वयाच्या सोळा सतराव्या वर्षी मदर टेरेसा यांनी स्वतःचं जीवन ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी वाहून घ्यायचं ठरवलं. भारतातून आलेल्या धर्मप्रसारकांचं सेवाकार्य त्यांनी ऐकलं होतं. त्यामुळे त्या गटालाच जाऊन मिळायचं त्यांनी ठरवलं आणि त्या भारतात आल्या. सुरुवातीला कलकत्त्यातल्या एका कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून त्या काम करू लागल्या. त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल पुस्तकातला हा मजकूर.
त्यांच्या पंथाची पुरुष शाखा सुद्धा पुढे त्यांनी सुरू केली. चर्चच्या नियमाप्रमाणे महिला असल्यामुळे त्या स्वतः याचे नेतृत्व करू शकत नव्हत्या. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक त्यांना करावी लागली. पण सर्व अधिकार स्वतःकडे ठेवायची त्यांची वृत्ती असल्यामुळे त्या नव्या प्रमुखाबरोबर अनेकदा त्यांचे वाद झाले. शेवटी त्या प्रमुखाने हे पद सोडलं आणि तेरेसाना साजेशी भूमिका असणाऱ्या माणसाची या पदी नियुक्ती झाली.
आपला पंथ जगभर पसरवण्याची परवानगी पुढे चर्चने त्यांना दिली. यातून मदर तेरेसा यांचे देशोदेशी दौरे सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम, मरणासन्न व्यक्तींसाठी आश्रम, नैसर्गिक संकटामध्ये मदत कार्य इ. सुरू झाले. देशोदेशींचे लोक त्यांना येऊन मिळाले. काही जमेल तशी मदत करू लागले. सामान्य लोकांपासून राष्ट्रप्रमुखांपर्यंत आणि उद्योगपतींपर्यंत त्यांची ऊठ-बस वाढू लागली. मोठमोठ्या देणग्या मिळू लागल्या या सगळ्या घटनांचा उहापोह पुस्तकात आहे. त्यांच्या कामाबद्दल विविध देशांच्या प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रम झाले, वृत्तपत्रांत लेख लिहून आले. त्यातून त्यांची प्रसिद्धी अजून वाढत गेली. त्यातले काही महत्त्वाचे टप्पे प्रसंग, मुलाखती इ. त्याबद्दल या पुस्तकात लिहिले आहे
जसजशी मदर टेरेसा यांच्या कामाची व्याप्ती आणि प्रसिद्धी वाढत होती तसतशी त्यांच्या कामाची निर्भिड चिकित्सा होऊ लागली. वाजवी आणि कठोर टीकाही होऊ लागली. मदर टेरेसा मरणातून व्यक्तींसाठी आश्रम चालवतात पण प्रत्यक्षात तिथे लोकांवर उपचार करण्याऐवजी मरताना म्हणायच्या प्रार्थनाच म्हटल्या जातात. त्यांना लोकांना वाचवायचं नव्हतं तर मरताना केवळ प्रेमाचा हात द्यायचा होता; अशी टीका होऊ लागली. गरिबांसाठी केलेल्या कामातही गरिबी हटवण्याचे उपाय करण्याऐवजी केवळ गरिबांना तात्पुरती मदत देत राहणं हेच त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे त्यांचं प्रेम गरिबांवर नसून; गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीतून होणारा धर्मप्रसार आहे असं अनेकांचं मत झालं. त्यात फक्त ख्रिश्चनेतर भारतीयच नव्हते तर युरोपियन, अमेरिकन, ख्रिस्ती लोकही होते. गर्भपात व संततिनियमन याबद्दलही त्यांची मतं सनातनी ख्रिस्ती व्यक्तीची होती. गर्भपाताला विरोध होता. संततिनियमन नैसर्गिक पद्धतीने करावं हे त्यांनी उघडपणे सतत सांगितलं. आणि हे आपल्या कामाचं मुख्य ध्येय आहे असं त्या म्हणत. त्यामुळे बेसुमार लोकसंख्यावाढ गरीबीला कारणीभूत होत असली तरी त्याच्याशी त्यांना घेणंदेणं नव्हतं. कारण ख्रिश्चन धर्मात बसत नव्हतं. त्यांच्या पंथा साठी काम करणाऱ्या व्यक्तींना गरिबीत राहण्याची आज्ञा होती. प्रत्यक्ष पैसा मिळेलअसं काम करण्याची मनाई होती. पण राजकारण्यांकडून, उद्योगपतींकडून देणग्या घ्यायला मात्र त्या तयार होत्या. देणग्या घेताना तो माणूस कसा आहे; त्याने वाममार्गाने पैसा मिळवला आहे की काय हे बघण्याची त्यांची तयारी नव्हती. उलट काळे धंदे करणार्या व्यक्तींकडून आपण पैसा घेतला आणि तो देवाच्या कामासाठी वापरला तर आपोआपच त्यालाही याचं अध्यात्मिक पुण्य मिळेल असा त्यांचा विचार होता. त्यामुळे मिळालेल्या देणग्या आणि त्यांची व्यवस्था कशी लावली याबद्दल बहुतेक वेळा त्यांनी उत्तर देणं टाळलं किंवा देव सगळे बघून घेईल अशा पद्धतीची उत्तरे दिली. आयुष्यात अगदी गलितगात्र होईपर्यंत आपलं पद सोडून उत्तराधिकारी नेमायची त्यांनी तयारी दाखकली नाही. या आणि अशा बऱ्याच टीकां वरचा सविस्तर लेख पुस्तकात आहे. त्यांच्याबद्दल टीकात्मक लेख, पुस्तके प्रसिद्ध झाली, कार्यक्रम, सिनेमा किंवा फिल्म तयार झाल्या हे सगळे लेखकाने मांडला आहे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————
———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–