पुस्तक : पश्चिम

लेखिका : विजया राजाध्यक्ष

विजया राजाध्यक्ष यांचा हा कथासंग्रह आहे. या सर्व कथांना सुखवस्तू पंढरपेशा समाजाही पार्श्वभूमी आहे. ह्या  शहरी समाजात घडणाऱ्या कौटुंबिक घटनांभोवती या कथा गुंफलेल्या आहेत.  त्यामुळे कथांमध्ये, विषयांमध्ये किंवा घडणाऱ्या घटनांमध्ये अनपेक्षित किंवा अतार्किक काही नाही. आजूबाजूला जे दिसतं, ऐकू येतं तेच आहे.

मुलाचं परदेशी सेटल होणं स्वीकारलेल्या पण नातवावर इथले संस्कार व्हावेत अशी तळमळ असणारे आजोबा; महिलांचा मासिक धर्म आणि मुलीच्या ऋतुप्राप्तीबाबत बदललेला दृष्टिकोन; उच्चशिक्षित असूनही गृहिणी होऊन संस्कारात गुरफटत स्वतःचा शोध घ्यायचा राहिला याची रुखरुख; दुसऱ्या स्त्रीच्या यशामुळे हेवा वाटून निर्माण होणारा दुरावा आणि आयुष्याच्या अखेरीला त्यात जावणारी निरर्थकता ई.

सगळ्या कथा त्यातील मुख्य पात्रांचं आयुष्य व्यापणाऱ्या क्वचित त्यांच्या पुढच्या पिढीतल्यांचे संदर्भ असणाऱ्या आहेत. वर्षं सरतात, आयुष्य पुढे जातं आणि एखाद्या व्यक्तिकडे, घटनेकडे, मताकडे बघायचे आपले विचार कसे बदलत जातात हे मंडणाऱ्या साध्या सरळ कथा.

कुठलीही कथा किंवा पात्र फार लक्षात राहतं असं नाही पण तरीही कथा मनोरंजक आहेत. सहज वाचायला हरकत नाही.


———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-