आप इस तरह तो होश उडाया ना की जिए   तू या तऱ्हेने मजला घायाळ करु नये
यु बन सवर के सामने आया ना की जिए  नटूनथटून अश्शी समोर येऊ नये
काली काली जुल्फों के फंदे ना डालो  पाश काळ्या केसांचे टाकू नको गं
हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालो    जगू दे जगू दे मला सुंदरी ग
ना छेड़ो हमें हम सताए हुए है        डिवचावे कशाला, मी आधीच त्रस्त
बहुत जख्म सीने पे खाए हुए है      उरी घाव झेलून होतायत कष्ट
सितमगर हो तुम खूब पहचानते है.      जुलमांना तुझ्या मी ओळखून आहे
तुम्हारी अदाओ को हम जानते है      बहाण्यांना तुझ्या मी ओळखून आहे
दगा बाज़ हो तुम सितम ढाने वाले      फसवून मजला दुखवीशी फार
फरेबे मोहब्बत में उलझाने वाले      प्रेमाच्या चकव्यात चकवीशी फार
ये रंगी कहानी तुम्ही को मुबारक    ही गोडगोड स्वप्ने तुलाच लखलाभ
तुम्हारी जवानी तुम्ही को मुबारक    तारुण्य तुझे तुला लखलाभ
हमारी तरफ से निगाहें हटा लो        माझ्यावरून आता नजरा हटव गं
हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालो    जगू दे जगू दे मला सुंदरी ग
दीवाना मेरा दिल है दीवाने को क्या कहिएमन माझे वेडे. वेड्याला काय म्हणावे ?
ज़ंजीर में जुल्फों की फस जाने को क्या कहिए  अडकलो केसांत, बेड्यांना काय म्हणावे ?
सदा वार करते हो तेरे जफा का        सदा घालशी घाव वागून रुष्ट
बहाते हो तुम खून एहले वफ़ा का      विश्वास माझा तोडून नष्ट
ये नागन सी जुल्फे ये ज़हरीली नज़रे  नागिणी केसांच्या या नजरा विषाच्या
वो पानी ना मांगे ये जिसको भी डस ले काय मागेल पाणी ज्यास करतील दंश
वो लुट जाए जो तुमसे दिल को लगाए    हरवेल सर्वस्व नादी तुझ्या जो
फिरे हसरतों का जनाजा उठाए          सुखाची शवे तो वाहील व्यर्थ
है मालूम हमको तुम्हारी हकीकत      तुझे सत्य आता पुरेपूर कळले
मुहब्बत के परदे में करते हो नफरत  आडून प्रेमाच्या करतेस द्वेष
कही और जाके अदाए उझालो.            दाखव दुसऱ्यांना तुझे रंगढंग
हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालो    जगू दे जगू दे मला सुंदरी ग

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe