ह्या गाण्याची पार्श्वभूमी अशी आहे – एका आडजागी डोंगरात एक तरुण आणि तरुणी अडकले आहेत. तरुणाचं तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. त्याचा असा समज आहे की, ती पुराणातील देवी “अभिरामी”चा अवतार आहे. आणि देवी ज्याच्याशी लग्न करते त्या पुराणातल्या देवाचा तो अवतार आहे. आता तो तरुण त्या तरुणीला एक पत्र लिहायला सांगतो. पत्र त्याच्या प्रेयसीला उद्देशून आहे. पण मनात त्याच्या तीच तरुणी आहे. तरुण जे बोलतो तेच ती चाल लावून गाण्यासारखं म्हणते. आणि गाता गात तिचा डोळा लागतो. असं ते दृश्य आहे.
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “Manjummel Boys” मल्याळम चित्रपटात हे गाणं पुन्हा आल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
पूर्ण दृश्याच्या युट्युब व्हिडीओ ची लिंक शेवटी दिली आहे.

चित्रपटाच्या दृश्यात त्यांचे संवाद आणि गाण्याच्या ओळी असं मिश्रण आहे. इथे फक्त गाण्याच्या ओळी घेतल्या आहेत.

(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

கண்மணி அன்போடு காதலன் நான் எழுதும் கடிதமே (कण्मणि अन्बोडु कादलन् नान् एऴुदुम् कडिदमे)
माझ्या सखी, मी तुझा प्रियकर प्रेमाने हे पत्र लिहीत आहे … स.न.वि.वि.
பொன்மணி உன் வீட்டில் சௌக்யமா நான் இங்கு சௌக்யமே (पॊन्मणि उन् वीट्टिल् सौक्यमा नान् इंगु सौक्यमे)
माझ्या सोन्या, तू कशी आहेस ? इथे सर्व सुखरूप आहे
உன்னை எண்ணி பார்க்கையில் கவிதை கொட்டுது (उन्नै एण्णि पार्क्कैयिल् कविदै कॊट्टुदु )
तुझा विचार करून बघितला की कविता स्फुरते
அதை எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டுது (अदै एऴुद निनैक्कैयिल् वार्त्तै मुट्टुदु)
पण ती लिहायला घेतली की शब्द अडतात

கண்மணி அன்போடு காதலன் நான் எழுதும் கடிதமே (कण्मणि अन्बोडु कादलन् नान् एऴुदुम् कडिदमे)
माझ्या सखी, मी तुझा प्रियकर प्रेमाने हे पत्र लिहीत आहे … स.न.वि.वि.
பொன்மணி உன் வீட்டில் சௌக்யமா நான் இங்கு சௌக்யமே (पॊन्मणि उन् वीट्टिल् सौक्यमा नान् इंगु सौक्यमे )
माझ्या सोन्या, तू कशी आहेस ? इथे सर्व सुखरूप आहे

மனிதர் உணர்ந்து கொள்ள (मनिदर् उणर्न्दु कॊळ्ळ)
मानव समजू शकेल असे
இது மனிதக்காதல் அல்ல (इदु मनिदक्कादल् अल्ल)
हे मानवी प्रेम नाही
காதல் அல்ல! (कादल् अल्ल!)
प्रेम नाही
காதல் அல்ல!! (कादल् अल्ल!!)
प्रेम नाही
அதையும் தாண்டி (अदैयुम् ताण्डि)
त्याही पलीकडे जाणारे

புனிதமானது! (पुनिदमानदु!)
पवित्र
புனிதமானது!! (पुनिदमानदु!!)
पवित्र
புனிதமானது!!! (पुनिदमानदु!!!)
पवित्र

உண்டான காயமெங்கும் தன்னாலே மாறிப்போன மாயமென்ன (उण्डान कायमॆंगुम् तन्नाले माऱिप्पोन मायमॆन्न)
मला होणाऱ्या जखमा आपोआपच बऱ्या होतात, ही काय जादू आहे
பொன்மானே பொன்மானே (पॊन्माने पॊन्माने)
माझ्या सुवर्णमृगा / माझ्या हरिणी / माझ्या लाडके !
என்ன காயம் ஆனபோதும் (एन्न कायम् आनपोदुम्)
काही त्रास झाल्यावर
என் மேனி தாங்கிக்கொள்ளும் உந்தன் மேனி தாங்காது (एन् मेनि तांगिक्कॊळ्ळुम् उन्दन् मेनि तांगादु )
माझं शरीर ते सहन करू शकतं, तुझं शरीर ते सहन करू शकणार नाही.
செந்தேனே (सॆन्तेने )
माझ्या मधा / माझ्या गोडुले

எந்தன் காதல் என்னவென்று சொல்லாமல் ஏங்க ஏங்க அழுகை வந்தது (एन्दन् कादल् एन्नवॆन्रु सॊल्लामल् एंग एंग अऴुगै वन्ददु )
माझं प्रेम कसं आहे हे व्यक्त करता येत नाही म्हणून तळमळून रडू येतं
எந்தன் சோகம் உன்னை தாக்கும் என்றெண்ணும் போது வந்த அழுகை நின்றது (एन्दन् सोगम् उन्नै ताक्कुम् एन्रॆण्णुम् पोदु वन्द अऴुकै निन्ऱदु)
पण माझा हा शोक तुला त्रास देईल असा विचार केला की रडू थांबतं
மனிதர் உணர்ந்து கொள்ள இது மனிதர் காதல் அல்ல (मनिदर् उणर्न्दु कॊळ्ळ इदु मनिदर् कादल् अल्ल )
मानव समजू शकेल असे हे मानवी प्रेम नाही
அதையும் தாண்டி புனிதமானது (अदैयुम् ताण्डि पुनिदमानदु)
त्याही पलीकडे जाणारे पवित्र

அபிராமியே தாலாட்டும் சாமியே நான்தானே தெரியுமா (अबिरामिये तालाट्टुम् सामिये नान्दाने तॆरियुमा)
हे अभिरामी(देवी), ही अंगाई गाणारा मीच आहे तुला माहिती आहे का ?
சிவகாமியே சிவனில் நீயும் பாதியே அதுவும் உனக்கு புரியுமா (सिवगामिये सिवनिल् नीयुम् पादिये अदुवुम् उनक्कु पुरियुमा )
हे शिवगामी(पार्वती), शिवाची अर्धांगिनी तू आहेस, तुला समजतंय का ?

சுப லாலி லாலியே லாலி லாலியே (सुबलालि लालिये लालि लालिये)
शुभलालि लालिये लालि लालिये
அபிராமியே லாலியே லாலி லாலியே (अबिरामिये लालिये लालि लालिये)
अभिरामी लालिये लालि लालिये

அபிராமியே தாலாட்டும் சாமியே நான்தானே தெரியுமா (अबिरामिये तालाट्टुम् सामिये नान्दाने तॆरियुमा)
हे अभिरामी(देवी), ही अंगाई गाणारा मीच आहे तुला माहिती आहे का ?
உனக்கு புரியுமா (उनक्कु पुरियुमा )
तुला समजतंय का ?

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link