Task 5)

Can you read below Marathi text and send me voice recording on LearnMarathiFast@gmail.com before 30th Dec India Time 10 AM. This is an excerpt from a Marathi translation of an English story given here
Text to read – 
बाबांनी दिवा आणला तेव्हा, किंवा कदाचित त्याच्या थोडं आधी असेल, ते आईला म्हणाले, “काय गं, आपण एखादा दिवा नको का आणायला?”
“दिवा? कसला दिवा?”
“आँ? म्हणजे तुला अजून ठाऊक नाही? बाजारगावी तो दुकानदार आहे ना, त्याने सेंट पीटर्सबर्गहून दिवे आणले आहेत. पाईनच्या दहा ढलप्यांपेक्षा भारी आहेत. आपल्या चर्चच्या फादरच्या घरीसुद्धा आहे तसला एक दिवा.”
(फिनलँडमधल्या गरीब घरांमधून प्रकाशासाठी मेणबत्त्या किंवा पलित्यांऐवजी पाईनचे ढलपे वापरले जात.)

“हो, हो! म्हणजे खोलीच्या मध्यभागी तो चमकत असला, की अगदी ढळढळीत दिवस असल्यासारखं कोणत्याही कोपऱ्यात बसून वाचता येतं. तोच दिवा ना?”
“होय, तोच. त्यात तेल असतं ना, ते जळतं. हा दिवा संध्याकाळी लावला, की दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत जळत राहतो.”
“पण तेल तर ओलं असतं ना हो? ते कसं जळेल?”
“काय प्रश्न तरी.. आता ब्रँडी कशी जळते म्हणून विचारशील.”
“अहो, पण सगळं घर नाही का जळणार त्याच्यामुळे? ब्रँडी एकदा जळायला लागली की विझवता येत नाही काही. अगदी पाण्यानेसुद्धा नाही.”
“अग, पण तेल आणि ज्योत दोन्ही काचेत बंद असतील, तर कसं जळेल घर?”
“काचेत? काचेत ज्योत कशी जळेल? तडकणार नाही का?”
“काय तडकायचंय?”
“काच म्हणते मी.”
“तडकणार? छे! ती कधीच तडकत नाही. हां, तू जर आग फारच जोरात वर सरकवलीस तर नक्कीच तडकेल काच. पण तसं करायची सक्ती नाही केलेली कोणी तुला.”
“आग वर सरकवायची? काहीतरीच काय! आग कशी वर सरकवणार?”
“नीट ऐक आता. स्क्रू उजवीकडे सरकवला की वात वर चढते. मेणबत्तीसारखी दिव्यालाही वात असते, आणि ज्योतही असते. आणि स्क्रू डावीकडे सरकवला की ज्योत छोटी होते. फुंकर मारली, की विझते.”
“हो, म्हणे विझते. तुम्ही ढीग समजावलं असेल, पण मला काही एक समजलेलं नाहीये. हे त्या नवश्रीमंत लोकांचं काहीतरी थेर दिसतंय.”
“थांब जरा. मी एखादा दिवा विकतच आणतो, मग नीट समजेल तुला.”
“काय किंमत असते हो त्यांची?”
“साडेसात मार्क्स. आणि तेलाच्या डब्याचा एक मार्क निराळा.”
“साडेसात मार्क्स! आणि वर तेल! अहो, तेवढ्या किंमतीचे ढलपे आणले, तर कितीतरी दिवस पुरतील. पण तुम्ही..तुम्ही ढलप्यांसाठी पैसे मोजणार? आपला पेक्का लाकूड फोडून देतो, तेव्हा एक पेनीसुद्धा वाया जात नाही ना!”
“अग, पण दिवा आणल्यानेसुद्धा पैसे वाया जाणार नाहीत. ढलप्यांच्या लाकडालासुद्धा पैसे पडतात ना! आपल्या इथे सापडेनासं झालंय तसलं लाकूड हल्ली. रजा घेऊन ते शोधायला जावं लागतं, आणि मग कुठून कुठून दूरवरून ओढत इथे आपल्या या दलदलीत आणावं लागतं. आणलं रे आणलं की संपतंसुद्धा लगेच.”

Task 4)

https://youtu.be/XRkaTkZtUNk    Listen to this Marathi narration and write down the text in Marathi(Devanagari) script and send it to on LearnMarathiFast@gmail.com before 27th Dec India Time 10 AM.

The text was

1 बघता बघता २०२१ हे वर्ष संपत आलंय. कोरोनानं आपल्या सर्वांचं आयुष्य बदलून टाकलंय. 
2 या दोन वर्षांत अनेकांचा अधिक विश्वास बसला, की आयुष्य हे फार छोटं आहे.
3 आपलं जगायचंच राहून गेलं तर? 
4 आणि मग काही लोकांनी त्यांच्या जगण्याचाप्राधान्यक्रमबदलायला सुरुवात केली. 
5 तुम्ही असा विचार करताय की नाही अजून? 
6 मित्रांनो, आपला जन्म फक्त बिलं भरण्यासाठी किंवा मरण्यासाठी झाला नसून खऱ्या अर्थानं जगण्यासाठी झालाय हे लक्षात घेतलं पाहिजे. 
7 प्रवासाला प्राधान्य देणारेही काहीजण तयार झाले आहेत. 
8 नवीन वर्षात अनेकांचे बऱ्याच ठिकाणी फिरायला जाण्याचे संकल्प असतीलच. 
9 थोडक्यात, हा सारा खटाटोप कशासाठी? 
10 तर नवं विश्व पाहण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि सुख-दुःखांना सामोरं जात खूश राहण्यासाठी…!
11 सतत खूश राहणं हीदेखील एक कला आहे. 
12 दुसऱ्यांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षाभंगही कमी होतो. 
13 पण त्याहून भारी म्हणजे स्वतःकडून प्रवासाच्या, जगण्याच्या, अनुभव कमवण्याच्या आणि जास्तीत जास्त खूश राहण्याच्या अपेक्षा ठेवूया की…! 
14 ते साधंसोपं आहे तसं पाहिलं गेलं तर
15 असेच बहुसंख्य लोक, जे जास्तीत जास्त खूश असतात ते आपल्या जवळच राहतात, 
16 हे तुम्हाला माहितीये का? 
17 हा देश म्हणजे आपला शेजारी भूतान…! 
18 हा देश त्याच्या अद्वितीय तत्त्वज्ञानासाठी ओळखला जातो.
19 सकल राष्ट्रीय आनंद (Gross National Happiness) हा त्यांच्या विकास धोरणाचा देखील एक भाग आहे.

Task 3)

Translate below Marathi text into Hindi/English. Send me translation on LearnMarathiFast@gmail.com. It is an excerpt from an article here

 

 

 

 

Response from Alok Mishra (With small corrections or alternate wordings)

गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सरगे ब्रिन यांनी १९९८ मध्ये ‘गुगल डूडल’ला जन्म दिला.
The founders of the Google Larry Page and Sergey Brin brought ‘Google Doodle’ into world in 1998. (Literal translation will be “… gave birth to”)
त्याचे झाले असे, की या दोघांना नेव्हाडा डेझर्टमध्ये होणाऱ्या बर्निंग मॅन फेस्टिव्हलला जायचे होते. What happened was that both of them were about to go to Burning Man Festival in Nevada dessert.
त्यावेळी त्यांनी गुगलच्या कॉर्पोरेट लोगोमध्ये बदल केला.
That time they made changes to Google’s corporate logo.
त्यांनी गुगल शब्दाच्या दुसऱ्या ‘O’ मागे एक चित्र काढले, जेणेकरून गुगल वापरणाऱ्यांना हे कळावे, की संस्थापक ऑफिसमध्ये नाहीत.
They drew a picture behind second ‘O’ of the word ‘Google’, so that the users of google can learn that the founder is not in office.
हे पहिले डूडल. It was the first Doodle.
ते अतिशय साधे असले, तरी त्यातूनच खास क्षणांना गुगलच्या लोगोमध्ये बदल करण्याची संकल्पनेने जन्म घेतला.
It was quite simple, but from that special moment the idea of changing the Google’s logo came into existence.
दोन वर्षांनंतर २००० मध्ये लॅरी आणि सरगे यांनी त्यावेळी तिथे इंटर्न असलेल्या डेनिस वाँग याला ‘बॅस्टिल डे’साठी डूडल तयार करायला सांगितले.
After 2 years in 2000, Larry and Sergey told Dennis Wong who was an intern there to prepare a doodle for the Bastille Day.
त्या डूडलला युजर्सकडून खूपच छान प्रतिसाद मिळाला.
That Doodle got a lot of appreciation (literal translation “got very good response”) from the users.
त्यामुळे डेनिस वाँगला मुख्य डूडलर म्हणून नियुक्त करण्यात आले.
Because of that Dennis Wong was appointed as Chief Doodler.
त्यानंतर ‘गुगल’च्या होमपेजवर सातत्याने नवनवीन डूडल्स दिसू लागली.
After that new (novel / variety of) Doodles started appearing regularly on Google’s homepage.
आत्तापर्यंत ‘गुगल’ने जवळपास चार हजार वेगवेगळी डूडल्स तयार केली आहेत.
So far Google has created almost 4 thousand different types of Doodles.
डूडल्स तयार करण्यासाठी त्यांची वेगळी टीम आहे.
A separate team is there to create Doodles. (OR They have a separate team to create doodles)
त्यामध्ये डूडलर्स म्हणून ओळखले जाणारे इलस्ट्रेटर्स आहेत आणि इंजिनिअर्सही आहेत.
In that team there are illustrators known as Doodlers and there are engineers too.
डूडलसाठीच्या नवीन कल्पना गुगलच्या कर्मचाऱ्यांबरोबरच गुगल युजर्सकडूनही येतात.
New ideas for Doodle come from Google’s Employees as well as Google users.
तुम्हीही इलस्ट्रेटर असाल, तर तुम्हीही तुमची कल्पना ईमेलद्वारे त्यांच्याकडे मांडू शकता.
If you are an illustrator too then you can also send your idea to them via email.
गुगलतर्फे ‘गुगल फॉर डूडल अशी स्पर्धाही घेण्यात येते. There is a competition from Google as well called ‘Google for Doodle’ .
त्यामध्ये जिंकलेल्याचे डूडल गुगलच्या होमपेजवर प्रसिद्ध केले जाते. in that the Doodle of the winner is published on Google’s homepage.
काही डूडल्स जगात सर्वत्र दिसतात, तर काही डूडल्स त्या-त्या देशामध्ये दिसतात. उदा. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे डूडल हे फक्त भारतात दिसते.
Some Doodles are visible everywhere in the world but some are visible only in that country for ex. the Doodle of the India’s Independence Day is only visible in India.
तसेच इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यदिनाचे डूडल हे इंडोनेशियामध्येच दिसते, आपल्याकडे दिसत नाही.
In the same way the Doodle of Indonesia’s Independence day is visible only in Indonesia, its not visible to us.
शिक्षक दिन, बाल दिन यांसारखे दिवस प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना असतात.
Days such as Teachers’ Day , Children’s Day are on different dates in every country.
या दिवसाचे डूडल एकच असते, परंतु ते वेगवेगळ्या तारखांना त्या-त्या देशात झळकते.
The Doodle for such days is same but its published on different dates in different countries.
डूडल अमुक एक प्रकारचेच असते असे नाही. Its not that particular Doodle is only of one type. It’s not the case that doodle are any specific type.
यामध्ये चित्रे, रंग, इलस्ट्रेशन स्टाइल, ॲनिमेशन या सगळ्यामध्ये खूप विविधता पाहायला मिळते आणि या सगळ्या विविधतेमधूनही संदेशसुद्धा पोचतो आणि ‘Google’ ही अक्षरेही ठळकपणे दिसतात, हे विशेष!
In that a lot of diversity is seen in the drawings , colors, illustration style , animation and what is special is that all of this diversity there is a message too a message is conveyed through this diversity and especially, the Google word “Google” is also visible prominently.

 

Response from Sundar (With small corrections/alternate wordings)

The founders of Google, Larry Page and Sergei Brin created the Google Doodle in the year 1998. This was what happened, that they both wanted to attend the Burning Man Festival happening in the desert of Nevada. At that time they changed the Google corporate logo. They drew a picture behind the second “O”, so that the Google users would know that the founders were out of office. This was the first doodle. It was very simple, however from that idea of changing to something special in the Google Logo was born. Two years later in the year 2000 Larry and Sergei told Dennis Wong, the intern at that time to design a doodle like for “Bastille day”. A good response was received from the users on that doodle. Therefore Dennis Wang became appointed as the chief doodler. Since then newer and newer doodles became consistently visible in Google home page.

So far, “Google” had prepared almost 4000 different doodles. For preparing doodles, they have different teams. In those teams, there are illustrators known as doodlers and there are also engineers. New ideas for doodles come from Google employees as well as from Google Users. You can also be an illustrator and If you are an illustrator then even you can offer your ideas to them by email. From Google also there is a “Google for Doodle” contest. In that the winner’s doodle becomes famous The Doodle by the winner in that competition is published on Google’s home page. Some doodles appear everywhere in the world, while some doodles appear in some countries. For example. The doodle of India’s Independence Day will appear only in India. Likewise Indonesia’s Independence day doodle will appear only in Indonesia. it will not be visible to you. Days like Teacher’s Day, Children’s day, days like these which occur on different days in each country. The doodles for such day appear as one on a day,  Doodle for such a day is one/same but it will flash differently on different days in different countries. It is not that the doodle is of the one same kind. In this, the pictures, the colors, the illustration styles, the animations in all these so many differences are seen and from this diversity a message is conveyed(reached) and the letters of “Google” are seen prominently, that is special!

Task 2)

Write 15 lines on topic “my favourite TV serial”.  Give text in Hindi/English and line by line translation in Marathi. (Suggestions : Write full test in your language first. Then break longer sentence into small independent sentences. Replace idioms/phrase with general verbs if you do not know corresponding Marathi phrase. )

Response from Alok mishra (With corrections)

1. Honestly speaking, I dont watch TV serials now a days, so I will pick the one I used to watch in my childhood.
खरोखरच बोलतो, खरंच सांगायचं तर मी सध्या टीव्ही serials बघतो बघत नाही, म्हणून मी असा एक निवडेन अशी एक  सिरीयल निवडेन  ज्या जी  मी माझ्या लहानपणीत पाहत असायचो पाहायचो 
2. The name of that TV serial is Shaka-laka-boom-boom.
ते त्या  serialच्या चं  नाव आहे शाका-लाका-बूम-बूम
3. In the Serial SLBB, Sanju was the character who had magical powers.
Serial SLBB मध्ये संजू असा एक पात्र होता असे  एक पात्र होते ज्याकड़े जादुई जादूची शक्ती होती
4. Sanju used to be a 10 -12 years old boy and had 4 5 good friends from his society.
संजू दहा बारा वर्षचा एक मुलगा होता आणि तिच्ये त्याचे 4 5 सोसायटीतील मित्र होत्ये होते
5. Sanju had a pencil which used to do all the magic.
संजूकडे एक पेन्सिल होती ज्या सगळे जादू करायचो जी सगळ्या जादू करायची 
6. The other end of the pencil had very attractive joker face on it.
पेंसिलचे दुसऱ्या टोकाकडे एक बरच बरंच आकर्षक जोकरचा चे तोंड लावलाले  होताते
7. Whenever sanju draws something with his magical pencil and play a chutki with his fingers the drawing will become real.
जेव्हाही संजू त्याच्या जादुई पेंसिलने काहीही चित्र काढतो काढायचा आणि चुटकी वाजवतो वाजवायचा , ते चित्र वास्तविक होईल खरे व्ह्यायचे
8. This was such an creative idea of magic according to me.
माझ्यानुसार ही जादुई कल्पना अतिशय creative (कल्पक )होती
9. But Sanju will always use this magical powers only to help somebody or in case of emergency.
पण संजू नेहमीच त्याच्या जादुई शकत्यांचा शक्तींचा वापर फक्त कोणितारीला कोणालातरी मदतीसाठी किंव्हा आपत्कालीन परिस्थितीत करणार करायचा
10. At that age I almost believed that such pencil exists.
त्या वयात मी जवळजवळ हा विश्वास केला   मला जवळजवळ असा विश्वास वाटायचा  की अशी पेन्सिल अस्तित्वात आहे
11. And later I realized that its not just me, its every kid around me who thinks that.
नंतर मला लक्षात आला आले की मीच नाही आजूबाजूच्या सगळ्या मुलांना हेच वाटतंय
12. The Serial became so famous that all stationary shops and toy shops started selling that pencil.
तोती  सिरीयल एवढाढी प्रसिद्ध झालाली  कि प्रत्येक stationary दुकान आणि खेळण्याचे दुकान ती पेन्सिल ची  विक्री करायला लागले (OR ती पेन्सिल विकायला लागले)
13. Even I bought one for myself.
मी पण एक विकत घेतली माझ्यासाठी
14. The one I bought couldn’t do any magic.
मी विकत घेतलेली पेन्सिल कोणतातीही जादू नाही करू शकली
15. I was disappointed and jealous of Sanju.
मी निराश झालो आणि मला संजूनेची ईर्ष्या वाटत होती

 

Response from Sundar (With corrections. Marathi translation is still not very natural.)

Today watching TV is stressful. One cannot watch violence and sex with old parents and family members.
Life is already stressful enough. There’s so much TV , and all of it demands so much attention.
That’s why I’ve  retreated back in time to slow paced murder mystery in a quiet setting.
One of my favorite TV shows is “Murder, she wrote” which was aired in CBS  from 1984-1996.
This series is an antidote to today’s high-stress TV.
It was an hour-long mystery show. It starred Angela Lansbury as Jessica Fletcher.
She was a widow living in Cabot Cove, Maine, USA. She was a bestselling author after her husband died.
She wrote popular mystery novels, and she was handy at solving murders.
Like a cozy mystery novel, the show had very little sex or violence. That is why I would watch.
I would watch Jessica Fletcher catch the killer at the end of the hour.
She brought civility back to murder mystery shows.
She had a sharp eye when it came to detecting clues. She had
and sharp powers of deduction
she single-handedly faces down murders
at the end.

In these episodes there are also references to English vocabulary. So they are also educative.
The whole setting is relaxing and is a stress-buster.आज TV पाहणे तणावपूर्ण आहे.  वृद्ध आई-वडील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आपण हिंसा आणि लैंगिक संबंध पाहू शकत नाही.
जीवन आधीच तणावपूर्ण आहे. तेथे खूप टीव्ही आहे, टीव्हीहीवर सतत काही ना काही चालू असते आणि ते सर्व खूप लक्ष देण्याची मागणी करतात.
म्हणून मी शांत वातावरणात खुनाचे गूढ धीमे करण्यासाठी मी वेळेत माघार घेतली आहे.
माझ्या आवडत्या टीव्ही शोपैकी एक “मर्डर, तिने लिहिले”  “Murder, she wrote” हा CBS वर 1984-1996 मध्ये प्रसारित झाला.
ही आजच्या उच्च तणावग्रस्त तणावादायक टीव्हीवर उतारा आहे.
हा एक तासाचा मिस्ट्री शो होता. यात अँजेला लॅन्सबरीने जेसिका फ्लेचरची भूमिका केली होती. ती Cabot Cove, Maine, USA येथे राहणारी एक विधवा होती .
तिच्या पतीच्या निधनानंतर सर्वाधिक विकली जाणारी लेखिका सर्वाधिक खपाची पुस्तकं लिहिणारी लेखिका बनली. तिने लोकप्रिय गूढ कादंबऱ्या लिहिल्या. खुनाची उकल करण्यातही ती होती,
एका आरामदायक गूढ कादंबरीप्रमाणे, शोमध्ये खूपच कमी सेक्स किंवा हिंसा होती.  म्हणून मी ते पाहीन पहिले . मी तासाच्या शेवटी जेसिका फ्लेचरला मारेकऱ्याला पकडताना पाहीन पाहायचो.
तिने शोमध्ये सभ्यता परत आणली.
सुगावा शोधताना तिची नजर तीक्ष्ण होती. तिच्याकडे वजावटीची तीक्ष्ण शक्ती होती. तिने एकट्याने खुनाचा सामना केला शेवटी. या भागांमध्ये इंग्रजी शब्दसंग्रहाचे संदर्भ देखील आहेत. त्यामुळे ते अभ्यासूही शिक्षण देणारे सुद्धा आहेत.
संपूर्ण सेटिंग आरामशीर आहे आणि तणाव-“buster”  आहे.

Task 1)

Translate below Marathi text in Hindi/English. Send me translation on LearnMarathiFast@gmail.com

It is a news about “auction of 5G spectrum in India”. It has many English words and company names.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फाइव्ह  जी कनेक्टिव्हिटीचा जम बसू लागला आहे. या शर्यतीत भारत काहीसा मागे असला तरीही हळूहळू भारतात फाइव्ह जीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात होत आहे. रिलायन्स जिओ, व्होडाफोन- आयडिया म्हणजे व्ही, एअरटेल या तिन्ही कंपन्या लिलावात सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहेत. पुढील वर्षी १५ ऑगस्टपासून भारतात फाइव्ह जी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. साधारणपणे एप्रिल-मेच्या सुमारास स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. या लिलावासाठी रक्कम काय असावी याबद्दल मतमतांतरे असून आधारभूत रक्कम ठरविण्याचे ट्रायचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पेपरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्पेक्ट्रमसाठी किंमत काय असावी, त्याचा बँड कोणता असावा, इतर अटी-शर्ती काय असाव्यात यावर कंपन्या आणि मान्यवर तज्ज्ञांची मते जाणून घेण्याचा ट्रायचा प्रयत्न आहे. वेगवेगळय़ा कारणांनी स्पेक्ट्रमचा लिलाव रखडल्यामुळे ५ जी सेवांना विलंब होत असल्याचा ठपका यंत्रणांवर ठेवला जात आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर तांत्रिक प्रक्रिया पार पाडून १५ ऑगस्ट २०२२ चा मुहूर्त साधण्याचा यंत्रणांचा प्रयत्न असेल.

फाइव्ह जी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने योग्य मोबाइल फोन बाजारात आणण्याचा प्रयत्न मोबाइल कंपन्या करत आहेत. सॅमसंग, ओप्पो, व्हिवो, वन प्लस यांच्या नवीन मोबाइल फोनमध्ये ४ जी, ४ जी एलटीईबरोबरच फाइव्ह जीचा सुद्धा पर्याय देण्यात आला आहे. भविष्याचा विचार करून ४ जी फोन्सच्या रेंजमध्येच फाइव्ह  जीचा पर्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे नवीन ग्राहक या फोन्सना पसंती देत आहेत.

Hindi Translation  (It was given by Sandeep Dixit. I made minor changes)

आजकल अंतरराष्ट्रीय बाजार में फाइव जी कनेक्टिविटी अपनी जगह बनाने लगी है।   इस दौड़ में भारत कुछ पीछे है फिर भी धीरे धीरे फाइव जी की दृष्टि से कदम उठाने की शुरुवात हो रही है | रिलायन्स जिओ, व्होडाफोन- आयडिया अर्थात वी,  एयरटेल ये तीन कम्पनियाँ नीलामी में भाग लेने के प्रयत्न में हैं।  अगले वर्ष १५ अगस्त से भारत में फाइव जी सेवा शुरू करने की दृष्टि से सरकार के प्रयत्न चल रहे हैं।  साधारणतः अप्रेल-मई के आसपास स्पेक्ट्रम की नीलामी होने की सम्भावना है।  इस नीलामी की रकम कितनी हो इसमें मतभेद होने के कारण न्यूनतम राशि तय करने के ट्राई के प्रयत्न चालू हैं।  इसके लिए एक पेपर भी प्रकाशित किया गया है।  स्पेक्ट्रम के लिए क्या मूल्य होना चाहिए , उसका बैंड कौन सा होना चाहिए , दूसरे नियम व शर्ते क्या होने चाहिए इस पर कम्पनियाँ और जाने माने विशेषज्ञों की राय जानने का ट्राई का प्रयत्न है  | अलग अलग कारणों से स्पेक्ट्रम की नीलामी में देर होने के कारण ५ जी सेवा में देरी होने का दोष सरकारी तंत्र पर थोपा जाता है  | इस कारण अब जल्दी से जल्दी तकनीकी प्रक्रिया पूरी करके १५ अगस्त २०२२ का लक्ष्य पूरा करने का सरकार का प्रयास है। 

फाइव जी तकनीक से युक्त मोबाइल फोन बाजार में लाने का प्रयत्न मोबाइल कम्पनियाँ भी कर रही हैं।   सैमसंग , ओप्पो , वीवो , वन प्लस के नए मोबाइल फ़ोन में ४ जी , ४जी  एलटीई के साथ ५ जी  का विकल्प भी दिया गया है।  भविष्य का विचार करके ४ जी फोन की श्रंखला में ही फाइव जी का विकल्प देने का प्रयास हो रहा है। इस कारण नए ग्राहक इन फोनों को प्राथमिकता दे रहे हैं।

English Translation (Given by Kannan Iyer. I made changes and corrections)

5G connectivity has started making its mark in international market these days. Though India is a bit behind in this race, it has gradually begun to take steps to implement a 5-G plan. Reliance, Geo, Vodafone (known as V), Airtel – these three companies are trying to participate in the auction. The government working towards the launch of 5-G network service in the country on Aug 15 of next year. The spectrum auctions will probably take place around April-May. There is a difference of opinions about the price of the spectrum and TRY is trying to determine the base price. A paper has been published for this purpose. What should be the pricefor the spectrum, what band it should be on, what should be the terms and conditions – on these aspects, TRY is trying to understand opinions of companies and experts. Because the auction has been delayed for many reasons, the delays in implementing 5G service have been blamed on the (government) agencies.Therefore, agencies will try to finish technical processes early to meet the deadline of 15th of August.

Mobile phone companies are trying to bring a mobile phone which will be compatible with 5G technology to market. 5G compatibility/option is given along with 4G LTEin mobile phones from Samsung, Oppo, Vivo, One Plus. With the future in mind, 5G capabilities are being built into the range of 4G phones itself. Therefore, new customers are preferring these phones.