पुस्तक – ललित गजानन (Lalit Gajanan)
लेखक – चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ९३
प्रकाशन – मोरया प्रकाशन. एप्रिल २०२३
ISBN – 978-93-92269-11-0
किंमत – रु. १२५ /-

“शेगांवचे संत श्री गजानन महाराज” हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आजच्या दिवसाची तिथी “माघ वद्य सप्तमी” ही गजानन महाराजांचा प्रकटदिन. ह्या दिवशी ते सर्वप्रथम शेगावच्या गावकऱ्यांना दिसले. दिगंबर अवस्थेतल्या रूपात. लोकांनी त्यांच्याकडे कुतूहलाने, संशयाने पाहिलं. पण नंतर झालेल्या चमत्कारांमुळे हे वरवर वेड्याचे रूप पांघरलेले योगी/सिध्दपुरुष आहेत अशी लोकांना खात्री पटली. तिथून त्यांचे भक्त वाढले. त्यांच्या पुढील आयुष्यात बरेच चमत्कार घडले. लोकांना दृष्टांत घडले. हे सगळी कथा “श्री गजानन विजय” ह्या ओवीबद्ध काव्यात आहे. ह.भ.प. दासगणू महाराज ह्यांनी ती लिहिली. “गजानन महाराजांची पोथी” असाच उल्लेख ह्या ग्रंथाचा उल्लेख होतो. महाराजांचे भक्त गावोगावी आहेत. त्यामुळे ह्या पोथीचे नित्यपारायण करणारे, नैमित्तिक पारायण करणारे भाविक शेकड्यानी आहेत. ह्याच पोथीवर आधारित पुस्तक आहे “ललित गजानन”.

पण हे पुस्तक धार्मिक नाही. गजानन महाराजांचे अजून काही चमत्कार किंवा दृष्टांत ह्यात नाहीत. किंवा गजानन महाराजांची उपासना का करावी, कशी करावी असं सांगणारं हे प्रचारकी पुस्तक नाही. तर हे पुस्तक आहे “पोथी”कडे “एक पुस्तक” किंबहुना “एक साहित्यकृती” ह्या अर्थाने बघणारं. आपल्या इष्टदेवतेचे/सद्गुरूंचे चरित्र ह्या भावभक्तीने पोथीकडे बघणं स्वाभाविकच आहे. लेखकानेही पोथीचं तसं वाचन/पारायण केलं आहेच. पण केवळ भाषासौंदर्य म्हणून “गजानन विजय” मधल्या ओळी बघितल्यावर त्यात काय सौंदर्यस्थळं दिसली हे लेखकाला “ललित गजानन” मधून सांगायचं आहे. लेखक चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ, व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबरीने ते उत्तम वाचक, रसिक आणि ललित लेखकही आहेत. त्यांची पुस्तकात करून दिलेली ओळख.

गजानन महाराजांचे चरित्र सांगणे हा पोथीचे लेखक “दासगणू” ह्यांचा उद्देश आहेच. पण ते सांगताना लोकांना सद्वर्तनाचा उपदेश सुद्धा ते करतात. आणि हे सगळं काव्यात गुंफताना ते आकर्षक, काव्यात्मक होईल ह्याची पूर्ण जाणीव ठेवून. त्यामुळे दासगणूंची काय काय लेखन वैशिष्ट्ये ह्यात दिसली ह्याबद्दल चंद्रशेखर टिळकांनी आपली निरीक्षणं सादर केली आहेत. पोथीच्या अध्यायसंख्येप्रमाणे ह्या पुस्तकात पण २१ प्रकरणे आहेत. पण एका अध्यायावर एक असं प्रकरण नाही. तर एकेका मुद्द्यावर एक अशी प्रकरणे आहेत. त्यात लेखकाने थोडक्यात आपला मुद्दा/निरीक्षण सांगितलं आहे. उदाहरण म्हणून मूळ पोथीतल्या ओव्या दिल्या आहेत.

अनुक्रमणिका

सुरुवातीच्या प्रकरणात टिळकांचं म्हणणं/निरीक्षण असं आहे की दासगणूंना “तीन” हा आकडा आवडता असावा. कारण एखाद्या व्यक्तीचं/घटनेचं वर्णन करताना ते बऱ्याच वेळा तीन विशेषणे वापरतात, मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी तीन उदाहरणे देतात, विशिष्ट उल्लेख पोथीत तीन वेळा येतो इ.
पुढे एकेक मुद्द्यावर एक लेख आहे. उदा. “संबोधन ललित” म्हणजे पोथीत वेगेवेगळ्या पात्रांसाठी कुठकुठली संबोधने वापरली आहेत, त्यात कसा वेगळेपणा आहे ह्याबद्दल लिहिलं आहे.
“खाद्य ललित”, “वस्त्र ललित” – पोथीत कुठल्या खाद्यपदार्थांचा, कुठल्या वस्त्र प्रावरणांचा कसा कसा उल्लेख आला आहे.
“विशेषण ललित”, “उपमा ललित” – गजानन महाराज, साधूसंत परमेश्वर किंवा इतर पात्रं ह्यांना कशी चपखल बसणारी विशेषे लावली आहेत; उपमा दिल्या आहेत ह्याबद्दल.
“बोलीभाषा ललित”,”रीत ललित” – शेगांव हे विदर्भातलं- वऱ्हाडातलं गाव. शंभर वर्षांपूर्वीचा काळ. त्यामुळे तेव्हाच्या बोलीभाषेतले खास वेगळे जाणवलेले शब्द लेखकाने निवडून सांगितले आहेत. तसेच तेव्हाच्या जीवनपद्धतीबद्दल काय समजतं हे लेखकाने नमूद केलं आहे.
“नाट्यछटा ललित” – पोथीतले नाट्यमय प्रसंग किंवा संवाद जे एखाद्या नाट्यछटेप्रमाणे सादर करता येऊ शकतील

काही पाने वाचा म्हणजे तुम्हाला लेखनशैली नीट समजेल.
“तीन” बद्दल निरीक्षण

“खाद्य ललित”

“स्वभाव ललित” – पोथीत भरपूर पात्रे आहेत. त्या पात्रांची स्वभाववैशिष्टये कशी नेमक्या शब्दांत दासगणूंनी मंडळी आहेत त्याबद्दल

“तौलनिक ललित” – दोन व्यक्तींची तुलना करताना त्या कशा समा अध्यात्मिक योग्यतेच्या व्यक्ती आहेत हे दाखवताना वापरलेली भाषा

अशा पद्धतीने एक एक संकल्पना घेऊन पूर्ण पोथीचा धांडोळा घेतला तर आपल्या हाती काय भाषिक माणिकमोती सापडतील हे बघण्याचा हा आगळा वेगळा प्रयोग आहे. लेखकाने त्याला जाणवलेले “पॅटर्न”, साम्यस्थळं सांगितली आहेत. ती “तश्शीच” आहेत हे सिद्ध करण्याचा अट्टाहास नाही. लेखक मुद्दा सांगतो आणि न रेंगाळता पुढे जातो. फार जड अशा व्याकरणाच्या किंवा भाषाशास्त्राच्या संज्ञा सुद्धा वापरलेल्या नाहीत. त्यामुळे न कंटाळता एका बैठकीत वाचून होईल असे पुस्तक आहे.
पोथी आपल्या बरोबर ठेवून हे पुस्तक वाचायचं. म्हणजे ती ती ओवी पुढचा मागचा संदर्भ धरून वाचली की मुद्दा लक्षात येतो. प्रसंग विसरलो असू तर तो आठवतो. म्हणून ज्यांनो पोथी वाचली आहे किंवा नियमित पोथी वाचतात त्यांना हे पुस्तक भावेल. जर ती पोथी वाचली नसेल तरी शब्दांच्या गमती वाचायला आवडतील.

आपल्या पुराणकथा, रामायण-महाभारत ही आर्षमहाकाव्ये, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा आणि इतर संत साहित्य हे सगळं आपलं धार्मिक, अध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाचं संचित आहेच. तितकीच ती “भाषिक लेणी” सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही त्या संप्रदायाचे अनुयायी नसाल, देव-दैव-चमत्कार ह्यावर विश्वास ठेवत नसाल तरी भाषिक अंगाने ह्या साहित्यकृतींकडे बघणं तुम्हाला नक्कीच शक्य होईल. बरेच साहित्य संशोधक त्या पद्धतीने अभ्यास करत असतात. ज्ञानेश्वरांचे लडिवाळ शब्द, रामदासांचे नवनवे शब्द योजण्याचे सामर्थ्य ह्या विषयी बऱ्याच वेळा वाचायला मिळतं. अशा अभ्यासकांच्या “रडार”वर “गजानन विजय” सुद्धा येईल हेच चंद्रशेखर टिळकांच्या लेखातून जाणवलं. प्रत्येक पोथी वाचकाने असा वेगळा विचार केला तर अजून काही वेगळे साचे(पॅटर्न), वैशिष्ट्ये जाणवतील. असा विचार करायला उद्युक्त होण्यासाठी “ललित गजानन” वाचा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet