आज ३० जानेवारी. गांधीजींचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने एका जुन्या तमिळ चित्रपटातलं गांधीजींवरचं एक सोपं गाणं.
तमिळ भाषेत “घ” हा वर्ण नसल्यामुळे उच्चार “गांदि” असा केला जातो. “महान” मधल्या “ह” उच्चार देखील “ग” आणि “घ”च्या मधला असा होतो.

மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान (महान गांधी महान)
மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान (महान गांधी महान)

வாழ்ந்த தியாகியாம் நீ
वाळ्न्द त्यागियाम् नी (जिवंत त्यागमूर्ती तू)
பூலோகம் மீதிலே
बूलोगम् मीदिले (ह्या जगतात)
வாழ்ந்த தியாகியாம் நீ
वाळ्न्द त्यागियाम् नी (जिवंत त्यागमूर्ती तू)
பூலோகம் மீதிலே
बूलोगम् मीदिले (ह्या जगतात)

மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान (महान गांधी महान)
மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान (महान गांधी महान)

தேசிய சேவா குரு
देसिय सेवा गुरु (देशसेवा शिकवणारा गुरु)
தெய்வீக பூஜா குரு
दॆय्वीग पूजा गुरु (ईश्वर पूजा शिकवणारा गुरु)
தேசிய சேவா குரு
देसिय सेवा गुरु (देशसेवा शिकवणारा गुरु)
தெய்வீக பூஜா குரு
दॆय्वीग पूजा गुरु (ईश्वर पूजा शिकवणारा गुरु)

ஜெக சேவையே புரிந்தான்
जॆग सेवैये पुरिन्दान् (जगाची सेवा त्याला समजली)
இக ஜோதியாய் நிறைந்தான்
इग जोतियाग निरैन्दान् (एका ज्योती प्रमाणे उभा आहे)
ஜெக சேவையே புரிந்தான்
जॆग सेवैये पुरिन्दान् (जगाची सेवा त्याला समजली)
இக ஜோதியாய் நிறைந்தான்
इग जोतियाग निरैन्दान् (एका ज्योती प्रमाणे उभा राहिला)
சுக வாழ்வையே மறந்தான்
सुग वाळ्वैये मरन्दान् (सुखाचे आयुष्य तो विसरला )

சுக வாழ்வையே மறந்தான்
सुग वाळ्वैये मरन्दान् (सुखाचे आयुष्य तो विसरला )
சுயராஜ்ய வாழ்வை தந்தான்
सुयराज्य वाळ्वै तन्दान् (स्वराज्याचे आयुष्य त्याने दिले)
சுக வாழ்வையே மறந்தான்
सुग वाळ्वैये मरन्दान् (सुखाचे आयुष्य तो विसरला )
சுயராஜ்ய வாழ்வை தந்தான்
सुयराज्य वाळ्वै तन्दान् (स्वराज्याचे आयुष्य त्याने दिले)

மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान (महान गांधी महान)
மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान (महान गांधी महान)

கை ராட்டையே ஆயுதம்
कै राट्टैये आयुदम् (हात चरखा हे आयुध)
கதர் ஆடையே சோபிதம்
कदर् आडैये सोबिदम् (खादी कपड्यांनी शोभित)
கை ராட்டையே ஆயுதம்
कै राट्टैये आयुदम् (हात चरखा हे आयुध)
கதர் ஆடையே சோபிதம்
कदर् आडैये सोबिदम् (खादी कपड्यांनी शोभित)

ஜெய வந்தே மாதரம்
जॆय वन्दे मातरम् (जय वन्दे मातरम्)
ஜெய பாரத மணிக்கொடி
जॆय बारद मणिक्कॊडि (जय भारतीय ध्वज )

ஜெய வந்தே மாதரம்
जॆय वन्दे मातरम् (जय वन्दे मातरम्)
ஜெய பாரத மணிக்கொடி
जॆय बारद मणिक्कॊडि (जय भारतीय ध्वज )

சீரோங்கி வாழ்கவே
सीरोंगि वाळ्गवे (आयुष्मान भव )
சீரோங்கி வாழ்கவே
सीरोंगि वाळ्गवे (आयुष्मान भव )
ஜெய வந்தே மாதரம்
जॆय वन्दे मातरम् (जय वन्दे मातरम्)
ஜெய வந்தே மாதரம்
जॆय वन्दे मातरम् (जय वन्दे मातरम्)

மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान
மகான் காந்தி மகான்
महान गांदि महान

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/