पुस्तक : Japanese Orchid (जॅपनीज ऑर्किड)

लेखिका : Rei Kumura (रेई किमुरा)

भाषा : Englsih (इंग्रजी)

पाने : २४४

ISBN : 978-81-8498-139-1 


ही एक रहस्यशोध कादंबरी आहे. एका जपानी उद्योगपतीला त्याच्या जन्माबद्दलचे रहस्य माहित असते की तो एक जपानी सैनिक आणि सिंगापुरी महिलेचा अनौरस पुत्र आहे. त्याच्या वडिलांनीच त्याला हे सांगितलेलं असतं. पण त्या महिलेबद्दल – त्याच्या खऱ्या आईबद्दल – त्याला याहून जास्त माहीत नसतं. बाकी कोणालाही हे गुपित माहीत असण्याची शक्यता नसते. पण त्याला ब्लॅकमेल करणारा मेल येतो आणि त्यात हे गुपित फोडायची भीती दाखवून खंडणी मागितलेली असते. ही खंडणी मागणारे कोण, त्यांना हे गुपित कसं कळलं, आणि खंडणीखोरांपर्यंत ते कसे पोचतात असे कथानक आहे. 


कथानक खूपच सरधोपट आहे. त्यात घडणारे मुख्य प्रसंग सुद्धा मर्यादित आहेत. त्यामुळे पुढे काय होतंय याचा साधारण अंदाज येतो. प्रसंगांच्या वर्णनात कथानकाला पुढे नेण्यापेक्षा फापटपसाराच जास्त आहे. रहस्यमय कादंबरी असूनही खूप उत्कंठावर्धक नाही. 


लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :

 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-