(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

எண்ணமே ஏன் உன்னால (एण्णमे ऍं उन्नाल)
तुझ्यामुळे का विचार
உள்ள புகுந்தது தன்னால (उळ्ळ पुगुन्ददु तन्नाल)
आपोआप शिरतात (तुझे विचार आपोआप मनात का येतात)
கண்ணமே ஏன் கண்ணால (कण्णमे ऍं कण्णाल)
प्रिये का डोळ्यांनी/नजरेने
வெந்து செவந்து புண்ணாக (वॆन्दु सॆवन्दु पुण्णाग )
चटका बसून लाल होतात (तुझ्या एका नजरेने गाल लाजून लाल होतात) ।।१।।

ஏதோ நானும் உளற (एदो नानुम् उळऱ)
मी काहीतरी बडबडतो
கொஞ்சம் காதல் வளர (कॊंजम् कादल् वळर)
प्रेम थोडं थोडं वाढतंय
உள்ள வெட்கம் வளர (उळ्ळ वॆट्कम् वळर)
आत लाजणं वाढतंय
அவ வந்தா தேடியே (अव वन्दा तेडिये)
तिने येऊन शोधल्यावर ।।२।।

தன்ன நேரம் நிக்குது (तन्न नेरम् निक्कुदु)
काळ आपोआप थांबतो
மோகம் சொக்குது (मोगम् सॊक्कुदु)
लालसा वाढू लागते
வார்த்தை திக்குதம்மா (वार्त्तै तिक्कुदम्मा)
बोलणं अडखळतं
நெஞ்சில் பூட்டி வெச்சத (नॆंजिल् पूट्टि वॆच्चद)
हृदय जणू कुलूपबंद
வந்து ஒடைச்சிட்டம்மா (वन्दु ऒडैच्चिट्टम्मा)
येऊन तोडलेस तू ।।३।।

கட்சி சேர நிக்குது (कट्चि सेर निक्कुदु)
पक्षाप्रवेशाची / तू माझ्या बाजूला येण्यासाठी उभा आहे
கண் அழைக்குது (कण् अऴैक्कुदु)
डोळे बोलवतायत
பொன் ஆடைங்கிடு மா (पॊन् आडैंगिड मा )
सोने परिधान करण्यासाठी ये / जरतारी शाल पांघरून स्वागत होईल
அன்பு தேங்கி நிக்குது (अन्बु तेंगि निक्कुदु)
प्रेम साठून राहिलं आहे
வந்து எடுத்துக்கோமா (वन्दु एडुत्तुक्कोमा)
येऊन घेऊन जा गं ।।४।।

யாரும் பார்த்து நின்னு பேசவில்ல (यारुम् पार्त्तु निऩ्ऩु पेसविल्ल)
कोणी बघून थांबून बोललं नाही
காத்து நின்னு கொடுத்ததில்ல (कात्तु निऩ्ऩु कॊडुत्तदिल्ल)
वाट बघून काही दिलं नाही
நீயும் வந்து பார்த்ததால (नीयुम् वन्दु पार्त्तदाल)
तू येऊन बघितलंस
பனியும் பத்திக்கிச்சே (पनियुम् पत्तिक्किच्चे)
बर्फही पेटला ।।५।।

கண் மறச்சு போற புள்ள (कण् मऱच्चु पोऱ पुळ्ळ)
नजर झुकवून जाणाऱ्या मुली
முன் அழைச்சதும் யாருமில்ல (मुन् अऴैच्चदुम् यारुमिल्ल)
ह्या आधी कोणी असं म्हटलं नाहीये
உன் மனசில்தான் விழுந்தேன் (उन् मऩसिल्दान् विऴुन्देन्)
तुझ्या हृदयात मी पडलो
நானும் தங்கிடவே (नानुम् तंगिडवे)
तिथेच राहीन कायमचा ।।६।।

कडवी १ ते ४ पुन्हा

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link