https://www.facebook.com/mrudula.bele/posts/pfbid02nWZY49C6xj3DXAfzULZJxEsgD5z5n2ttjsbYM8wm9XRb5pqckYeZGtKnacuxQwRkl?__cft__[0]=AZVqQ-nrfuyc3nPYtzdkCNzoFE5TOPCayvoqrddmvgrPL46fn8mEgUlzPR2BDaSLT9I2tUT7uiQXms1xbQrVoEP3L_4XGVuE733qYAi-nX2PKHq7NXlGUgV8J3DAJE8eg5pgwrwt8w8I12S3j87HNrEIZvlM2ExMxv_JQJz0neVtnly0t3sxRCHuFxqyVq1-DwVhbApeOHE2UYijbdb0sOJK&__tn__=%2CO%2CP-R

Copied from above post … या गझलेबद्दल अगदीच संक्षेपात.
या गझलेचा पहिला शेर वाचला/ऐकला की ती रचना प्रेमभावनेतून लिहिली असेल असं वाटू लागतं आणि शेवटचा शेर वाचला की जाणवतं की फैज साहेब ज्यांना तत्कालीन पाकिस्तान सरकारने एकापेक्षा अधिक वेळा देशाबाहेर काढलं त्यांनी आपल्या मातृभूमीच्या विरहाला किती व्याकूळ शब्दरूप दिलेलं आहे.
कवीचं मन, त्याची बुद्धी आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व एकाचवेळी त्याच्या शब्दांतून स्वतःला अभिव्यक्त करायला धडपडत असतं.
श्रेष्ठ कवी हा तत्वज्ञ असतो!
असो. ती गझल वाचा, तिचा आस्वाद घ्या…

 

नहीं निगाह में मंज़िल तो जुस्तुजू ही सही = नसेल नजरेत ध्येय; पण शोध तरी राहो मनी

नहीं विसाल मयस्सर तो आरज़ू ही सही = नसेल सोपे भेटणे पण आशा तरी राहो मनी

न तन में ख़ून फ़राहम न अश्क आँखों में = न उरले रक्त देही नाही अश्रू आज नयनी

नमाज़-ए-शौक़ तो वाजिब है बे-वज़ू ही सही = नसो शुचिर्भूत तरी सुखाची आराधना चालू राहो

किसी तरह तो जमे बज़्म मय-कदे वालो = जमो कशीही, पण पिणाऱ्यांची अशी मैफल जमो

नहीं जो बादा-ओ-साग़र तो हाव-हू ही सही = नसेल मदिरा आणि पेले, हाय-अरेरे चा नाद घुमो

गर इंतिज़ार कठिन है तो जब तलक ऐ दिल = असेल कठीण जर वाट बघणे, अरे माझ्या मना

किसी के वादा-ए-फ़र्दा की गुफ़्तुगू ही सही = कुणाच्या भेटीच्या आश्वासनाची चर्चा तरी राहो सुरु

दयार-ए-ग़ैर में महरम अगर नहीं कोई = परक्या भूमीवर या जरी स्नेहीमित्र नाही कुणी

तो ‘फ़ैज़’ ज़िक्र-ए-वतन अपने रू-ब-रू ही सही = तर मायभूमीचा विचार, ए ‘फ़ैज़’ चालो अंतरी