पुस्तक : Mrs. Funnybones (मिसेस. फनीबोन्स)

लेखिका : Twinkle Khanna (ट्विंकल खन्ना)

भाषा : English (इंग्रजी)

पाने : २३५

ISBN : 978-0-143-42446-8


ट्विंकल खन्ना या प्रसिद्ध हिंदी अभुनेत्रीने तिच्या नेहमीच्या आयुष्यातले प्रसंग जरा काल्पनिकतेची जोड देऊन विनोदी पद्धतीने सादर करायचा प्रयत्न केला आहे. ट्विंकल म्हणे पेपरात लिहिते. पण मी काही तिचे आधी काही व्चाचले नव्हते. त्यामुळे विनोदी पुस्तक आणि तेही वेगळ्याच लेखिकेने लिहिलेले म्हणून अपेक्षेने हातात घेतले. पण पुस्तकाने निराशा केली. मध्येच एखाददुसरं विनोदी वाक्य सोडलं तर वाचताना हसू येत नाही. प्रत्येक वाक्यावाक्याला तिरकस पद्धतीने लिहून विनोद करण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतो. 

हा एक लेख वाचा. 



सासू-सुनांची वाद, तिच्या ऑफिसमधल्या लोकांनी घरी वाईट बातमी सांगून सुट्टी घेणं, उपास करायला न जमणं असा “टिपिकल” गोष्टी तशाच टिपिकल पद्धतीने मांडल्या आहेत. 


अनुक्रमणिका:



मी बरीच पानं वाचली. पुढची चाळली. आणि मग पुस्तक वाचायचं सोडून दिलं. पु.ल., मंगला गोडबोले यांचं मराठीतलं लेखन, “तारक मेहता का उल्ट चश्मा” मालिका, “रमणी व. रमणी” ही तमिळ मालिका यांमध्येपण तुमचं आमचं नेहमीचं जगणंच असतं पण ते कधीकधी खुदुखुदु हसायला लावणारं तर कधी खो खो हसायला लावणारं असतं. विचार करायला लावणारं असतं. तसं इथे काहीच होत नाही. त्यापेक्षा ट्विंकलने तिच्या आयुष्यातले प्रसंग खरे खरे, जसे घडले तसे लिहिले असते तरी ते खूप रोचक झाले असते. एक अभिनेत्री म्हणून वावरताना काय मजा आली, काय अडचणी आल्या हे वाचकांना नीट कळलं असतं.

 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet