महाराष्ट्राची 'नवरत्न' ठरली आहेत 'भारतरत्न'

 

आत्तापर्यंत नऊ महाराष्ट्रीय व्यक्तींना भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले आहे. ही आहेत ती नऊ रत्ने.

महर्षी धोंडो केशव कर्वे

भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणजे, महर्षी धोंडो केशव कर्वे. २९ ऑक्टोबर १९५८ रोजी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यासाठी त्यांनी आपलं १०४ वर्षांचं जीवन समर्पित केलं होतं. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी हिंगणे येथे उभारलेल्या शाळेचेच पुढे भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला विद्यापीठात रूपांतर झाले. चिकाटी, ध्येयनिष्ठा आणि चारित्र्याच्या बळावर त्यांनी सामाजिक कामांचा डोंगर उभा केला होता

 

महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे

महाराष्ट्राला दुसरं भारतरत्न मिळालं 1963 साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या रूपानं. संस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेचा अभ्यास होता. काणेंनी संस्कृत साहित्य आणि इतर अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या त्यांच्या ग्रंथाच्या चौथ्या खंडाला 1956 साली साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं होतं. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला.

 

विनोबा भावे

थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे. १९२१ मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाली, तेव्हा तिचे नेतृत्व गांधीजींनी विनोबांवर सोपवले होते. गांधीकुलाचे ते आचार्य होते. विनोबा हे गांधीजींचे अध्यामिक वारसदार होते. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. गरीब, शोषित, दलित आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान महामानव होते.

 

जे आर डी टाटा

टाटा समूहाला आणि देशालाही नव्या उंचीवर घेऊन जाणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे जे आर डी टाटा. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळली. त्या वेळी त्यांच्या 22 कंपन्या होत्या. ते निवृत्त झाले, त्या वेळी समूहाच्या 95 कंपन्या होत्या. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. 1932 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या ‘टाटा एअरलाइन्स’चीच आज ‘एअर इंडिया’ झाली आहे. जे आर डींना 1992 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

 

लता मंगेशकर

आपल्या स्वर्गीय स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांनी अक्षरश: हजारो हिंदी-मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये गाणी गायली. गेली सहा दशकं, म्हणजे तीन पिढ्या त्यांची सुमधुर चित्रपट गीतं ऐकत मोठ्या झाल्या.

 

भीमसेन जोशी

ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट, पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचे अभंगाचे गायन सुद्धा फार गाजले होते.

 

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव’ म्हणून जगात ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर !! आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात भारताचा झेंडा डौलानं फडकवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या ‘आपल्या सचिन’ला 2014 मध्ये भारतरत्नने गौरवण्यात आलं. हा सर्वोच्च पुरस्कार पटकावणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण भारतीय आहे.

 

नानाजी देशमुख

नानाजी देशमुख यांनी बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. नंतर त्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेशात कामाला सुरुवात केली. पुढे जनसंघ व जनता पार्टी यांमध्येही ते सक्रिय होते. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. काही काळ ते खासदारही होते. वयाच्या 60 व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी चित्रकुटमध्ये जाऊन आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले. नानाजी देशमुख यांना 2019 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान

 

 


देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरियल्स आहेत. मी या ट्युटोरियल मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/


मराठी भाषा दिवस २०२१ ची धमाल… परदेशी मित्रमैत्रिणी बोलतायत मराठी