(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
गाण्याची पार्श्वभूमी… एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. त्यांची लहान मुलगी आई बरोबर राहते आहे. वडिलांना मुलीची आठवण येते आहे. त्या भावना गाण्यातून व्यक्त केल्या आहेत.
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
என் மீது சாய வா (एन् मीदु साय वा)
मला टेक / माझ्या कुशीत ये
புண்ணான நெஞ்சை (पुण्णान नॆंजै)
दुखऱ्या जिवाला
பொன்னான கையால் (पॊन्नान कैयाल्)
सोन्याच्या हातांनी
பூ போல நீவ வா (पू पोल नीव वा)
फुलासारखे कुरवाळायला ये
நான் காத்து நின்றேன் (नान् कात्तु निन्रेन्)
मी वाट बघत उभा होतो
காலங்கள் தோறும் (कालंगळ् दोरुम्)
कितीतरी काळ
என் ஏக்கம் தீருமா (एन् एक्कम् तीरुमा)
माझी तळमळ संपेल का ?
நான் பார்த்து நின்றேன் (नान् पार्त्तु निन्रेन्)
मी वाट बघत उभा होतो
பொன் வானம் எங்கும் (पॊन् वानम् एंगुम्)
सोनेरी आकाशात कुठेतरी
என் மின்னல் தோன்றுமா (एन् मिन्नल् तोन्रुमा)
माझी विद्युल्लता दिसेल का
தண்ணீராய் மேகம் தூறும் (तण्णीराय् मेगम् तूरुम्)
ढगांमधून पाणी बरसेल
கண்ணீர் சேரும் (कण्णीर् सेरुम्)
अश्रू जमा होतील
கற்கண்டாய் மாறுமா (कऱ्कण्डाय् मारुमा)
ते खडीसाखरे होतील का ? / गोड होतील का ?
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ (आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ (आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ (आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ(आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
என் மீது சாய வா (एन् मीदु साय वा)
मला टेक / माझ्या कुशीत ये
புண்ணான நெஞ்சை (पुण्णान नॆंजै)
दुखऱ्या जिवाला
பொன்னான கையால் (पॊन्नान कैयाल्)
सोन्याच्या हातांनी
பூ போல நீவ வா (पू पोल नीव वा)
फुलासारखे कुरवाळायला ये
அலை கடலின் நடுவே (अलै कडलिन् नडुवे)
समुद्राच्या लाटांच्या मधोमध
அலைந்திடவா தனியே (अलैन्दिडवा तनिये)
एकटाच हेलकावे खाऊ का ?
படகெனவே உனையே பார்த்தேன் கண்ணே (पडगॆनवे उनैये पार्त्तेन् कण्णे)
लाडके, मी तुला मला नावेच्या रूपात बघतो
புதை மணலில் வீழ்ந்து (पुदै मणलिल् वीऴ्न्दु)
दलदलीत पडून
புதைந்திடவே இருந்தேன் (पुदैन्दिडवे इरुन्देन्)
दबला गेलो होतो
குறு நகையை எரிந்தே (कुरु नगैयै एरिन्दे)
स्मितहास्य उजळवून
மீட்டாய் என்னை ( मीट्टाय् एन्नै)
वाचवलेस मला
விண்ணோடும் மண்ணோடும் வாடும் (विण्णोडुम् मण्णोडुम् वाडुम्)
जमिनीपासून आकाशापर्यंत जाणारा
பெரும் ஊஞ்சல் மனதோரம் (पॆरुम् ऊंजल् मनदोरम्)
एक मोठा झोपाळा माझ्या मनात आहे
கண்பட்டு நூல் விட்டு போகும் (कण्पट्टु नूल् विट्टु पोगुम्)
दृष्ट लागून कोणाची , साखळी निखळेल त्याची
என ஏதோ பயம் கூடும் (एन एदो बयम् कूडुम्)
अशी भीती वाटते
மயில் ஒன்றை பார்க்கிறேன் (मयिल् ऒन्रै पार्क्किरेन्)
एक मोर मी बघतो
மழையாகி ஆடினேன் (मऴैयागि आडिनेन्)
मी पाऊस होऊन नाचतो
இந்த உற்சாகம் போதும் (इन्द उऱ्चागम् पोदुम्)
हा हर्ष मला पुरे आहे
சாக தோன்றும் இதே வினாடி (साक तोन्रुम् इदे विनाडि)
मरायला हाच क्षण योग्य
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
என் மீது சாய வா (एन् मीदु साय वा)
मला टेक / माझ्या कुशीत ये
புண்ணான நெஞ்சை (पुण्णान नॆंजै)
दुखऱ्या जिवाला
பொன்னான கையால் (पॊन्नान कैयाल्)
सोन्याच्या हातांनी
பூ போல நீவ வா (पू पोल नीव वा)
फुलासारखे कुरवाळायला ये
நீ தூங்கும் போது (नी तूंगुम् बोदु)
तू झोपलेली असताना
உன் நெற்றி மீது (उन् नॆट्रि मीदु)
तुझ्या कपाळाचा
முத்தங்கள் வைக்கணும் (मुत्तंगळ् वैक्कणुम्)
मुका घ्यायचा आहे
போர்வைகள் போர்த்தி (पोर्वैगळ् पोर्त्ति)
गोधडीत लपेटून
போகாமல் தாழ்த்தி (पोगामल् ताऴ्त्ति)
न झोपता
நான் காவல் காக்கணும் (नान् कावल् काक्कणुम्)
तुला सोबत करायची आहे
எல்லோரும் தூங்கும் நேரம் (एल्लोरुम् तूंगुम् नेरम्)
सगळे झोपले असतील तेव्हा
நானும் நீயும் மௌனத்தில் பேசணும் (नानुम् नीयुम् मौनत्तिल् पेसणुम्)
आपण दोघांनी मुक्याने बोलायचे आहे
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ (आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ (आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ (आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
ஆராரி ராரோ ராரோ ராரோ ஆராரி ராரோ(आरारि रारो रारो रारो आरारि रारो)
आरारि रारो रारो रारो आरारि रारो
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
கண்ணான கண்ணே (कण्णान कण्णे)
माझ्या लाडके
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link