(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

ஜெய ஜெய தேவி ஜெய ஜெய தேவி जॆय जॆय देवि जॆय जॆय देवि
जय जय देवी, जय जय देवी,
துர்கா தேவி சரணம் दुर्गा देवि सरणम्
दुर्गा देवी, शरण तुला

ஜெய ஜெய தேவி ஜெய ஜெய தேவி जॆय जॆय देवि जॆय जॆय देवि
जय जय देवी, जय जय देवी,
துர்கா தேவி சரணம் दुर्गा देवि सरणम्
दुर्गा देवी, शरण तुला
जय जय देवी, जय जय देवी, दुर्गा देवी, शरण तुला

ஜெய ஜெய தேவி ஜெய ஜெய தேவி जॆय जॆय देवि जॆय जॆय देवि
जय जय देवी, जय जय देवी,
துர்கா தேவி சரணம் दुर्गा देवि सरणम्
दुर्गा देवी, शरण तुला

துர்க்கையம்மனை துதித்தால் என்றும் துன்பம் பறந்தோடும் दुर्गैयम्मनै तुदित्ताल् एन्रुम् तुन्बम् परन्दोडुम्
दुर्गा मातेचे स्तवन केले म्हणजे दुःख दूर पळून जाईल
தர்மம் காக்கும் தாயும் அவளை தரிசனம் கண்டால் போதும் दर्मम् काक्कुम् तायुम् अवळै दरिसनम् कण्डाल् पोदुम्
धर्मरक्षण करणारी माता ती, तिचे दर्शनच केवळ पुरेसे आहे
துர்க்கையம்மனை துதித்தால் என்றும் துன்பம் பறந்தோடும் दुर्गैयम्मनै तुदित्ताल् एन्रुम् तुन्बम् परन्दोडुम्
दुर्गा मातेचे स्तवन केले म्हणजे दुःख दूर पळून जाईल
தர்மம் காக்கும் தாயும் அவளை தரிசனம் கண்டால் போதும் दर्मम् काक्कुम् तायुम् अवळै दरिसनम् कण्डाल् पोदुम्
धर्मरक्षण करणारी माता ती, तिचे दर्शनच केवळ पुरेसे आहे

கர்ம வினைகளும் போகும் कर्म विनैकळुम् पोगुम्
कर्मप्रारब्ध जाईल
சர்வமங்களம் கூடும் सर्वमंगळ कूडुम्
सर्वमंगल मिळेल

பொற்கரங்கள் பதினெட்டும் நம்மை சுற்றிவரும் பகை விரட்டும் पॊऱ्करंगळ् पदिनॆट्टुम् नम्मै सुट्रिवरुम् पकै विरट्टुम्
अठरा सोनेरी हात आपल्या भोवती येणारी संकटे दुर करतील
நெற்றியிலே குங்குமப் பொட்டு வெற்றிப் பாதையைக் காட்டும் नॆट्रियिले कुंगुमप्पॊट्टु वॆट्रिप्पादैयैक् काट्टुम्
कपाळावर कुंकू लावून यशाचा मार्ग दाखवेल
ஆயிரம் கண்கள் உடையவளே आयिरम् कण्गळ् उडैयवळे
सहस्त्र नेत्र धारण करणारी !
ஆதி சக்தி அவள் பெரியவளே आदिसक्ति अवळ् पॆरियवळे
आदिशक्ती ! ती महान आहे
ஆயிரம் நாமங்கள் கொண்டவளே आयिरम् नामंगळ् कॊण्डवळे
सहस्र नामे असणारी
தாய் போல் நம்மை காப்பவளே ताय् पोल् नम्मै काप्पवळे
आपले आईप्रमाणे रक्षण करणारी

சங்கு சக்கரமும் வில்லும் அம்பும் மின்னும் வாளும் வேலுடன் சூலமும் सङ्कु चक्करमुम् विल्लुम् अम्बुम् मिन्नुम् वाळुम् वेलुडन् सूलमुम्
शंख, चक्र, बाण, धनुष्य, तळपती तलवार, भाला, शूल
தங்க கைகளில் தாங்கி நிற்பாள்..तंगकैगळिल् तांगि निऱ्पाळ्
सोनेरी हातात घेऊन उभी राहते
அம்மா अम्मा
माते

சிங்கத்தின் மேல் அவள் வீற்றிருப்பாள் सिङ्कत्तिऩ् मेल् अवळ् वीट्रिरुप्पाळ्
सिंहावर ती आसनस्थ असते,
திங்களை முடிமேல் சூடி நின்றாள் तिंगळै मुडिमेल् सूडि निऱ्पाळ्
चंद्र केसांत माळून उभी असते
மங்கள வாழ்வும் தந்திடுவாள் मंगळ वाऴ्वुम् तन्दिडुवाळ्
मंगल आयुष्य प्रदान करेल
மங்கையர்கரசியும் அவளே मंगैयर्करसियुम् अवळे
स्त्रियांची राणी ती
அங்கையர்க்கண்ணியும் அவளே अंगैयर्क्कण्णियुम् अवळे
मीनाक्षी (माश्यासारखे सुंदर डोळे असणारी) ती

ஜெய ஜெய தேவி ஜெய ஜெய தேவி जॆय जॆय देवि जॆय जॆय देवि
जय जय देवी, जय जय देवी,
துர்கா தேவி சரணம் दुर्गा देवि सरणम्
दुर्गा देवी, शरण तुला
ஜெய ஜெய தேவி ஜெய ஜெய தேவி जॆय जॆय देवि जॆय जॆय देवि
जय जय देवी, जय जय देवी,
துர்கா தேவி சரணம் दुर्गा देवि सरणम्
दुर्गा देवी, शरण तुला
கனக துர்கா தேவி சரணம் कनक दुर्गा देवि सरणम्
कनक दुर्गा शरण तुला
கனக துர்கா தேவி சரணம் कनक दुर्गा देवि सरणम्
कनक दुर्गा शरण तुला

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link