(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

நிலாவே வா செல்லாதே வா… (निलावे वा, सॆल्लादे वा)
चंद्रा ये, जाऊ नकोस
எந்நாளும் உன்… பொன்வானம் நான்… (एंनाळुम् उन् पॊन्वानम् नान्)
नेहमीच तुझे सोनेरी आकाश मी असेन
எனை நீ தான் பிரிந்தாலும்…( एनै नी दान् पिरिन्दालुम् )
जर तू माझ्यापासून स्वतःहून वेगळी झालीस तर
நினைவாலே அணைப்பேன்… (निनैवाले अणैप्पेन्)
आठवणीनेच तुझ्याशी जोडला जाईन

நிலாவே வா… செல்லாதே வா…(निलावे वा, सॆल्लादे वा)
चंद्रा ये, जाऊ नकोस

காவேரியா கானல் நீரா… (कावेरिया कानल् नीरा )
कावेरी का ? मृगजळ का ?
பெண்ணே என்ன உண்மை…(पॆण्णे एन्न उण्मै)
खरंच मुलगी कशी आहे ?
முள்வேலியா முல்லைப்பூவா…(मुळ्वेलिया मुल्लैप्पूवा)
काटेरी कुंपण आहे का मुल्लै(चमेली)चं फूल आहे ?
சொல்லு கொஞ்சம் நில்லு… (सॊल्लु कॊंजम् निल्लु)
जरा सांग, जाऊ नकोस.
அம்மாடியோ நீ தான்…இன்னும் சிறு பிள்ளை…(अम्माडियो नी दान् … इन्नुम् सिरु पिळ्ळै)
अगं तूच अजून लहान पोर आहेस
தாங்காதம்மா நெஞ்சம்…நீயும் சொன்ன சொல்லை (तांगादम्मा नॆंजम् …नीयुम् सॊन्न सॊल्लै)
माझ्या मनाला सहन होत नाहीत तू बोललेले शब्द
பூந்தேனே நீ தானே…சொல்லில் வைத்தாய் முள்ளை (पूंदेने नी दाने …सॊल्लिल् वैत्ताय् मुळ्ळै)
फुलातील मधा तूच ना गं , शब्दांत ठेवलेस काटे (तुझे शब्द बोचतायत)

நிலாவே வா செல்லாதே வா… (निलावे वा, सॆल्लादे वा)
चंद्रा ये, जाऊ नकोस

பூஞ்சோலையில் வாடைக்காற்றும் வாட…சந்தம் பாட (पूंजोलैयिल् वाडैक्काट्रुम् वाड…संदम् पाड)
फुलबागेत जेव्हा मोसमी वारे वाहत आहेत, धून गातायत
கூடாதென்று கூறும் பூவும் ஏது… மண்ணின் மீது…(सूडातॆन्रु कूरुम् पूवुम् एदु मण्णिन् मीदु)
तेव्हा, हा उष्ण वारा आहे म्हणणारे फूल कुठले ह्या जगात?
ஒரே ஒரு பார்வை…தந்தால் என்ன தேனே…(ऒरे ऒरु पार्वै… तन्दाल् एन्न तेने)
एकच एक दृष्टिक्षेप टाकलास तर काय होईल माझ्या प्रिये
ஒரே ஒரு வார்த்தை…சொன்னால் என்ன மானே…(ऒरे ऒरु वार्त्तै सोन्नाल् एन्न माने)
एकच एक शब्द बोललीस तर काय होईल ?
ஆகாயம் தாங்காத…மேகம் ஏது கண்ணே…(आगायम् तांगाद… मेगम् एदु कण्णे)
आकाशाला झेपणार नाही असा ढग आहे का ?

நிலாவே வா செல்லாதே வா… (निलावे वा, सॆल्लादे वा)
चंद्रा ये, जाऊ नकोस
எந்நாளும் உன்… பொன்வானம் நான்… (एंनाळुम् उन् पॊन्वानम् नान्)
नेहमीच तुझे सोनेरी आकाश मी असेन
எனை நீ தான் பிரிந்தாலும்…( एनै नी दान् पिरिन्दालुम् )
जर तू माझ्यापासून स्वतःहून वेगळी झालीस तर
நினைவாலே அணைப்பேன்… (निनैवाले अणैप्पेन्)
आठवणीनेच तुझ्याशी जोडला जाईन

நிலாவே வா செல்லாதே வா… (निलावे वा, सॆल्लादे वा)
चंद्रा ये, जाऊ नकोस
எந்நாளும் உன்… பொன்வானம் நான்… (एंनाळुम् उन् पॊन्वानम् नान्)
नेहमीच तुझे सोनेरी आकाश मी असेन

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe