पुस्तक : पैसा (Paisa)
लेखक : अतुल कहाते (Atul Kahate)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६९
ISBN : ९७८-९३-८६११८-२४-०
पैसा, चलन, नाणी, नोटा, बँक इ. चा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. अनुक्रमणिकेवर नजर टाकली की मुद्दे लक्षात येतील.
मानवी इतिहासात अगदी सुरुवातीला वस्तूंची देवाण घेवाण होत असे. मग तांबे, सोने, चांदी इ. धातूंचे तुकडे वापरायला लागले. पुढे त्याचा आकार, वजन निश्चित असतील अशी नाणी तयार झाली.
रोमन साम्राज्यात सोने वापरलं जायचं, सोनं मिळवण्यासाठी स्वाऱ्या आणि दुसऱ्या देशांची लुटालूट केली जायची, सोन्याच्या खाणी असलेल्या प्रदेशांवर ताबा मिळवायचा आणि तिथल्या लोकांना गुलाम करून खाणीत काम करायला लावून पिळवणूक केली जायची. त्याचा सविस्तर इतिहास मांडला आहे.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
नाणी वितळवून धातू मिळवायचा प्रयत्न व्हायचा. किंवा नाणी खरवडून थोड्या थोड्या सोन्या, चांदीची चोरी व्ह्यायची. त्यातून नाणी रद्द करावी लागायची. तसंच नाणी तयार केली म्हणजे सगळीकडे तीच वापरली जायची असं नाही. देश बदलला, राजा बदलला इतकंच काय देशाची आर्थिक परिस्थिती बदलली की जुनी नाणी रद्द करायची आणि नवीन जाहीर केली जायची. मग सावळा गोंधळ व्हायचा. त्याचाही इतिहास, किस्से सांगितले आहेत.
मग पुढे पैसे जमवणे, कर्ज देणे इ गोष्टींसाठी बँकेची सुरुवात झाली. भारतात ब्रिटिश काळात बँकांची सुरुवात झाली आहे. तो सुरुवातीचा काळ मांडला आहे.
पुढे आधुनिक काळात युरोप मध्ये अनेक देशांचं एक चलन असा प्रयोग झाला. अर्थात युरो हे चलन. स्थानिक चलनांशी विनिमयाचा दार ठरवणे, त्याचे फायदे-तोटे, गरीब-श्रीमंत देशांमधला फरक यामुळे हा बदल फारच कठीण होता. त्याची ही झलक.
असे वेगवेगळ्या पैलुंवरचे लेख आहेत. पण पुस्तकाची शैली मला आवडली नाही. एकापाठोपाठ एक प्रसंग दिले आहेत. अनेक व्यक्तींची नावं, ठिकाणं, सनावळ्या येतात. पण हे सगळं लक्षात राहणं कठीण आहे. शाळेच्या अभ्यासाच्या पुस्तकाप्रमाणे आपण काही पाठांतर करणार नाही. मग पुस्तक वाचण्याचं फलित काय ? तर आपल्याला त्या घटनांमागचं सूत्र समजणं पुरेसं आहे. पण ह्या माहितीच्या गलबल्यातून असे ज्ञानाचे कण फारच थोडे लागतात.
बिटकॉइन, भारतातील नोटबंदी याबद्दल लेख आहेत. पण केवळ पुस्तकाला पूर्णता यावी यादृष्टीने मुद्द्यांचा समावेश या पलीकडे त्या लेखांमध्ये सखोलता नाही.
आणखी एक महत्त्चाचा आक्षेप म्हणजे भारताकडे झालेलं दुर्लक्ष. “सोने कि चिडिया” असणारा आपला देश, देशोदेशी व्यापार चालणार देश, चाणक्याच्या अर्थशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेला देश, शेकडो राजवटी असणारा देश. मग ब्रिटिश काळात झालेल्या बँकांच्या सुरुवाती आधी भारतात काय होतं ? लेखक भारतीय असूनही त्याला हे सविस्तर लिहावंसं वाटलं नाही ? अतुल कहातेंच्या “’च’ची भाषा” पुस्तकाच्या वेळीसुद्धा मी हाच आक्षेप नोंदवलेला होता.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–