चित्रपटाची कथा अशी की लोकनृत्य करणाऱ्या घराण्यातला नायक आणि शास्त्रीय भरतनाट्यम करणारी नायिका ह्यांचं प्रेम जमलंय. नायिकेचे शास्त्रीय नर्तक लोककलेला कमी लेखून ह्या प्रेमाला विरोध करतायत. त्या विरोधाची पार्श्वभूमी ह्या गाण्याला आहे.
गाण्याची सुरुवात ज्या शब्दांनी होते त्या “मार्गऴित्तिंगळ्” शब्दाला सुद्धा वेगळी पार्श्वभूमी आहे. तमिळ मधील “मार्गऴि मादम्” म्हणजे मराठीत मार्गशीर्ष महिना. पण तमिळ सौर कालगणनेनुसार त्याची सुरुवात महाराष्ट्रापेक्षा थोड्या वेगळ्या दिवशी होऊ शकते. हिंदू धर्मातला पवित्र महिना. दक्षिण भारतात ह्या महिन्याला अतीव महत्व आहे. देवळांमध्ये खूप उत्सव, आराधना , पूजा अर्चा होत असतात. तामिळनाडू मधील स्त्री संत “आंडाळ” ह्यांनी “तिरुप्पावै” आणि “नाच्चियार् तिरुमोळि” ही काव्ये लिहिली. भक्तीरसाने भरलेली ही काव्ये आहेत. “मार्गऴि मादम्” मध्ये “तिरुप्पावै”च्या वाचन-गायनाचे खास महत्त्व आहे. “तिरुप्पावै” मधल्या पहिल्या श्लोकाची सुरुवात “मार्गऴित्तिंगळ्” ने होते. तो श्लोक चित्रपटातल्या गाण्याच्या सुरुवातीला आहे.
संत “आंडाळ” ह्यांचे लहानपणीचे नाव “कोदै”. तिचे वडील स्वतः मोठे देवभक्त. देवळात नित्य पूजा करत. कोदै त्यांना तयारीत मदत करे. देवाला घालायला हार करायला मदत करे. कोदैने एकदा सहज देवासाठीचा हार आधी स्वतःला घालून बघितला. आरशात बघितले. छान दिसतोय मगच देवाला दिला. तसं ती रोज करू लागली. एकदा वडिलांनी ते बघितलं. देवाचा हार असा वापरलेला बघून ते संतापले. तिला ओरडले. त्यांनी दुसरा हार केला. पण देवाच्या मूर्तीवर तो राहीना. शेवटी देवाने सांगितले की कोदैने घातलेला हारच तो स्वीकारेल. त्यामुळे त्यांना “सूडित् तन्द सुडर्क्कॊडि” – तेजस्वी स्त्री जिने आपला हार देवाला घातला – अशा वाक्प्रचाराने ओळखले जाते. ही शब्दरचना पण गाण्यात येते. तसेच “आंडाळ” म्हणजे देवावरची जिची सत्ता चालते अशी. मोठी झाल्यावर “आंडाळ”ह्यांनी प्रत्यक्ष श्री रंगनाथ स्वामींशी लग्न केले आणि त्या देवात एकरूप झाल्या.
पहिला श्लोक प्राचीन तमिळ मधला असल्यामुळे त्याचे शब्दश: भाषांतर दिले नाहीये. त्याचे बोल आणि साधारण अर्थ दिला आहे.
(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
श्लोक –
மார்கழித்திங்கள் மதிநிறைந்த நன்னாளால் (मार्गऴित्तिंगळ् मदिनिऱैन्द नन्नाळाल्)
நீராடப்போதுவீர் (नीराडप्पोदुवीर्)
போதுமினோ, நேரிழையீர்! पोदुमिनो, नेरिऴैयीर्!)
சீர்மல்கும் ஆய்ப்பாடிச் செல்வ சிறுமீர்காள்! (सीर्मल्गुम् आय्प्पाडिच् सॆल्व चिऱुमीर्गाळ्!)
கூர்வேல் கொடுந்தொழிலன் நந்தகோபன் குமரன் (कूर्वेल् कॊडुन्तॊऴिलन् नन्दगोपन् कुमरन्)
ஏர் ஆர்ந்தகண்ணி யசோதை இளஞ்சிங்கம் (एर् आर्न्तकण्णि यसोदै इळंचिंगम्)
मार्गशीर्ष महिना, किती शुभ दिवस ! वृंदावनात राहणाऱ्या, सजून धजून चाललेल्या गोपींनो, आपण स्नानाला जाऊया.
नंदाचा गोप, यशोदेचा बछडा, तिकडे भेटेल. या आपण सगळे शुभ दिवस साजरा करूया.
गाणे –
மார்கழித் திங்களல்லவா (मार्गऴित् तिंगळल्लवा)
“मार्गऴि मादम्” आहे ना
மதிகொஞ்சும் நாளல்லவா (मदिकॊंजुम् नाळल्लवा)
शुभ दिवस आहे ना
இது கண்ணன் வரும் பொழுதல்லவா (इदु कण्णन् वरुम् पॊऴुदल्लवा)
ही कृष्ण येण्याची वेळ झाली ना
ஒருமுறை உனது திருமுகம் பார்த்தால் (ऒरुमुऱै उनदु तिरुमुगम् पार्त्ताल्)
तुझे शुभ मुख एकदा बघितले की
விடை பெறும் உயிரல்லவா (विडै पॆऱुम् उयिरल्लवा)
माझे प्राण निरोप घेतील

வருவாய் தலைவா (वरुवाय् तलैवा)
ये ! माझ्या स्वामी
வாழ்வே வெறும் கனவா (वाऴ्वे वॆऱुम् कनवा)
आयुष्य फक्त स्वप्नच आहे का

இதயம் இதயம் எரிகின்றதே (इदयम् इदयम् ऎरिगिन्रदे)
हृदय माझे हृदय जळते आहे
இறங்கிய கண்ணீர் அணைக்கின்றதே (इरंगिय कण्णीर् अणैक्किन्रदे)
ओघळणारे अश्रू सुकून जातायत
உள்ளங்கையில் ஒழுகும் நீர்போல் (उळ्ळंगैयिल् ऒऴुगुम् नीर्पोल्)
ओंजळीतून निसटणाऱ्या पाण्याप्रमाणे
என்னுயிரும் கரைவதென்ன (ऎन्नुयिरुम् करैवदॆन्न)
माझा प्राणही विरघळून जाईल का
இருவரும் ஒரு முறை காண்போமா (इरुवरुम् ऒरु मुऱै काण्बोमा)
आपण दोघे एकमेकांना बघू का ?
இல்லை நீ மட்டும் என்னுடல் காண்பாயா (इल्लै नी मट्टुम् ऎन्नुडल् काण्बाया)
का तू फक्त माझे गतप्राण शरीरच बघशील
கலையென்ற ஜோதியில் காதலை எரிப்பது சரியா (कलैयॆन्र जोदियिल् कादलै ऎरिप्पदु सरिया)
कलारूपी ज्योतीने प्रेम जाळून टाकणे योग्य आहे का ?
பிழையா ? விடை நீ சொல்லய்யா (पिऴैया ? विडै नी सॊल्लय्या)
चूक आहे का ? उत्तर तू देशील का ?
மார்கழித் திங்களல்லவா (मार्गऴित् तिंगळल्लवा)
“मार्गऴि मादम्” आहे ना
மதிகொஞ்சும் நாளல்லவா (मदिकॊंजुम् नाळल्लवा)
शुभ दिवस आहे ना
இது கண்ணன் வரும் பொழுதல்லவா (इदु कण्णन् वरुम् पॊऴुदल्लवा)
ही कृष्ण येण्याची वेळ झाली ना
ஒருமுறை உனது திருமுகம் பார்த்தால் (ऒरुमुऱै उनदु तिरुमुगम् पार्त्ताल्)
तुझे शुभ मुख एकदा बघितले की
விடை பெறும் உயிரல்லவா (विडै पॆऱुम् उयिरल्लवा)
माझे प्राण निरोप घेतील
ஒருமுறை உனது திருமுகம் பார்த்தால் (ऒरुमुऱै उनदु तिरुमुगम् पार्त्ताल्)
तुझे शुभ मुख एकदा बघितले की
விடை பெறும் உயிரல்லவா (विडै पॆऱुम् उयिरल्लवा)
माझे प्राण निरोप घेतील
வருவாய் தலைவா (वरुवाय् तलैवा)
ये ! माझ्या स्वामी
வாழ்வே வெறும் கனவா (वाऴ्वे वॆऱुम् कनवा)
आयुष्य फक्त स्वप्नच आहे का
சூடித் தந்த சுடர்க்கொடியே (सूडित् तन्द सुडर्क्कॊडिये)
जिने आपला हार देवाला घातला अशा तू !
சோகத்தை நிறுத்திவிடு (सोगत्तै निऱुत्तिविडु)
शोक आवर
நாளை வரும் மாலையென்று (नाळै वरुम् मालैयॆऩ्ऱु)
उद्या पुन्हा हार घालता येईल
நம்பிக்கை வளர்த்துவிடு (नम्बिक्कै वळर्त्तुविडु)
विश्वास ठेव
நம்பிக்கை வளர்த்துவிடு (नम्बिक्कै वळर्त्तुविडु)
विश्वास ठेव
நம் காதல் ஜோதி கலையும் ஜோதி (नम् कादल् जोदि कलैयुम् जोदि )
आपले प्रेम एक ज्योत आहे, कला सुद्धा ज्योत आहे
கலைமகள் மகளே வா வா (कलैमगळ् मगळे वा वा)
हे कलेच्या देवतेच्या मुली ये ये
காதல் ஜோதி கலையும் ஜோதி. (कादल् जोदि कलैयुम् जोदि )
प्रेम ही ज्योत आहे कलाही ज्योत आहे
ஜோதி எப்படி ஜோதியை எரிக்கும் (जोदि एप्पडि जोदियै ऎरिक्कुम्)
ज्योत ज्योतीला कशी जाळेल
ஜோதி எப்படி ஜோதியை எரிக்கும் (जोदि एप्पडि जोदियै ऎरिक्कुम्)
ज्योत ज्योतीला कशी जाळेल
வா…..(वा…..)
ये !
மார்கழித் திங்களல்லவா (मार्गऴित् तिंगळल्लवा)
“मार्गऴि मादम्” आहे ना
மதிகொஞ்சும் நாளல்லவா (मदिकॊंजुम् नाळल्लवा)
शुभ दिवस आहे ना
இது கண்ணன் வரும் பொழுதல்லவா (इदु कण्णन् वरुम् पॊऴुदल्लवा)
ही कृष्ण येण्याची वेळ झाली ना
மதிகொஞ்சும் நாளல்லவா (मदिकॊंजुम् नाळल्लवा)
शुभ दिवस आहे ना
இது கண்ணன் வரும் பொழுதல்லவா (इदु कण्णन् वरुम् पॊऴुदल्लवा)
ही कृष्ण येण्याची वेळ झाली ना
மார்கழித் திங்களல்லவா (मार्गऴित् तिंगळल्लवा)
“मार्गऴि मादम्” आहे ना
மதிகொஞ்சும் நாளல்லவா (मदिकॊंजुम् नाळल्लवा)
शुभ दिवस आहे ना
இது கண்ணன் வரும் பொழுதல்லவா (इदु कण्णन् वरुम् पॊऴुदल्लवा)
ही कृष्ण येण्याची वेळ झाली ना
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link