पुस्तक : कोंदण (Kondan)

लेखन : श्रीकांत लागू (Shrikant Lagu)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : १६८

ISBN : 978-93-80361-25-0


“लागू बंधू हिरे-मोती” या पेढीचे संचालक असणऱ्या श्रीकांत लागूंच्या हरहुन्नरी, प्रचंड कुतूहल आणि साहसी व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून होते. त्यांची ओळख आधी करून घेऊया.



त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांच्या निवडक लेखांचा हा संग्रह केला आहे. त्यातून त्यांनी केलेली भटकंती, वेगवेगख्या ठिकाणांहून बघितलेली ग्रहणं, कलाक्षेत्रातल्या मुशाफिरी, त्यातून जमलेल्या स्नेहसंबंधांचे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. कैलास-मनससरोवर चा प्रवास (८० च्या दशकातला), ९२ सालाआधी अयोध्येला दिलेली भेट- आणि एका चिकित्सकाच्या नजरेतून तिचं वर्णन, सूर्यग्रहण बघण्याचा अनुभव, जगातल्या मोठमोठ्या धबधब्यांना दिलेल्या भेटी, पहिले एव्हरेस्टवीर एडमंड-नॉरगे नसून दुसरे आहेत याबद्दल होणऱ्या चर्चेची ओळख, इशान्य भारतातल्या प्रवासाचा एक अनुभव असे लेख  आहेत. विविध रत्नांची तोंडओळख करून देणारा एक लेख आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया. लेखांच्या शीर्षकावरून विषयांची कल्पना येईल.



ग्रहणाबद्दलच्या लेखातला एक भाग 

कुसुमाग्रजांच्या नावे आकाशात एक तारा आहे असं आपण ऐकलं असेल. पण त्याच्या मागची गंमत या पुस्तकात आहे. अमेरिकेतली एक संस्था पैसे घेऊन ताऱ्यांना आपल्याला हव्या त्या माणसाचे नाव देते. त्यात वैज्ञानिक किंवा खगोलशास्त्रीय असं फार नाही. लागूंच्या भाषेत “हपापाचा माल गपापा” असा हा प्रकार आहे. तरीही एक अनोखी भेट म्हणून त्यांचे स्नेही असणऱ्या कुसुमाग्रजांच्या नावे एक ताऱ्याची नोंदणी त्यांनी केली. आणि ते प्रमाणपत्र कुसुमाग्रजांना वाढदिवसाला भेट म्हणून पाठवले. तिथे उपस्थित लोकांच्या बोलण्यातून आणि गैरसमजातून एक वृत्तपत्राने त्याची मोठी बातमी केली. ही बातमी दुसऱ्या वृत्तपत्रात आधी आली या रागातून दुसऱ्या वृत्तपत्राने हा कसा खोटा प्रकार आहे, १०० डॉलर देऊन कोणाचंही नाव कसं देता येतं हे प्रसिद्ध केलं. एका साध्या गमतीच्या भेटीचा हा असा वेगळाच अर्थ घेण्यात आला. कुसुमाग्रजांनी मात्र या भेटीबद्दल खास कविता लिहून आभार मानले. ती ही कविता. भाग्यवानच लागू,

एकूणच सगळे लेख माहितीपुर्ण आहेत. अनुवादित कथा पण फॅंटसी प्रकारच्या आहे. वाचायला छान आहे.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————