“कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल्” ह्या गाजलेल्या तमिळ चित्रपटातलं हे गाणं. त्याचे बोल पण “कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल्”.
ह्या गाण्याची पार्श्वभूमी अशी …

श्रीलंकेतला “तामिळ वाघां”चा सशस्त्र संघर्ष चालू असताचा काळ आहे. अनेक तमिळ लोक शरणार्थी म्हणून भारतात येतायत. त्यातल्या एका बाईने बाळाला जन्म दिला. पण त्या बाळाला भारतातातच सोडून ती नवऱ्याला शोधायला पुन्हा लंकेत गेली.
एक तरुण लेखक त्या मुलीला दत्तक घायचे ठरवतो. त्याची प्रेयसी पण तयार होते. ते दोघे लग्न करतात  आणि मुलीला दत्तक घेतात. लाडाकोडाने वाढवतात. त्यांना अजून दोन मुलं होतात. हे जोडपं आपल्या तीन लहान मुलांसह आनंदाने राहतायत. दत्तक मुलीच्या नवव्या वाढदिवसाच्या वेळी ते तिच्यापाशी गुपित उघड करतात की तू आमची दत्तक मुलगी आहेस.
त्या लहानग्या मुलीला हे सत्य स्वीकारणं आणि पचवणं कसं जमणार ? ती अचंबित होते, रागावते, रडते.. आईवडील आपले नाहीत मग आता ते कसे वागतील ? आपली भावंडं आता आपल्याशी कशी वागतील ? आपली खरी आई कोण ? असे प्रश्न तिला पडतात. ती दत्तक आईवडिलांवर वर रुसते, रागावते, अबोला धरते. तिची आईसुद्धा ह्या वागण्याने काळजीत पडते, रडते. पोटच्या पोराप्रमाणेच प्रेमाने वाढवलेली ही मुलगी, पण अशी परक्यासारखी वागते आहे हे बघून आई कळवळते.
आईवडिलांचे भाव ह्या गाण्यात प्रकट झाले आहे. गाण्याच्या दोन आवृत्ती आहेत. स्त्री आवृत्ती हे आईच्या तोंडचे गाणे तर पुरुष आवृत्ती वडिलांच्या तोंडचे. पुरुष आवृत्तीत एक कडवे वेगळे आहे.

स्त्री आवृत्ती

நெஞ்சில் ஜில் ஜில் ஜில் ஜில்… नॆंजिल् जिल् जिल् जिल् जिल्…
हृदयात धडधड धडधड
காதில் தில் தில் தில் தில்… कादिल् दिल् दिल् दिल् दिल्…
कानात ठेका वाजतो
கன்னத்தில் முத்தமிட்டால் நீ… कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल् नी…
जर गालावर पापा दिलास तू
கன்னத்தில் முத்தமிட்டால்… कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल्…
गालावर पापा दिलास तर ।।१।।

गालावर पापा दिलास तर ।।२।।

ஒரு தெய்வம் தந்த பூவே…ऒरु दॆय्वम् तन्द पूवे…
देवाने दिलेल्या फुला
கண்ணில் தேடல் என்ன தாயே…कण्णिल् तेडल् एन्न ताये…
कसला शोध तुझ्या डोळ्यात दिसतोय माझे , आई गं
ஒரு தெய்வம் தந்த பூவே…ऒरु दॆय्वम् तन्द पूवे…
देवाने दिलेल्या फुला
கண்ணில் தேடல் என்ன தாயே…कण्णिल् तेडल् एन्न ताये…
कसला शोध तुझ्या डोळ्यात दिसतोय माझे , आई गं ।।३।।

வாழ்வு தொடங்கும் இடம் நீதானே…वाऴ्वु तॆाडंगुम् इडम् नीदाने…
आयुष्याची सुरुवात तुझ्यापासून
ஆஹா… ஆஆ… ஆஆ… ஆஆ…आहा… आआ… आआ… आआ…
आहा… आआ… आआ… आआ…
வாழ்வு தொடங்கும் இடம் நீதானே…वाऴ्वु तॆाडंगुम् इडम् नीदाने…
आयुष्याची सुरुवात तुझ्यापासून
வானம் முடியுமிடம் இடம் நீதானே…वानम् मुडियुमिडम् इडम् नीदाने…
आकाश जिथे संपते ते क्षितिज तूच
காற்றைப் போல நீ வந்தாயே…काट्रैप् पेाल नी वन्दाये…
वाऱ्यासारखी तू आलीस
சுவாசமாக நீ நின்றாயே…सुवासमाग नी निन्राये…
श्वास बनून गेलीस
மார்பில் ஊறும் உயிரே…मार्बिल् ऊऱुम् उयिरे…
माझ्या छातीत धडधडणारा जीवा ।।४।।

ஒரு தெய்வம் தந்த பூவே…ऒरु दॆय्वम् तन्द पूवे…
देवाने दिलेल्या फुला
கண்ணில் தேடல் என்ன தாயே…कण्णिल् तेडल् एन्न ताये…
कसला शोध तुझ्या डोळ्यात दिसतोय माझे , आई गं ।।५।।

நெஞ்சில் ஜில் ஜில் ஜில் ஜில்… नॆंजिल् जिल् जिल् जिल् जिल्…
हृदयात धडधड धडधड
காதில் தில் தில் தில் தில்… कादिल् दिल् दिल् दिल् दिल्…
कानात ठेका वाजतो
கன்னத்தில் முத்தமிட்டால் நீ… कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल् नी…
जर गालावर पापा दिलास तू
கன்னத்தில் முத்தமிட்டால்… कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल्…
गालावर पापा दिलास तर ।।६।।

गालावर पापा दिलास तर ।।७।।

எனது சொந்தம் நீ…एनदु सॊन्दम् नी…
माझी नात्यागोत्याची तू
எனது பகையும் நீ…एनदु पगैयुम् नी…
माझी शत्रूही तू
காதல் மலரும் நீ…कादल् मलरुम् नी…
प्रेमाचे फूल तू
கருவில் முள்ளும் நீ…करुविल् मुळ्ळुम् नी…
गर्भातला काटा तू
செல்ல மழையும் நீ…चॆल्ल मऴैयुम् नी…
भावणारा पाऊस तू
சின்ன இடியும் நீ…चिन्न इडियुम् नी…
लहान वीज तू
செல்ல மழையும் நீ…चॆल्ल मऴैयुम् नी…
भावणारा पाऊस तू
சின்ன இடியும் நீ…चिन्न इडियुम् नी
लहान वीज तू
பிறந்த உடலும் நீ…पिऱन्द उडलुम् नी…
जन्मलेले शरीर तू
பிரியும் உயிரும் நீ…पिरियुम् उयिरुम् नी…
सोडून जाणारा प्राण तू
பிறந்த உடலும் நீ…पिऱन्द उडलुम् नी…
जन्मलेले शरीर तू
பிரியும் உயிரும் நீ…पिरियुम् उयिरुम् नी…
सोडून जाणारा प्राण तू
மரணம் ஈன்ற ஜனனம் நீ…मरणम् ईऩ्ऱ जननम् नी…
मरणाने उत्पन्न केलेले जनन तू ।।८।।

ஒரு தெய்வம் தந்த பூவே…ऒरु दॆय्वम् तन्द पूवे…
देवाने दिलेल्या फुला
கண்ணில் தேடல் என்ன தாயே…कण्णिल् तेडल् एन्न ताये…
कसला शोध तुझ्या डोळ्यात दिसतोय माझे , आई गं ।। ९ ।।

நெஞ்சில் ஜில் ஜில் ஜில் ஜில்… नॆंजिल् जिल् जिल् जिल् जिल्…
हृदयात धडधड धडधड
காதில் தில் தில் தில் தில்… कादिल् दिल् दिल् दिल् दिल्…
कानात ठेका वाजतो
கன்னத்தில் முத்தமிட்டால் நீ… कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल् नी…
जर गालावर पापा दिलास तू
கன்னத்தில் முத்தமிட்டால்… कन्नत्तिल् मुत्तमिट्टाल्…
गालावर पापा दिलास तर ।।१०।।

पुरुष आवृत्ती ते कडवी तशीच; पुढे

எனது செல்வம் நீ…एनदु सॆल्वम् नी…
माझे ऐश्वर्य तू
எனது வறுமை நீ…एनदु वऱुमै नी…
माझी विपन्नावस्था तू
இழைத்த கவிதை நீ…इऴैत्त कविदै नी…
गुंफलेली कविता तू
எழுத்துப்பிழையும் நீ…एऴुत्तुप् पिऴैयुम् नी…
लिहिण्यात झालेली चूकही तू
இரவல் வெளிச்சம் நீ…इरवल् वॆळिच्चम् नी…
उसना आणलेला प्रकाश तू
இரவின் கண்ணீர் நீ…इरविन् कण्णीर् नी…
रात्रीत ढाळलेले अश्रू तू
இரவல் வெளிச்சம் நீ…इरवल् वॆळिच्चम् नी…
उसना आणलेला प्रकाश तू
இரவின் கண்ணீர் நீ…इरविन् कण्णीर् नी…
रात्रीत ढाळलेले अश्रू तू
எனது வானம் நீ…एनदु वानम् नी…
माझे आकाश तू
இழந்த சிறகும் நீ…इऴन्द सिऱगुम् नी…
हरवलेला पंख तू
எனது வானம் நீ…एनदु वानम् नी…
माझे आकाश तू
இழந்த சிறகும் நீ…इऴन्द सिऱगुम् नी…
हरवलेला पंख तू
நான் தூக்கி வளர்த்த துயரம் நீ…नान् तूक्कि वळर्त्त तुयरम् नी…
मी उचलून वाढवलेले ।।७ पुरुष ।।

ஒரு தெய்வம் தந்த பூவே…ऒरु दॆय्वम् तन्द पूवे…
देवाने दिलेल्या फुला
சிறு ஊடல் என்ன தாயே!… सिऱु ऊडल् एन्न ताये!
कसला हा अबोला/दुरावा, आई गं
ஒரு தெய்வம் தந்த பூவே…ऒरु दॆय्वम् तन्द पूवे…
देवाने दिलेल्या फुला
சிறு ஊடல் என்ன தாயே!… सिऱु ऊडल् एन्न ताये!
कसला हा अबोला/दुरावा, आई गं ।। ८ पुरुष ।।

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link