दिवाळी अंक : इतिहासाच्या पाऊलखुणा २०१९  (Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : ९३

ISBN : दिलेला नाही.

पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


मागच्या आठवड्यात “दृष्टी श्रुती” नावाच्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेल्या डिजिटल दिवाळी अंकाबद्दल लिहिलं होतं. त्यानंतर दोनतीन दिवसात अजून काही डिजिटल दिवाळी अंक व्हॉट्सपवर आले. त्यातलाच “इतिहासाच्या पाऊलखुणा” हा अंक आहे. हे या अंकाचे पहिले वर्ष आहे. 


“इतिहासाच्या पाऊलखुणा” नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे (
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna). त्या समूहाच्या चालक आणि सभासदांनी इतिहासविषयक डिजिटल दिवाळी अंकाची संकल्पना राबवली आहे. त्याबद्दल ते मनोगतात लिहितात “मराठ्यांचा अधिकाधिक इतिहास ससंदर्भ व नव्या पैलूंसह लोकांपर्यंत पोचावा ही आमची धडपड नेहमीच्या फेसबुक चर्चांबहेरच्या परिघात जावी या विचाराने आम्ही हा दिवाळी अंक काढायचे ठरवले.” मनोगतामधील अजून थोडा भाग वाचल्यावर अंकाची कल्पना येईल.




नाना फडणवीसांच्या घराण्यातील स्नुषा, इतिहास अभ्यासक, मोडी लिपी जाणकार वैशाली फडणीस यांनी नाना फडणवीसांच्या व्यक्तिमत्त्वावर लेख लिहिला आहे. त्यातील एक पान.



कृष्ण्विवरे, क्वांटम फिजिक्स याबद्दल शास्त्रज्ञांच्या वादप्रतिवादाचा आढावा घेणारा लेख “जिनियसच्या शोधात: एका वैचारिक युद्धाचा इतिहास”



हंबीरराव, प्रतपराव, विश्वासराव इ. नावे आपल्यल इतिहासात नेहमी वाचायला मिळतात. पण ही नावे नसून किताब/विशेषणे अहेत. आणि पुढे लोक त्याच नावाने ओळखले जाउ लागले. मला लोकमान्यांची आठवण झाली. हा किताबच आपल्या जिभेवर रुळल आहे कि नाही. तसंच या ऐतिहासिक व्यक्तींचं. त्यावरच्या लेखातलं एक पान.




“फॅट मॅन” हा लेख नागासाकि वर अमेरिकेने टाकलेला अणुबॉंब, त्याची निर्मिती आणि परिणाम याच्याबद्दलचा आहे.


निनाद बेडेकर या सुप्रसिद्ध इतिहासकारांचं व्यक्तिचित्रण स्मीता मुखर्जी आणि स्वप्नील हसबनीस यांनी एका इंग्रजी लेखातून करून दिलं आहे.


मुघलांचे सिंहासन मयूर्सिंहासन आणि शिवछत्रपतींचे सिंहासन यांच्याबद्दल विस्तृत माहिती “इतिहासातील दोन प्रसिद्ध सिंहासने” लेखात आहे.



“जोगेश्वरी” हे मुंबईचे पश्चिम उपनगर. पण इथे एक पुरातन लेणी आहे आणि ज्यात जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे ज्याच्यवरूनच गावाला हे नाव पडले. कदाचित थोड्याच लोकांना हे माहिती असेल. हि लेणी आणि जोगेश्वरी या देवतेबद्दल एक दीर्घलेख मासिकात आहे.



अजूनही काही लेख आहेत ज्यांच्या विषयाची कल्पना आपल्याला लेखाच्या नावावरूनच येईल. 

अनुक्रमणिका:



इतिहासाच्या निर्निराळ्या अंगांकडे डोळस, तटस्थ तरी इतिहासाच्याप्रेमाने बघणऱ्या या मंडळींचा हा दिवाळी अंक वाचकांना बरीच नवीन माहिती देईल त्यामुळे वाचायला आवडेलच. तंत्रज्ञनाची साथ देऊन डिजिटल अंक करण्याला आणि तरीही तो मोफत ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच वाचून आणि अभिप्राय देऊन दाद द्यायलाच हवी. 


पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-