पुस्तक – … जरा, याद करो कुर्बानी ( Jara, Yad karo kurbani)
पाने : १००
भाषा : मराठी
ISBN : दिलेला नाही
सैन्यदलाच्या कौटुंबिक बाजूची सुखदुःखे मांडणारे “घर सैनिकाचे” हे पुस्तक नुकतेच वाचले आणि त्याचे परीक्षण परवा लिहिले होते. (ते https://learnmarathiwithkaushik.com/courses/ghar-sainikache/ इथे वाचू शकाल). योगायोगाने वाचनात आलेले पुढचे पुस्तकही सैन्याशी संबंधित असेच आहे.
डोंबिवलीची “विविसु डेहरा” (www.vivisudehra.com) पर्यटन संस्था गेली अनेक वर्ष पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या सैन्यदलाची जवळून ओळख व्हावी अशा पद्धतीच्या विशेष सहलींचे आयोजन करते. तसेच सेनेच्या शौर्याची, त्यागाची योग्य जाणीव व कृतज्ञता सर्वसामान्यांच्या मनात वाढीस लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम करते. उदाहरणार्थ दिवाळीच्या वेळी सैनिकांना फराळ पाठवण्यात ते पुढाकार घेतात.
या संस्थेने “जरा याद करो कुर्बानी” हे कॉफी टेबल बुक डायरी स्वरुपात छापलं आहे. परमवीर चक्र विजेत्यांची माहिती हा मुख्य विषय आहे. आत्तापर्यंत ज्या 21 शूरवीरांना सेनेतील सर्वोच्च असे “परमवीर चक्र” मिळाले आहे त्या प्रत्येकावर एक छोटेखानी लेख आहे ज्यातून त्यांच्या शौर्याची आपल्याला माहिती होते.
अनुक्रमणिका
उदाहरणार्थ मेजर धन सिंग थापा यांच्यावरचा हा लेख पहा.
परमवीर चक्राची रचना कशी आहे याची माहिती दिली आहे.
भारतीय सैन्य दलाने मध्ये असलेली काही वैशिष्ट्यपूर्ण विमाने जहाजे आणि श्वान दल यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे
आणि सर्वात शेवटी डायरी सारखी काही कोरी पाने आहेत
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————
———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–