काल १२ एप्रिल २०२६ ला, सूरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी आणि हिंदी सह अनेक भारतीय भाषांमध्येसुद्धा गाणी गायली होती. माझ्या “तमिळ गाणी मराठीत” ह्या उपक्रमात आज त्यांनी गायलेल्या एका लोकप्रिय तमिळ गाण्याची ओळख करून देतो. आणि आशाताईंना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची गाणी त्यांचा सूर सदैव आपल्या कानात गुणगुणत राहील. ओम शांति:
(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
கொஞ்ச நேரம் கொஞ்ச நேரம் (कॊंज नेरम् कॊंज नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
கொஞ்சிப் பேசக் கூடாதா (कॊंजिप् पेसक् कूडादा)
गोड गोड बोलायला नको का ?
அந்த நேரம் அந்தி நேரம் (अन्द नेरम् अन्दि नेरम्)
ती वेळ तिन्ही सांजेची वेळ
அன்புத் தூறல் போடாதா (अन्बुत् तूऱल् पोडादा)
प्रेमाचा शिडकावा होणार नाही का ?
கொஞ்ச நேரம் கொஞ்ச நேரம் (कॊंज नेरम् कॊंज नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
கொஞ்சிப் பேசக் கூடாதா (कॊंजिप् पेसक् कूडादा)
गोड गोड बोलायला नको का ?
அந்த நேரம் அந்தி நேரம் (अन्द नेरम् अन्दि नेरम्)
ती वेळ तिन्ही सांजेची वेळ
அன்புத் தூறல் போடாதா (अन्बुत् तूऱल् पोडादा)
प्रेमाचा शिडकावा होणार नाही का ?
கொஞ்சும் நேரம் கொஞ்சும் நேரம் (कॊंजुम् नेरम् कॊंजुम् नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
எல்லை மீறக் கூடாதா (एल्लै मीऱक् कूडादा)
मर्यादा ओलंडायची नाही का ?
இந்த நேரம் இன்ப நேரம் (इन्द नेरम् इन्ब नेरम्)
ही वेळ ही वेळ
இன்னும் கொஞ்சம் நீளாதா (इन्नुम् कॊंजम् नीळादा)
अजून थोडी लांबणार नाही का ?
கொஞ்ச நேரம் கொஞ்ச நேரம் (कॊंज नेरम् कॊंज नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
கொஞ்சிப் பேசக் கூடாதா (कॊंजिप् पेसक् कूडादा)
गोड गोड बोलायला नको का ?
அந்த நேரம் அந்தி நேரம் (अन्द नेरम् अन्दि नेरम्)
ती वेळ तिन्ही सांजेची वेळ
அன்புத் தூறல் போடாதா (अन्बुत् तूऱल् पोडादा)
प्रेमाचा शिडकावा होणार नाही का ?
கண்ணில் ஓரழகு (कण्णिल् ओरऴगु)
डोळ्यातले एक सौंदर्य
கையில் நூறழகு (कैयिल् नूऱऴगु)
हातात शतसौंदर्य
உன்னால் பூமி அழகே (उन्नाल् बूमि अऴगे)
तुझ्यामुळे ही भूमी सुंदर झाली आहे
உன்னில் நானழகு (उन्निल् नानऴगु)
तुझ्यामध्ये मी सुंदर झालो आहे
என்னில் நீயழகு (एन्निल् नीयऴगु)
माझ्यात तू सुंदर झाली आहेस
நம்மால் யாவும் அழகே (नम्माल् यावुम् अऴगे)
आपल्यामुळे सगळेच सुंदर झाले आहे
ஹோ… கண்ணதாசன் பாடல்வரி போல (हो…. कण्णदासन् पाडल्वरि पोल)
हो.. कण्णदासांच्या काव्यपंक्तीप्रमाणे
கொண்ட காதல் வாழும் நிலையாக (कॊण्ड कादल् वाऴुम् निलैयाग)
प्रेम असेच अजरामर राहो
கம்பன் பாடிப் போன தமிழ்ப் போல (कम्बन् पाडिप् पोन तमिऴ्प् पोल)
कवी कम्बन् ह्यांनी गायलेल्या तमिळ प्रमाणे
இந்த நாளும் வேகம் நலமாக (इन्द नाळुम् वेगम् नलमाग)
हा दिवस सुद्धा टिकून राहो
மழை நீயாக (मऴै नीयाग)
तू पाऊस हो
வெயில் நானாக (वॆयिल् नानाग)
मी ऊन होईन
வெள்ளாமை நீ ஆஆ (वॆळ्ळामै नी आआ)
शुभ्र कासव तू
கொஞ்ச நேரம் கொஞ்ச நேரம் (कॊंज नेरम् कॊंज नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
கொஞ்சிப் பேசக் கூடாதா (कॊंजिप् पेसक् कूडादा)
गोड गोड बोलायला नको का ?
அந்த நேரம் அந்தி நேரம் (अन्द नेरम् अन्दि नेरम्)
ती वेळ तिन्ही सांजेची वेळ
அன்புத் தூறல் போடாதா (अन्बुत् तूऱल् पोडादा)
प्रेमाचा शिडकावा होणार नाही का ?
லாலா லாலா லாலா லாலா லா (लाला लाला लाला लाला ला)
லாலா லாலா லாலா லாலா லா (लाला लाला लाला लाला ला)
லாலா லாலா லாலா லா (लाला लाला लाला ला)
கொக்கிப் போடும் விழி (कॊक्किप् पोडुम् विऴि)
खिळवून ठेवणारी दृष्टी
கொத்திப் போகும் இதழ் (कॊत्तिप् पोगुम् इदऴ्)
मुका घेणारे ओठ
நித்தம் கோலம் இடுமா (नित्तम् कोलम् इडुमा)
कायम रांगोळी काढतील का
மக்கள் யாவரையும் (मक्कळ् यावरैयुम्)
सगळे लोक
அன்பில் ஆளுகின்ற (अन्बिल् आळुकिन्ऱ)
प्रेमाने राज्य करत
உன்னைப் போல வருமா (उन्नैप् पोल वरुमा)
तुझ्यासारखे असतील का ?
வெளி வேஷம் போட தெரியாமல் (वॆळि वेषम् पोड तॆरियामल्)
शुभ्र वस्त्रे परिधान करून, अजाणताही
எனதாசை கூட தடுமாறும் (एनदासै कूड तडुमाऱुम्)
माझ्या भावनाही उचंबळून येतील
ஹம் பல கோடி பேரின் அபிமானம் (हम् पल कोडि पेरिन् अबिमानम्)
कोट्यवधी लोकांना अभिमान वाटेल असा
உனக்காக ஏங்கும் எதிர்காலம் (उनक्काग एंगुम् एदिर्कालम्)
भविष्यकाल तुझ्यासाठी नेहमी राहो
நீ என் நாடு (नी एन् नाडु)
तू माझा देश
நான் உன்னோடு (नान् उन्नोडु)
मी तुझी
மெய்தானே இது (मॆय्दाने इदु)
खरं आहे ना हे
கொஞ்ச நேரம் கொஞ்ச நேரம் (कॊंज नेरम् कॊंज नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
கொஞ்சிப் பேசக் கூடாதா (कॊंजिप् पेसक् कूडादा)
गोड गोड बोलायला नको का ?
அந்த நேரம் அந்தி நேரம் (अन्द नेरम् अन्दि नेरम्)
ती वेळ तिन्ही सांजेची वेळ
அன்புத் தூறல் போடாதா (अन्बुत् तूऱल् पोडादा)
प्रेमाचा शिडकावा होणार नाही का ?
கொஞ்சும் நேரம் கொஞ்சும் நேரம் (कॊंजुम् नेरम् कॊंजुम् नेरम्)
थोडा वेळ थोडा वेळ
எல்லை மீறக் கூடாதா (एल्लै मीऱक् कूडादा)
मर्यादा ओलंडायची नाही का ?
இந்த நேரம் இன்ப நேரம் (इन्द नेरम् इन्ब नेरम्)
ही वेळ ही वेळ
இன்னும் கொஞ்சம் நீளாதா (इन्नुम् कॊंजम् नीळादा)
अजून थोडी लांबणार नाही का ?
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

