पुस्तक – किस्त्रीम दिवाळी अंक २०२४ (Kistrim Diwali Edition 2024)
संपादक – विजय लेले (Vijay Lele)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २६४
छापील किंमत – रु. २७०/-
ISBN – दिलेला नाही

किस्त्रीम हे दिवाळी अंकांतलं नावाजलेलं नाव. ह्यावर्षी सुद्धा अतिशय माहितीपूर्ण आणि विविधांगी अंक आहे. बरेचसे दीर्घ वैचारिक लेख आणि दीर्घ कथा असं अंकाचं स्वरूप आहे. कथांचे विषय पण वेगवेगळे – सामाजिक, कौटुंबिक असे आहेत. त्यामुळे कथांबद्दल विशेष लिहीत नाही. पण काही वैचारिक सामाजिक लेखांची थोडक्यात माहिती देतो.

फुकट्यांचा देश – “लाडकी बहीण” योजना असो आणि इतर पक्षांच्या कुठल्या फुकट वाटपाच्या योजना ह्या आर्थिक पातळीवर आतबट्ट्याचा आहेतच पण समाजालाही चुकीच्या मार्गाने नेणाऱ्या आहेत. ह्यावरचा लेख

श्रेय ज्याचे त्यास द्यावे – “संविधानाचे निर्माते”, “संविधानाचे शिल्पकार” असा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांसाठी नेहमी केला जातो. मात्र त्यातून इतर अनेकांचा मोठा सहभाग आणि अभ्यास मात्र दुर्लक्षला जातो. बाबासाहेबांचा त्यात हातभार नक्की आहे. पण मसुदा समितीचे अध्यक्ष अशी त्यांची भूमिका होती. अशाच कितीतरी इतर समित्या संविधान सभेत होत्या. दोनेकशे लोक, मोठमोठे नेते कायदेपंडित त्यात होते. नेहरू-गांधी ह्यांच्या कल्पना आणि तत्कालीन काँग्रेसच्या संकल्पनेतून हे संविधान साकारलं गेलं. हे सगळं सोदाहरण, मुद्देदेसूदपणे समजावून सांगितलं आहे.

शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक – शिवरायांच्या गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकाबद्दल आपल्याला माहिती असतेच. पण हा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी तांत्रिक उपासनापद्धतीच्या मंत्र-तंत्र पद्धतीने अजून एकदा राज्याभिषेक झाला असे लेखकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. गागाभट्टांवरचा राग आणि पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर घडलेल्या काही अपशकुनी घटना ह्यातून पुन्हा एकदा वेगळा विधी केला जावा असा तांत्रिक उपासकांचं म्हणणं पडलं. त्यातून “निश्चलपुरी” तांत्रिकाने हवीशी केला. ह्याबद्दलच्या बखरीतले उल्लेख वगैरे पुरावे लेखकाने दिले आहेत.

काफिर अमेरिकेचा इस्लामी अनुभव – अमेरीकेत सुद्धा मुसलमानांची संख्या वाढते आहे. तिथेही ती व्होटबँक बनते आहे. आणि आपलं वेगळं अस्तित्व जाणवून द्यायला लागली आहे. कमला हॅरिस – बायडन आता लांगुलचालन करायला लागले आहेत. त्याबद्दल अमेरिका निवासी अनंत लाभसेटवार ह्यांनी लिहिलेला छोटा पण परिणामकारक लेख.

वोकिझम : उषःकाल नावाची काळरात्र – व्यक्तिस्वातंत्र्य, लैगिक स्वातंत्र्य ह्याचा अतिरेक करून आता ते विकृतीकडे आणि राजकीय-सामाजिक दुभंग घडवून आणण्याचे साधन बनले आहे. सध्याच्या ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणारा दीर्घ लेख.

नियतीचा बळी राजा हरिसिंह – काश्मीर संस्थान विलीनीकरणाच्या वेळी राजाने केलेली चालढकल, नेहरूंचे शेख अब्दुल्ला प्रेम ह्यातून निर्माण काश्मीर समस्या कशी निर्माण झाली, त्यावेळचा घटनाक्रम काय होता ह्याबद्दलचा लेख.

स्वातंत्र्याकांक्षेचे रूप शिवराय – शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ते तसे का झाले, इतर राजांपेक्षा वेगळे का ठरले, शिवाजी महाराजांनंतरही २५ वर्षे मराठे औरंगजेबाशी का लढले. “स्वराज्य – आपलं राज्य” ही भावना इथे का रुजली ह्याची अतिशय मुद्देसूद मांडणी करणारा नरहर कुरुंदकरांचा लेख.

अखेर भाषा धोरण ठरले – महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण कसे ठरले, त्यात काय करता येईल ह्याविषयी लेख. ह्यात थोडी माहिती आणि थोडी लेखकांची मते असा आहे. हा लेख मला थोडा गोंधळात टाकणारा वाटला.

काही लेखांचे विषय नावावरून लक्षात येतील “डिजिटल डिटॉक्स“, “अत्रे : नाबाद सव्वाशे“, “जेएनयू – वादग्रस्त पण महत्त्वाचे“. अजूनही चांगले लेख आहेत.

तीन लेखांची झलक पुढील छायाचित्रांत बघायला मिळेल. झूम करून वाचा

अनुक्रमणिका
काफिर अमेरिकेचा इस्लामी अनुभव


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय होतायत. काही भारतीय कंपन्या नावारूपाला येतायत तरी जगाच्या व्यापारात भारतीय उद्योजकांचा वाटानगण्य का ?

असा हा वाचनीय, चिंतनीय दिवाळी अंक आहे.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link