पुस्तक – पाचूचे बेट (Pachuche Bet)
लेखक – हर्मन मेलव्हिल (Herman Melville)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाचे नाव – Typee (टाईपी)
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
पाने – १६८
ISBN – 978-89-353-17-1964

 

युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा काळात इ.स. १८४१ मध्ये या पुस्तकाचा लेखक हर्मन दक्षिण अमेरिकेजवळच्या महासागरात एका समुद्र सफरीवर निघालेल्या जहाजात खलाशी होता. त्यांचे जहाज सतत सहा महिने समुद्रात फिरत होते. शेवटी एकदा त्यांना जमीन दिसली ती पॉलिनेशियन बेटांची. प्रवासाला कंटाळलेला हा खलाशी जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो. बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो. जहाजापासून दूर पळून जातात. बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं, कंद खात मस्त राहू अशी त्यांची कल्पना. पण कसलं काय. खडतर दिवस त्यांच्या समोर उभे राहतात. डोंगर दऱ्या ओलांडून, भुके तहानलेले राहून ते शेवटी पोचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात. आता आपले दिवस भरले अशी त्यांची कल्पना झाली. पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच; उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला. त्यांच्या दुखण्यावर उपचार केले.

चार दिवस पाहुणचार घेऊन निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवंच आव्हान उभं राहिलं. ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते. ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले. बरेच महिने राहिले. युरोपियन खलाशी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशकांनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते. या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्याला जाणवलं की युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत, त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत. तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे. युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं .

लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं, टैपी लोकांचं खानपान, धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं, स्त्रीपुरुष समाजरचना, प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं, जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या पुस्तकात केलं आहे. ललित स्वरूपात लिहिलेला एक रिपोर्टच. पुस्तकातली ही काही पानं वाचा म्हणजे कल्पना येईल
या बेटांची आधी थोडी ओळख करून घेऊया

(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
बेटावरच्या डोंगर दऱ्यांत, जंगलात हिंडतानाचा हा भीषण साहसी अनुभव

वनवासी लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तसा फारच कमी. पण अधूनमधून येणारी परदेशी जहाजं त्यांच्या सवयीची झाली होती. जहाज आलं की बेटावर मिळणाऱ्या गोष्टींच्या बदल्यात कापड, तंबाखू, बंदुका असं काहीबाही घ्यायला त्यांची लगबग सुरू होत असे. त्याची ही एक गंमत बघा.

आदिवासींचा साधासुधा, शहरी लोकांना हेवा वाटायला लावणारा निवांत दिनक्रम बघा

हर्मन ना त्या लोकांनी मारून खाल्लं नाही तरी त्यांच्या नरभक्षकतेची झलक मात्र त्यांना बघायला मिळाली. त्यातला एक थरारक अनुभव वाचा.

पुस्तक दीडशे पानी छोटंसं आहे. तिथल्या गमती जमती मजेशीर आहेत. लेखकाची शैली फार पाल्हाळ किंवा मीठमसाला ना लावता झरझर सांगणारी आहे. भाषांतर अगदी आदर्श वाटावं असं मराठमोळं आहे.  त्यामुळे पुस्तक अगदी चटचट वाचून संपेल.
हिरव्या कंच अश्या पाचूच्या बेटावरच्या आयुष्याची झलक वाचायला आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/