण चंद्र बरसतो आहे
இதயம் வரை நனைகிறதே (इदयम् वरै ननैगिरदे)
हृदयापर्यंत भिजवत आहे
உலாப் போகும் மேகம் கனாக் காணுமே (उलाप् पोगुम् मेगम् कना काणुमे)
भ्रमंती करणारा ढग स्वप्न बघतो आहे
விழாக் காணுமே வானமே (विळाक् काणुमे वानमे)
तो उत्सव आकाश बघते आहे
இளைய நிலா பொழிகிறதே (इळैय निला पॊळिगिरदे)
तरुण चंद्र बरसतो आहे

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe