(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

நதியே நதியே காதல் நதியே (नदिये नदिये कादल् नदिये)
नदी गं, नदी गं, प्रेमसरिते !
நீயும் பெண் தானே (नीयुम् पॆण् दाने)
तू पण स्त्रीच आहेस ना
அடி நீயும் பெண் தானே (अडि नीयुम् पॆण् दाने)
अगं तू पण स्त्रीच आहेस ना
ஒன்றா இரண்டா காரணம் நூறு (ऒन्रा इरण्डा कारणम् नूरु)
एक दोन काय शंभर कारणं सांगेन
கேட்டால் சொல்வேனே (केट्टाल् सॊल्वेने)
विचारलंस तर सांगेनच
நீ கேட்டால் சொல்வேனே (नी केट्टाल् सॊल्वेने)
तू विचारलंस तर सांगेनच

நடந்தால் ஆறு எழுந்தால் அருவி (नडन्दाल् आरु एऴुन्दाल् अरुवि)
चालू लागली तर नदी, उभी राहिली तर धबधबा
நின்றால் கடல் அல்லோ (निन्राल् कडल् अल्लो )
स्थिर झाली तर समुद्र, नाही का !
சமைந்தால் குமரி மணந்தால் மனைவி (समैन्दाल् कुमरि मणन्दाल् मनैवि)
वयात येताच कुमारी, लग्न झाल्यावर पत्नी
பெற்றால் தாய் அல்லோ (पॆट्राल् ताय् अल्लो)
प्रसूतीनंतर आई, नाही का !
சிறு நதிகளே நதியிடும் கரைகளே (सिरु नदिगळे नदियिडुम् करैगळे )
अगं लहान नदी, नदीच्या तटांनो,
கரைதொடும் நுரைகளே (करैतॊडुम् नुरैगळे)
तटांना स्पर्शणारं फेसाळतं पाणी
நுரைகளில் இவள் முகமே (नुरैगळिल् इवळ् मुगमे)
त्या फेसाळत्या पाण्यात हिचा चेहरा !
சிறு நதிகளே நதியிடும் கரைகளே (सिरु नदिगळे नदियिडुम् करैगळे )
अगं लहान नदी, नदीच्या तटांनो,
கரைதொடும் நுரைகளே (करैतॊडुम् नुरैगळे)
तटांना स्पर्शणारं फेसाळतं पाणी
நுரைகளில் இவள் முகமே (नुरैगळिल् इवळ् मुगमे)
त्या फेसाळत्या पाण्यात हिचा चेहरा !

தினம் மோதும் கரை தோறும் (दिनम् मोदुम् करै तोरुम्)
प्रत्येक दिवशी नदी जाते त्या प्रत्येक तीरावर
அட ஆறும் இசை பாடும் (अड आरुम् इसै पाडुम्)
ही नदी संगीत गाते
ஜில் ஜில் ஜில் என்ற ஸ்ருதியிலே (जिल् जिल् जिल् एन्र स्रुतियिले)
झुळझुळ झुळझुळ अशा श्रुतींमध्ये(स्वरांत)
கங்கை வரும் யமுனை வரும் (गंगै वरुम् यमुनै वरुम्)
गंगा येईल, यमुना येईल
வைகை வரும் பொருணை வரும் (वैकै वरुम् पॊरुणै वरुम्)
वैगै येईल, पोरुणै नावाची नदी येईल
ஜல் ஜல் ஜல் என்ற நடையிலே (जल् जल् जल् एन्र नडैयिले)
जल् जल् जल् अशी चालत

தினம் மோதும் கரை தோறும் (दिनम् मोदुम् करै तोरुम्)
प्रत्येक दिवशी नदी जाते त्या प्रत्येक तीरावर
அட ஆறும் இசை பாடும் (अड आरुम् इसै पाडुम्)
ही नदी संगीत गाते
ஜில் ஜில் ஜில் என்ற ஸ்ருதியிலே (जिल् जिल् जिल् एन्र स्रुतियिले)
झुळझुळ झुळझुळ अशा श्रुतींमध्ये(स्वरांत)
கங்கை வரும் யமுனை வரும் (गंगै वरुम् यमुनै वरुम्)
गंगा येईल, यमुना येईल
வைகை வரும் பொருணை வரும் (वैकै वरुम् पॊरुणै वरुम्)
वैगै येईल, पोरुणै नावाची नदी येईल
ஜல் ஜல் ஜல் என்ற நடையிலே (जल् जल् जल् एन्र नडैयिले)
जल् जल् जल् अशी चालत

காதலி அருமை பிரிவில் (कादलि अरुमै पिरिविल्)
प्रेयसीचं महत्त्व विरहात कळतं
மனைவியின் அருமை மறைவில் (मनैवियिन् अरुमै मरैविल्)
पत्नीचं महत्त्व तिच्या निधनानंतर कळतं
நீரின் அருமை அறிவாய் கோடையிலே (नीरिन् अरुमै अरिवाय् कोडैयिले)
पाण्याचं महत्त्व उन्हाळ्यात जाणवतं

வெட்கம் வந்தால் உறையும் (वॆट्कम् वन्दाल् उरैयुम्)
लाज वाटली तर स्तब्ध होईल/स्वतःला झाकून बसेल
விரல்கள் தொட்டால் உருகும் (विरल्गळ् तॊट्टाल् उरुगुम्)
बोटांचा स्पर्श झाला तर वितळेल
நீரும் பெண்ணும் ஒன்று வாடையிலே (नीरुम् पॆण्णुम् ऒन्रु वाडैयिले)
पाणी आणि स्त्री दोघींचा सुगंध सारखा
தண்ணீர் குடத்தில் பிறக்கிறோம் (तण्णीर् कुडत्तिल् पिऱक्किऱोम्)
पाण्याच्या भांड्यात (गर्भाशयात) जन्म घेतो
தண்ணீர் கரையில் முடிக்கிறோம் (तण्णीर् करैयिल् मुडिक्किऱोम्)
पाण्याच्या शेजारीच अंत (अंत्यविधी) होतो
தண்ணீர் குடத்தில் பிறக்கிறோம் (तण्णीर् कुडत्तिल् पिऱक्किऱोम्)
पाण्याच्या भांड्यात (गर्भाशयात) जन्म घेतो
தண்ணீர் கரையில் முடிக்கிறோம் (तण्णीर् करैयिल् मुडिक्किऱोम्)
पाण्याच्या शेजारीच शेवट (अंत्यविधी) होतो

வண்ண வண்ண பெண்ணே (वण्ण वण्ण पॆण्णे)
रंगीबेरंगी (नटलेल्या )मुली
வட்டமிடும் நதியே (वट्टमिडुम् नदिये)
वळणं घेत जाणाऱ्या नदी !
வளைவுகள் அழகு உங்கள் வளைவுகள் அழகு (वळैवुगळ् अऴगु उंगळ् वळैवुगळ् अऴगु)
तुमची वळणे सुंदर, वळणे सुंदर
மெல்லிசைகள் படித்தல் (मॆल्लिसैगळ् पडित्तल्)
सुश्राव्य धून म्हणता
மேடு பள்ளம் மறைத்தல் (मेडु पळ्ळम् मरैत्तल्)
उंच-खोल ठिकाणं लपवता
நதிகளின் குணமே (नदिगळिन् गुणमे)
नद्यांचा हा स्वभावच आहे
அது நங்கையின் குணமே (अदु नंगैयिन् गुणमे)
हा स्त्रीचाही स्वभाव आहे

சிறு நதிகளே நதியிடும் கரைகளே (सिरु नदिगळे नदियिडुम् करैगळे )
अगं लहान नदी, नदीच्या तटांनो,
கரைதொடும் நுரைகளே (करैतॊडुम् नुरैगळे)
तटांना स्पर्शणारं फेसाळतं पाणी
நுரைகளில் இவள் முகமே (नुरैगळिल् इवळ् मुगमे)
त्या फेसाळत्या पाण्यात हिचा चेहरा !
சிறு நதிகளே நதியிடும் கரைகளே (सिरु नदिगळे नदियिडुम् करैगळे )
अगं लहान नदी, नदीच्या तटांनो,
கரைதொடும் நுரைகளே (करैतॊडुम् नुरैगळे)
तटांना स्पर्शणारं फेसाळतं पाणी
நுரைகளில் இவள் முகமே (नुरैगळिल् इवळ् मुगमे)
त्या फेसाळत्या पाण्यात हिचा चेहरा !

தேன்கனியில் சாராகி (तेन्कनियिल् सारागि)
मधासारख्या फळात रसाचे रूप घेते
பூக்களிலே தேனாகி (पूक्कळिले तेनागि)
फुलांमध्ये मधाचे रूप घेते
பசுவினிலே பாலாகும் நீரே (पसुविनिले पालागुम् नीरे)
गायींमध्ये दुधाच्या रूचे रूप घेते, पाणी
தாயருகே சேயாகி (तायरुके सेयागि)
आईजवळ बालक होऊन
தலைவனிடம் பாயாகி (तलैवनिडम् पायागि)
पतीजवळ पत्नी म्हणून
சேயருகே தாயாகும் பெண்ணே (सेयरुके तायागुम् पॆण्णे)
मुळाजवळ आई बनून , असते स्त्री
பூங்குயிலே பூங்குயிலே (पूंकुयिले पूंकुयिले)
फुल-कोकिळे फुल-कोकिळे
பெண்ணும் ஆறும் வடிவம் மாறக்கூடும் (पॆण्णुम् आरुम् वडिवम् माऱक्कूडुम्)
स्त्री आणि नदी रूप बदलू शकतात
நீர் நினைத்தால் (नीर् निनैत्ताल्)
पाण्याने ठरवलं तर
பெண் நினைத்தால் (पॆण् निनैत्ताल्)
स्त्रीने ठरवलं तर
கரைகள் யாவும் கரைந்து போக கூடும் (करैगळ् यावुम् करैन्दु पोग कूडुम्)
कुठलाही काठ सुकून जाईल

நதியே நதியே காதல் நதியே (नदिये नदिये कादल् नदिये)
नदी गं, नदी गं, प्रेमसरिते !
நீயும் பெண் தானே (नीयुम् पॆण् दाने)
तू पण स्त्रीच आहेस ना
அடி நீயும் பெண் தானே (अडि नीयुम् पॆण् दाने)
अगं तू पण स्त्रीच आहेस ना
ஒன்றா இரண்டா காரணம் நூறு (ऒन्रा इरण्डा कारणम् नूरु)
एक दोन काय शंभर कारणं सांगेन
கேட்டால் சொல்வேனே (केट्टाल् सॊल्वेने)
विचारलंस तर सांगेनच
நீ கேட்டால் சொல்வேனே (नी केट्टाल् सॊल्वेने)
तू विचारलंस तर सांगेनच

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link